नंदनज ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी स्विकारला पदभार सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची उपसरपंच पदी निवड

नंदनज ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी स्विकारला पदभार सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची उपसरपंच पदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नंदनज ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये सरपंच पदासाठी शिवकन्या योगीराज गुट्टे हया बहुमताने विजयी झाल्या होते, त्यांनी निवडून आल्यानंतर शुक्रवार दि.३० रोजी आपल्या पदाचा पदभार घेतला. याचवेळी झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत एकमताने सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नंदनज ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह पाच उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. श्री संत केदारेश्वर जनसेवा विकास पॅनलचे कै.योगीराज गुट्टे यांच्या पत्नी सरपंच शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह सदस्य म्हणुन सुनंदा शिवाजी गुट्टे, सतीश बाबुराव गायकवाड, नाथराव हरिभाऊ गुट्टे, देवशाला सोमनाथ गुट्टे, अरविंद बापूराव गुट्टे हे सर्व बहुमताने व...