पोस्ट्स

डिसेंबर ३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर

इमेज
  सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या 23 व्या पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठेचा 2023 राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री. चेतन अरविंद सौंदळे सर यांना जाहीर झाला असून  रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सोनपेठ येथे एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सोनपेठ येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या वितरण सोहळ्यास अनेक गुरूवर्य शिवाचार्य महाराज तसेच विशेष उपस्थिती म्हणून परभणी जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,सोनपेठ चे तहसीलदार श्री.सुनील कावरखे,मुख्याधिकारी कोमल सावरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुनील अंधारे,महाराष्ट्र वीरशैव महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी,वैजनाथ देवल कमिटीचे विश्वस्त जेष्ठ नेते विजयकुमार मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे हे राहणार आहेत.  या कार्यक्रमास परळी शहर व प

भेल स्कूल मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
भेल स्कूलमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे   जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद   लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती प्रतीवर्षी उत्साहात विविध उपक्रमाने सर्वदूर साजरी होत असते. याही वर्षी परळी शहरातील नामांकित व सर्वात जुनी असणारी भेल सेकंडरी स्कूल, या विद्यालयात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याची सुरुवात आज विद्यालय अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेऊन करण्यात आली. इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी "ग्लोबल वॉर्मिंग " व 9वी ते 10वी या गटासाठी "संघर्षयोद्धा" हे विषय ठेवले होते.  वरील विषयांवर विद्यार्थ्यांनी तयारी करून,आपला प्रभावी सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवून- आपला ठसा उमटवला.या स्पर्धेमध्ये एकूण 50 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण, 12 डिसेंबर म्हणजेच साहेबांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते जाहीर होईल. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यालयातील अनुभवी व उत्कृष्ट शिक्षक श्रीमान जयंत अयाचित सर व उत्कृष्ट सहशिक्षिका सौ, सुमेधा कुलकर्णी मॅडम यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे नियोजन कलोपासक मंड

जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

इमेज
  जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी   बीड, 8: (जीमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी.   जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन  आदरांजली वाहण्यात आली.   याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रभारी गौण खनिज अधिकारी महादेव काळे, नायब तहसीलदार टाक, शिवशंकर मुंडे,राम घडशे,गोटुराम गोरेल, आदी कर्मचारी उपस्थित होते.

परळी मतदारसंघास 380 कोटी

इमेज
  हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून बीड जिल्ह्याला हजारावर कोटींचा निधी! पालकमंत्री धनंजय मुंडेंची कोटी-कोटींची उड्डाणे! सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना व पुलाच्या कामांवर निधीचा वर्षाव परळी मतदारसंघास 380 कोटी अनेक प्रशासकीय इमारतींचे काम लागणार मार्गी परळी वैद्यनाथ (दि.08) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा ध्यास घेतला असून, यासाठी केवळ घोषणा करून, बोलून मोकळे न होता, धनंजय मुंडे यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांना निधी मिळवून, बोललेला शब्द खरा करून दाखवला आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने, महत्वाचे रस्ते व पूल, शासकीय रुग्णालये, त्यातील सुविधांचा विकास आदी अनेक कामांसाठी एक हजार कोटी पेक्षा अधिक निधीस हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  या बद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

इमेज
  स्वाराती रुग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग होणार सुपर स्पेशालिटी दर्जाचा! वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता नांदेडच्या घटनेनंतर आ. नमिता मुंदडांनी केलेल्या मागणीला यश अंबाजोगाई - एमबी न्युज वृत्तसेवा  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बालकांच्या मृत्युच्या दुर्दैवी घटनेनंतर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुसज्ज असावे जेणेकरून रुग्णांच्या जीवितास धोका होणार नाही यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाची व्हावीत अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटी प्रमाणे करण्यासाठी (मोड्युलर ओटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया गृहातून होणारा जंतुसंसर्ग कमी होऊन रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहे. या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध केल्याबद्दल केज मतदार संघातील जनता आ. मुंदडा यांचे आभार मानत आहे.

अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून

इमेज
  अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून अंबाजोगाई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ मोंढा रोडवर एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी (दि.०८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.  राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि लाकडी दांड्याने राजेंद्र यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात राजेंद्र यांचा जागेवर मृत्यू झाला. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून यामागे जागेच्या वादाचे कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ••••••••••••••••••••••••

जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान

इमेज
  जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान  परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दिल्ली येथील राजनीति व प्रशासनाचे गाढे अभ्यासक सुप्रसिद्ध जनहित याचिकाकर्ता  सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ  अश्विनी कुमार उपाध्याय यांचे आज रोजी वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. '' भारतीय राजनीति व प्रशासन यात अमुलाग्र बदलाची आवश्यकता'' एक संवाद असा विषय घेण्यात आलेला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री बाजीराव भैया धर्माधिकारी हे असून माननीय राजेश देशमुख यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा, भास्कर मामा चाटे सामाजिक कार्यकर्ते, विनोद  सामत चेअरमन वैद्यनाथ बँक , रवी सानप पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन,  जुगलकिशोर लोहिया माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ, जेष्ठ विधिज्ञ वैजनाथ नागरगोजे, जेष्ठ विधिज्ञ राजेश्वर देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.      तरी अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानासाठी आपण ऊपस्थिती रहावे असे आवाहन प्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा,  दंत रोग तज्ञ डॉक्टर दे. घ.मुंडे,परळी समाचार चे संपाद

विजया दतात्रय दहिवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

इमेज
  विजया दतात्रय दहिवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित परळी प्रतिनिधी परळीतील स्वातंत्र्यसैनिक, कला योगी, चित्रकार दतात्रय दहिवाळ गुरुजी यांची कन्या विजया दहिवाळ यांना कै. उत्तमराव विटेकर माजी आमदार यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नांवाने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कै.उत्तमराव विटेकर माजी आमदार, यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नावाने  राजेश भैय्या विटेकर दरवर्षी सामाजिक राजकीय क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी परळीच्या विजयाताई दहिवाळ यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.कै. उत्तमराव विटेकर माजी आमदार, यांच्या 9 व्या स्मृती दिना प्रित्यर्थ माजी आमदार स्वर्गीय उत्तमराव विटेकर (भाऊ ) यांच्या नावाने सामाजिक कार्याबद्दल विजया दहिवाळ यांना समाजभूषण पुरस्कार आमदार डाॅ.राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड ,जि.प.अध्यक्ष राजेश दादा विटेकर  यांच्या हस्ते देण्यात आला. विजया ताईंच्या गौ

सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन

इमेज
  सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)        श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शुक्रवारी (दि.०८) रोजी सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परित्रक काढले आहे. त्यामुळेे तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.          सदुंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती. ती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत होती. त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी जगनाडे महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. शुक्रवारी (दि.०८) संताजी महाराजांचा जन्म दिवस साजरा करण्यात येतो. यासंदर्भात गेल्या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाने परित्रकात उल्लेख केला आहे. यंदाही महापुरुषांच्या जयंती

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या भव्य मोफत कृत्रिम हात , मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे

इमेज
  जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या भव्य मोफत कृत्रिम हात , मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे                                   परळी:दिनांक 7 डिसेंबर            जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे भव्य मोफत कृत्रिम हात,  मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.     रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती या शिबिराचे  संपर्कप्रमुख  दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष मा. डॉ संतोषजी मुंडे यांनी दिली.                    दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळख असणारे तसेच विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणारे त्याचबरोबर प्रसंगी दिव्यांगाच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष ,राष्ट्रवादी युवक

बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी-संजय देशमुख

इमेज
  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीचे नव्हते तर ते जागतिक नेते होते-प्रा .डॉ विनोद जगतकर बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी-संजय देशमुख लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)          महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोण्या एका जातीचे नव्हते तर ते जागतिक नेते होते. तर बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष संजय देशमुख यांनी केले.क्षयेथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.       लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, इतिहास विभागप्रमुख प्रा डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या

परळीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचं धडाकेबाज भाषण

इमेज
  जर मध्यप्रदेश प्रमाणे लाडली बहन योजना आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर लोकं आपल्या दारात येवून आशीर्वाद देतील विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी - पंकजाताई मुंडे वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासह जिल्हयाच्या विकासाचे बीजारोपण पालकमंत्री असताना केले परळीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचं धडाकेबाज भाषण परळी वैजनाथ ।दिनांक ०५। जिल्हयातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही आमची जबाबदारी आहे. मी पालकमंत्री असताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे बिजारोपण केले होते. वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा ही आपली मनापासूनची इच्छा होती आज हा विषय पुढे जात आहे याचा आनंद आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करू. वंचित, उपेक्षित व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोणत्याही व्यासपीठावर जायला पण तयार आहे असं प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज येथे केलं.         परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर  मुख्यमंत्री एकनाथ

लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन ; पंकजा मुंडेंनी केले सर्वांचे स्वागत

इमेज
  मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गोपीनाथ गडावर नतमस्तक लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन ; पंकजा मुंडेंनी केले  सर्वांचे स्वागत परळी वैजनाथ ।दिनांक ०५। महाराष्ट्र शासनाच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्त परळीत आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी आज नतमस्तक होऊन दर्शन घेतले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि गोपीनाथ गडाची प्रतिमा देऊन स्वागत केले. राज्य शासनाच्या वतीने परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री परळीत आले होते. दुपारी सव्वा दोन वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर आगमन झाले. जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी लोकनेते मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तदनंतर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि वैद्यनाथ सहकारी कारखान

मोठी बातमी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे शासन आपल्या दारी कार्यक्रमात राहणार उपस्थित

इमेज
  मोठी बातमी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे शासन आपल्या दारी कार्यक्रमात राहणार उपस्थित परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           परळी वैजनाथ येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आज होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ,मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे या सुद्धा आता उपस्थित राहणार आहेत.           परळी वैजनाथ येथे आज दिनांक पाच रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाची भव्य दिव्य तयारी करण्यात आली आहे. तसेच परळीत येणाऱ्या मंत्रिमहोदयांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताच्या तयारीतच सगळ्या कट आउट व होर्डिंग्जवर पंकजा मुंडे यांची छायाचित्रे झळकले होते. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली असून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या परळी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसमवेतच हेलिकॉप्टरने परळी येथे येणार असून गो

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी परळी सज्ज

इमेज
असा आहे आजचा कार्यक्रम क्रम : गोपीनाथगड ,वैद्यनाथ मंदिर, छत्रपती शिवरायांना वंदन: स्वागत रॅली  त्यानंतर मुख्य शासकीय कार्यक्रम         बीड, 3 (जिमाका) : शासन आपल्या दारी  या विशेष कार्यक्रमासाठी  बीड जिल्ह्यातील परळी शहर सज्ज झाले असून मंगळवार दिनांक पाच डिसेंबर 2023 ला वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी विकासकामांचे भूमिपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच काही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार आहे  या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी आदींची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी भव्य मंडप उभारले  आहेत.प्रतिनिधी लाभार्थ्यांची बसण्याची व्यवस्था मंचावर केलेली आहे. सभा मंडपाच्या परिसरात लाभार्थ्यांना वितरित होणारे साहित्य मांडण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळावा म्हणून विभागाच्या वतीने दालने उभारण्यात येत आहेत. याची अ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
  आज परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रम विविध विकास कामांचे भुमीपुजन, लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती  22 हजार लाभार्थ्यांना होणार लाभांचे वाटप           बीड, 4 (जिमाका) :परळी वैद्यनाथ तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत विकास कामांचे भुमीपूजन आणि शासन आपल्या दारी अंतर्गत लाभ वाटपाचा कार्यक्रम उद्या परळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे असतील.       परळी येथे ओपळे मैदानात उभारलेल्या भव्य मंडपात हा सोहळा होणार आहे.         श्री. धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हयात विविध प्रकल्पांना मान्यता प्राप्त करुन घेतली आहे. यासाठी शासनाने निधीची मान्यता देखील दिली आहे.      परळी वैद्यनाथ विकास आराखडा 286 कोटी 68 लाख रुपयांचा असून त्याचे प्रत्यक्ष भुमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल.  परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीचे भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड जिल्हयातील परळी दौरा कार्यक्रम

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड जिल्हयातील परळी दौरा कार्यक्रम        बीड, 4 (जिमाका) :  मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कायक्रमासाठी येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.        मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.25 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व हेलीकॉप्टरने परळी जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता शक्ती कुंज वसाहत थर्मल कॉलनी हेलीपॅड परळी जि. बीड येथे आगमन व मोटारीने श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिराकडे प्रयाण.               दुपारी 2.25 वाजता श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ मंदीर येथे आगमन, दर्शन व तीर्थक्षेत्र विकास कामाचे भुमीपूजन.दुपारी 2.35 वाजता मोटारीने ओपळे मैदान, परळीकडे प्रयाण.  दुपारी 2.45 वाजता परळी येथे ओपळे मैदानावर आगमन “शासन आपल्या दारी” कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.15 वाजता मोटारीने शक्ती कुंज वसाहत थर्मल कॉलनी हेलीपॅड, परळीकडे प्रयाण.  सायंकाळी 4.30 वाजता शक्ती कुंज वसाहत थर्मल कॉलनी, हेलीपॅड परळी येथे आगमन हेलीकॅप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.

राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 साठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावे

इमेज
  राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 साठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावे दिल्ली, 4 : देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक चालना देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. यापूर्वीच्या राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम स्पर्धा 2023 मध्ये भारतामधील 35 गावांची सुवर्ण, रौप्य आणि कांस्य श्रेणीत निवड करण्यात आली होती. देशात ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटकांसाठी ग्रामीण घरगुती निवाससुविधांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय नीतिसह ग्रामीण घरगुती निवाससुविधाविषयक सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला होता. ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधांना लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धांचे आयोजन करणे हा भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने मंत्रालयाचा धोरणात्मक उपक्रमा

धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार

इमेज
  परळीत येण्याआधीच शासन आपल्या दारीच्या पूर्वसंध्येला सरकारने दिली परळीला दिली 140 कोटींची भेट सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील 26 रस्त्यांच्या कामांस 141 कोटी 70 लक्ष रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता  प्राप्त धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार परळी वैद्यनाथ (दि. 04) - परळीत आज राज्य शासन आपल्या दारी येत असून शासनाने परळीत येण्याच्या पूर्वसंध्येलाच परळीवासीयांना तब्बल 141 कोटी रुपयांच्या विकास कामांची भेट दिली आहे.  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेमार्फत प्रस्तावित केलेल्या  रस्ते व नाल्यांच्या 26 महत्वाच्या कामांना 141 कोटी 70 लक्ष रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे.  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.  दरम्यान आज राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*

इमेज
मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या नाहक चर्चांनी अस्वस्थता: पण हीच ती वेळ एकमेकांना जपण्याची #जोशींचीतासिका सध्या सर्वत्र अफवांचा बाजार पिकलेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे षड्यंत्र कार्यरत झाले आहे. याचे फटके संबंधित मल्टिस्टेट किंवा पतसंस्थाना बसत आहेतच पण सोबतच ठेवीदार अस्वस्थ झालेत हे सारे झाले आहे फक्त अफवांमुळे. अफवा किंवा कम्युनिकेशन गॅप काय अनर्थ घडवू शकतो याचे प्रात्यक्षिक मी पहिल्यांदा अनुभवले ते अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात प्रशिक्षण घेत असताना. बहुधा मे १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे यशस्वी अणू चाचणी केली होती. तेव्हा आमच्या वर्गात जवळपास तीनशे प्रशिक्षणार्थी बसलेले असताना. आमच्या प्रशिक्षकांनी एक प्रयोग केला. त्यात त्यांनी एक विद्यार्थ्याच्या कानात काहीतरी सांगितले, त्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते दुसऱ्याच्या कानात सांगितले. त्यानंतर असेच करत करत शेवटच्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते वर्गाला ऐकवयायचे होते.  त्यात प्रयोगात शेवटच्या विद्यार्थ्याने आम्हांला जे ऐकवले ते काहीसे असे होते की 'अटलने जयला पत्र लिहिले' मुळात पहिल्या विद्यार्थ्या

शेकडो कोटींच्या कामांचा होणार मंगळवारी शुभारंभ, तर अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण

इमेज
  परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात होणार विकासाची नवी नांदी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांसह मान्यवर राहणार उपस्थित शेकडो कोटींच्या कामांचा होणार मंगळवारी शुभारंभ, तर अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना होणार थेट लाभाचे वितरण परळीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या व महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मान्यवरांचे होणार अभुतपूर्व स्वागत परळी वैद्यनाथ (दि. 03) - बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे मंगळवार दि.5 डिसेंम्बर रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेकडो विकासकामांचे भूमिपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच काही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार असून, हा कार्यक्रम बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरणार आहे.  या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप

घाटनांदुर येथे होत असलेल्या मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ अधिवेशन: प्रासंगिक लेख

इमेज
  आणि ग्रंथोपजिविये : ग्रंथमित्र नरहरी (दादा)शहाणे मंठेकर -------------------------------- ग्रं थमित्र नरहरी (दादा)शहाणे मंठेकर हे गुरुदास सेवा आश्रमाचे संचालक, ग्रंथ मित्र चळवळीचे प्रमुख व  सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. ग्रंथालय चळवळीत अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक आहे.  ग्रंथालय धोरणाचे तज्ञ, अभ्यासक व सेवाभावी वृत्तीने जगणारे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. वृद्धाश्रमातील लोकाच्या निराधारपणावर मात करण्यासाठी प्रयत्नशील असणारे,सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.  वंदनीय राष्ट्यसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरीत होऊन,ते कालकथीत गुरू महाराज, दास लालाजी महाराज दहीवाळ ,आणि सहकारी यांच्या समवेत घाटनांदूर ता.अंबाजोगाई जिल्हा बीड येथे सेवारत आहेत. ग्रंथालय संघटना व समूहांना विचारनिष्ठ  राहण्यासाठी सदैव मार्गदर्शन करत असतात.  ग्रंथालय चळवळी सोबतच पदलित,गोरगरीब विद्यार्थ्यांच्या,स्त्रियांच्या ,अबाल वृद्धांच्या  परिवर्तनासाठी विचार प्रबोधनासाठी अनेक उपक्रमाचे आयोजनही   त्यांनी केले आहे. वयाच्या पंचाहत्तरीत कार्यरत राहून,समाजसेवक म्हणून

यश:विजयी अभिनंदन

इमेज
  मध्यप्रदेशच्या विजयाबद्दल  पंकजा मुंडे यांनी केले मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह संपूर्ण टीमचे अभिनंदन मुंबई ।दिनांक ०३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेशच्या घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आदेशावर अथकपणे काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन ! असं ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.     पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे,  ही माझी तीव्र भावना आहे. मध्य प्रदेशातील अनेक प्रगतीशील योजनांपैकी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान   यांचे दोन निर्णय 1. ओबीसीचे आरक्षणात अडथळा न येऊ देता वाचवणे आणि 2. महिलांना सक्षम करण्यासाठी 'लाडली बहन', यामुळे लाखो महिलांनी आम्हांला खऱ्या अर्थाने पक्ष म्हणून आशीर्वाद दिला. मध्य प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा आणि संपूर्ण टीम ज्यांनी कठोर परिश्रम घेतले. माझ्याकडून त्यांचे मनापासून अभिनंदन. महिला मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आदे

परळीकरांचे प्रेम,पाठिंबा व विश्वास पाठिशी

इमेज
परळीत सोशल मीडियावर'आय सपोर्ट चंदूशेठ' चा ट्रेंड : परळीकरांच्या विश्वासाच्या भावना  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळीच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक चळवळीत सातत्याने अग्रेसर असलेले कुटुंब म्हणजे बियाणे कुटुंब आहे. या बियाणी कुटुंबावर परळी व परिसरातील नागरिकांचा मनापासून विश्वास व प्रेम आहे. याची प्रचिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिसून येत आहे. परळीत सोशल मीडियावर 'आय सपोर्ट चंदूशेठ' चा ट्रेंड आल्याचे दिसत आहे.            सध्या सर्वच मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत असल्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये काही पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झाली त्यामध्ये वास्तविकता नसतानाही चंदुलाल बियाणी अध्यक्ष असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट बाबतीतही काही दिवस उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र कोणत्याही ठेवीदार, सभासद व ग्राहकाला एक रुपयाचाही फटका बसणार नाही याची प्रत्येकालाच अंतर्मनातून खात्री आहे. चर्चा, अफवा व काही हितशत्रूंनी वातावरण दूषित करून पतसंस्थेबाबतीतले नागरिकांचे मत नकारात्मक बनविण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्वसामान्य नागरिक व ठेवी