MB NEWS-पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर*

पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर वाराणसी........ प्रसिद्ध वेदाचार्य पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांना मानाचा पं. शंभुनाथ मिश्र स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.संपुर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती राजाराम शुक्ल अध्यक्ष असलेल्या निवड समितीने ही निवड केली आहे. वेद-वेदांग शास्त्र मर्मज्ञ राष्ट्रीय पंडित पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम पं.गणेश्वर शास्त्री द्रविड संपूर्ण भारतात व विदेशात वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत.भारतीय संस्कृतीचा पाया वेद व वेदांगाचे प्रकांड पंडित अशी त्यांची ख्याती असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी वेदांचे परिपूर्ण शिक्षण घेऊन घडले आहेत.भारतातील विद्वान वैदीकांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामेश्वरम् येथील ऐतिहासिक राम सेतू च्या संरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ऐतिहासिक पुरावे समप्रमाण सादर केले.तसेच नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर शिलान्यास समारंभाचे शास्त्रीय सुक्ष्म मुहूर्त त्य...