MB NEWS:सामाजीक संदेश देत राबवला उपक्रम

'एप्रिल फुल' नको - 'परळी कुल' हवी ! सामाजीक संदेश देत राबवला उपक्रम परळी (प्रतिनिधी) एक एप्रिल सर्वत्र एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस सर्वजण साजरा करत असताना परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल असा सामाजीक संदेश देत उपक्रम राबविला.यावेळी वृक्षांना पाणी घालुन सर्वांनी प्रदूषणामुळे उन्हाळ्यात अतिउष्ण होत असलेल्या परळीला थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. एक एप्रिल हा एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस.उन्हाची तिव्रताही याच महिन्यात वाढते.प्रत्येकजण एकमेकास एप्रिल फुल बनवण्यास सतर्क असताना परळीतील सामाजीक कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळी शहराला भेडसावणार्या प्रदूषणामुळे इतर शहरांच्या तुलनेत परळी हे अधिक उष्ण व प्रदुषीत असते.शहर परिसरात वृक्षारोपण लागवड करुन जोपासणा करावी,हरित परळी होण्यासाठी योजना राबवावी यासाठी एप्रिल फुल नको तर हवी परळी कुल असा संदेश देत शहरातील वृक्षांना लागवडीनंतर पाणी मिळालेले नाही अशा वृक्षांना पाणी देत परळी कुल चा संदेश दिला.यावेळी सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर,शिक्षक शिवप्रसाद राजनाळे,व्यापारी यशव...