MB NEWS:मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन

परळी: धनंजय मुंडेंचे होणार अभूतपूर्व स्वागत मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन परळी वैजनाथ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रविवारी प्रथमच परळीला येत आहेत. 3 जानेवारी रोजी त्यांच्या कारला परळीत अपघात झाल्यानंतर ते मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत होते व त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते सुमारे 40 दिवसानंतर परळी या आपल्या मतदारसंघात येत आहेत. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या पुनरागमाननिमित्त जोरदार स्वागत करण्यात येणार असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे रविवारी दुपारी 4 च्या सुमारास हेलिकॉप्टरने परळीत येतील, त्यानंतर ते प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर पांगरी, तळेगाव, टोकवाडी, ब्रम्हवाडी, रिलायन्स पेट्रोल पंप येथे विविध गावातील नागरिकांच्या वतीने भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथून धनंजय मुंडे या...