पोस्ट्स

रेल्वे परिसर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह

इमेज
  परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            येथील रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह  आज( दि. २५) शुक्रवारी आढळला आहे. या मृतदेहाची ओळख पटली असुन मयत पानगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.        रेल्वे स्थानक परिसरात बाहेरच्या बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग लोहार, राहणार पानगाव, जि. लातूर (वय अंदाजे 55 वर्षे) अशी मयत व्यक्तीची ओळख  पटली आहे. या इसमाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस  माहिती घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केला आहे. मृतदेहाची ओळख पटल्याने संबंधितांच्या नातेवाईकांना पोलीस प्रशासनाने संपर्क करून कळवले आहे. याबाबतचा अधिक तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत. ••• •••••••••••• •••••••••••• ••••• 🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••• Click  - 🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या