पोस्ट्स

ऑक्टोबर २९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकेत असलेल्या वर्गमित्रांची उपस्थिती

इमेज
  सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्गमित्रचे स्नेह मिलन उत्साहात  अमेरिकेत असलेल्या वर्गमित्रांची उपस्थिती परळी/प्रतिनिधी      परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्राचे ४२ वर्षांनंतर झाले स्नेह मिलन. दोन दिवस निवासी झालेल्या कार्यक्रमात सगळ्या वर्गमित्रांणी सहकुटुंब सहभाग घेतला. मराठवाडा साथीचे संपादक व बंसल क्लासेस महाराष्ट्रचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून चौथ्यांदा स्नेहमिलन चा कार्यक्रम झाला. परभणीपासून जवळच असलेल्या कोकोनट रिसोर्टमध्ये दोन दिवस स्वतःची सर्व कामे सोडुन मुक्कामी राहुन एकमेकांच्या कुटुंबीयांची ओळख व माहीती जाणुन घेतली. दिनांक २८ व २९ नोव्हेंबर हे दोन दिवस श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्रांची निवासी व्यवस्था करण्यात आली होती. बालपण एकत्र घालविलेले वर्गमित्र सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले ४२ वर्षांनंतर एकत्र आल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सर्व वर्गमित्रांणी एकत्र येत साजरी केली. परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्रांचे हे चौथे स्नेहमिलन झाले. या

प्रसिद्ध गायक राजेश भावसार व पार्श्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम

इमेज
  मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने रविवारी दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध गायक राजेश भावसार व पार्श्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम परळी/प्रतिनिधी      मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळी निमित्त पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २१ वर्षांपासून दिवाळी आणि पहाट गाणी हे शहरातील गीत संगीत रसिकांचे एक समिकरण ठरलेले आहे. परळी शहरातील नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृहात रविवार (ता.१२) पहाटे ५:३० वाजता दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी परळी शहरातील खास रसिकांसाठी स्वरमिलाफ ऑर्केस्ट्रा चे सादरीकरण होणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध गायक व संगीतराज म्युझिक ग्रुप व कॉन्सर्ट चे राजेश भावसार व पाश्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दिवाळी निमित्त पहाटेची भक्तिगीते, जुने-नवे मराठी व हिंदी अविट गोडीची गाणी असणार आहेत. तसेच कानाला तृप्त करणारं सुश्राव्य संगीताची मेजवानी परळीकरांसाठी असणार आहे. या कार्यक्रमास शहरातील रसिकांनी सहकुटुंब सह

उखळी बु.येथे पोस्टाचा मेळावा: विविध योजनांची दिली माहिती

इमेज
  उखळी बु.येथे पोस्टाचा मेळावा: विविध योजनांची दिली माहिती सोनपेठ, प्रतिनिधी.....        डाक समुह विकास कार्यक्रमाचे अंतर्गत आज (दि.४) उखळी बु. येथे पोस्ट खात्याच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा आयोजीत करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालय येथे  हा मेळावा आयोजीत करणात आला.कार्यक्र‌मास सरपंच श्री.सावंत यांनी उपस्थित राहून जनतेस जास्तीत जास्त खाती काढण्याचे आवाहन केले.           यावेळी साहाय्यक अधिक्षक डाकघर परभणी श्री व्हि. यु. कुलकर्णी यांनी पोष्टखात्याच्या विविध योजनांची माहिती व फायदे समजावून सांगीतले. विशेषतः इंडिया पोष्ट पेमेंट बँक मार्फत दिल्या जाणार्‍या 399 रुपयात रु. 10 लाखाचा विमा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, किसान सन्मान योजना व इतर  शासकीय योजनांचे डिबीटी मार्फत येणारे अनुदान गावातले गावात मिळावे यासाठी पोष्ट बँकेचे खाती उघडण्याचे आवाहन करण्यात आले.         हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी श्री. कृष्णा मुंढे, श्रीहरि लोखंडे, श्री.साळवे, श्री. बचाटे, श्री सिरसाट आदींनी प्रयत्न केले.

मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीरे:4 नोव्हेंबर रोजी होणार पहिले शिबीर

इमेज
  मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीरे: 4 नोव्हेंबर रोजी होणार पहिले शिबीर बीड, दि. 03 (जि. मा. का.) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच मतदान नोंदणीचे मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत.             या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक मतदारांनी त्यांची मतदान नोंदणी करून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाद्वारे दि. 4 नोव्हेंबर 2023 (शनिवार) दि. 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) दि. 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार) आणि दि. 26 नोव्हेंबर 2023 (रविवार) या चार दिवशी बीड जिल्ह्यातील 228- गेवराई,  229-माजलगाव, 230- बीड, 231- आष्टी, 232- केज व 233- परळी एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून सर्व मतदारांनी मतदार यादी मध्ये मतदार नोंदणीचे, मतदार यादी

किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा

इमेज
  बीड जिल्ह्यातील मुलीं आता खेळणार  'थ्रोबॉल' किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा बीड, दि. 03 (जि. मा. का.) :-बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामधील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार. किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी थ्रोबॉल आणि जाळी (नेट) प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या सुपूर्त केले. बालविवाहाला नकार देण्यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता अकरा तालुक्यातील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार.रत्नदीप चॅरिटी ट्रस्टचे राजीव मेहता यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना थ्रोबॉल आणि जाळी (नेट ) भेट स्वरूपात देण्यात आले.  हे थ्रो बॉल आणि नेट जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना शाळेतील  विद्यार्थिनींना थ्रोबॉल खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांच्या सुपूर्त केले.  युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन (एसबीसी थ्री) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्

सत्कार

इमेज
  दिव्यांगची सेवा करण्याची संधी मिळाली- डॉ.संतोष मुंडे सुरेश नाना फड व प्रदीप खाडे यांच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे आणि आ. बच्चू कडू यांनी दिलेल्या संधीमुळे दिव्यांगची सेवा करण्याची मला संधी मिळाल्याचे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे नवनिर्वाचित सदस्य डॉ.संतोष मुंडे यांनी म्हटले आहे.      दिव्यांग विभागाच्या राज्य सदस्य पदे त्यांची निवड झाल्याबद्दल सुरेश नाना फड व प्रदीप खाडे यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी सुरेश (नाना) फड, बालाजी फड,नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, माजी सरपंच हरिष नागरगोजे, पत्रकार रणबा गायकवाड, भक्तराम फड, मगन वसावे, आधळे सर व इतर उपस्थिती होते.

दुर्देवी: आपघातात एकाने प्राण गमावले

इमेज
  परळी ते मांडेखेल रस्त्यावर अज्ञात वाहनाने उडवले: ॲड. संदीप रूपनर यांचे अपघाती निधन अंबाजोगाई - भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अंबाजोगाई न्यायालयातील ॲड. संदीप नवनाथ रुपनर (वय २४, रा. ममदापुर, ता. परळी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शुक्रवारी (दि.०३) दुपारी २ वाजताच्या सुमारास मांडेखेल शिवारात झाला. ॲड. संदीप रुपनर यांनी सामान्य परिस्थितीतून पुढे येत वकिलीचे शिक्षण घेतले. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कार्य पद्धतीमुळे वकिली क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. ते शुक्रवारी दुपारी परळी न्यायालयातील कामकाज आटोपून अंबाजोगाई न्यायालयात येण्यासाठी निघाले होते. मार्गात मांडेखेल शिवारात समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अनेक वकील बांधवानी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. ऍड. संदीप रुपनर यांच्या मृत्यूमुळे एक उमदा तरुण सहकारी गमावला अशी भावना वकील संघाकडून व्यक्त होत आहे. ◇◇◇◇◇

नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता

इमेज
  परळी नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतनाचा दुसरा हप्ता- प्रा. बी.जी. खाडे परळीवैजनाथ:- परळी नगर परिषदेतील सेवा निवृत्त सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सातव्या वेतनाचा फरकाचा दुसरा हप्ता मिळणार आहे अशी माहिती नगरपरिषद, कर्मचारी व सेवानिवृत नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. 31 ऑक्टोबर रोजी परळी नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रा. बी. जी खाडे व उपाध्यक्ष शंकर साळवे यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी कांबळे यांना मागण्याचे निवेदन दिले. शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत दिवाळीसाठी नगरपरिषदेतील  सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता देण्याचे मान्य केले. सातव्या वेतनाचा पहीला व तिसरा हप्ता यापूर्वीच मिळालेला आहे. सेवानिवृत कर्मचा-यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष प्रा.बी जी.खाडे, सरचिटणीस जगन्नाथ शहाणे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकार्यास भेटून चर्चा केली. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनाच्या फरकाचा दुसरा हप्ता दिवाळीसाठी देण्याचे मान्य केले. तसेच सेवानिव

भारत सरकारच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

इमेज
  मराठवाड्याच्या ग्लोबल आडगाव चित्रपटाने रचला इतिहास भारत सरकारच्या  गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व  परळीचे भूमीपूत्र  डॉ.सिध्दार्थ तायडे व रानबा गायकवाड यांच्या  भूमिका परळी (प्रतिनिधी)  मराठवाड्याच्या मातीतील अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा समावेश असलेल्या ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाने इतिहास रचना असून भारत सरकारच्या वतीने गोवा येथे डिसेंबर मध्ये  होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ग्लोबल आडगाव हा चित्रपट महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली असून यामुळे सर्वत्र टीम ग्लोबल आडगावचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या चित्रपटात परळीचे भूमिपुत्र जेष्ठ पत्रकार, लेखक तसेच नाटककार रानबा गायकवाड व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांच्या भूमिका आहेत.      प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित "ग्लोबल आडगाव" या  उत्कृष्ट

बीडमधील इंटरनेट सेवा सूरु

इमेज
  बीडमधील इंटरनेट सेवा सूरु बीड :बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक जाळपोळीच्या घटनेनंतर बीड मधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु ती आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी तसेच इंटरनेट बंदी लागू केली होती. काल सायंकाळी मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील आंदोलने थांबले तसेच परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचे पत्रही पाठवले होते त्यावर आता दुपारी अंमलबजावणी करण्यात आली असून बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.

केंद्राकडून राज्याच्या कृषी विभागाची विनंती मान्य

इमेज
  केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे केंद्राकडून राज्याच्या कृषी विभागाची विनंती मान्य मुंबई (दि. 02) - पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत फळ पीकविमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.  पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास 31 ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आली होती. 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 45 हजार 731 अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. काहि तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.  धनंजय मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून, 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. धनंजय मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

एक पाऊल मागं, आंदोलन सुरु राहील, आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार

इमेज
गद्दार होऊ शकत नाही म्हणून एक पाऊल मागं, आंदोलन सुरु राहील, आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार : मनोज जरांगे जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलं आहे. मराठा मराठा समाजाला कुणबी ओबीसीची प्रमाणपत्रं देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी २०२४ पर्यंतची वेळी दिली आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण अखेर स्थगित करत असलो तरी राज्यभरात साखळी उपोषण मात्र सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. याशिवाय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. मात्र जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर घरी न जाण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. राज्य सरकारनं दिलेल्या वेळेत आरक्षण न दिल्यास मुंबई जाम करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. कायद्याच्या कचाट्यात न अडकणारं आरक्षण देणार : धनंजय मुंडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आमरण उपोषण स्थगित केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचं आभार मानलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नी गांभीर्यानं काम करत आहेत. राज्य सरकार प्रामाणिकपणे कायद्याच्या कचाट्यात

तोडगा निघाला

इमेज
वेळ घ्या पण आरक्षण द्या - मनोज जरांगे "मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या आठवडाभरापासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपलं उपोषण थांबवलं आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.  महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी समिती काम करेल, असं ठरलं आणि सरकारने ते मान्य केलं आहे. आता वेळ घ्या पण आरक्षण द्या. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, साखळी उपोषण सुरूच राहील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.  माजी न्यायमूर्तींनी काढलेली समजूत, समजून सांगितलेले कायदेशीर बारकावे आणि नंतर सरकारच्यावतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिलेलं आश्वासन यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला आणखी काही वेळ देत उपोषण सोडण्याची घोषणा केली.  समितीने महाराष्ट्रभर काम करून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करावं, असं ठरलं आणि ते त्यांनी मान्य केलं. अर्धवट आरक्षण घेऊन आमचा एक भाऊ नाराज होईल,

शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी सजग रहावे- डाॅ.ज्ञानेश्वर चव्हाण

इमेज
  शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी सजग रहावे- डाॅ.ज्ञानेश्वर चव्हाण परळी वैजनाथ, एमबीन्युज वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आंदोलनाचे लोण सर्वत्र पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शांतता - सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.ऐनवेळी निर्माण होणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी राखीव फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणारी आंदोलने, नाहक पसरविल्या जाणाऱ्या अफवा यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस ठाण्यांकडून सर्व स्तरावर खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील पोलिस ठाण्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत. राखीव फोर्सलाही ऐनवेळी उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी सतर्क राहून परिस्थिती संयमाने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे  विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र डाॅ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी  स्पष्ट केले.आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेला झळ पोहोचणार नाही, याचीही दक्षता आंदोलकांनी घ्यावी. सार्वजनिक माल

आज तोडगा निघणार? राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगेंची भेट

इमेज
  आज तोडगा निघणार? राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगेंची भेट आज तोडगा निघणार? सरकारचे शिष्टमंडळ निघाले: उदय सामंत, धनंजय मुंडेंचाही शिष्टमंडळात समावेश मुंबई Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र झाल्याचं बघायला मिळतंय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेलं मनोज जरांगे-पाटील यांचं उपोषण त्यांनी मागे घ्यावं, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून बुधवारपासून त्यांनी पाण्याचाही त्याग केलाय. दरम्यान, आज (2 नोव्हेंबर) राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. ओबीसी व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, तसंच आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. सरकारला वेळ द्या आणि उपोषण मागे घ्या : बुधवारी (1 नोव्हेंबर) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील मराठा आरक्षणाच्या ठरावाची प्रत आज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. तर तोडगा काढू पण थोडा सरकारला वेळ द्या आणि उपोषण मागे घ्या, अशी सरकारची भूमिका आहे. दु

श्रीपंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींचे मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

इमेज
 श्रीपंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींचे मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश सिरसाळा (प्रतिनिधी):- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि नवगण शारीरिक शिक्षण महविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३०-३१ ऑक्टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन *'ब' झोन* मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन नवगण शारीरिक शिक्षण महविद्यालय, बीड येथे संपन्न झाले. या मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयाच्या मुलींनी  घवघवीत यश संपादन केले. या मध्ये *कु अश्विनी जाधव* (बिएसी द्वितीय) हिने अनुक्रमें १५०० मीटर व ५००० मीटर धावणे या दोन्हीं मैदानी क्रीडा प्रकारात *प्रथम* क्रमांक पटकावला. तर *कू रितू राठोड* (बि एस सी तृतीय) या विद्यार्थिनीने ५००० मीटर, ८०० मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही मैदानी क्रीडा स्पर्धेत *द्वितीय क्रमांक* पटकावला आणि ८०० मीटर धावणे स्पर्धेत *कू निकीता* म्हात्रे (बी ए द्वितीय) हिने *प्रथम* क्रमांक पटकावला. तसेच *कू प्रगती पोटभरे* (बी एस सी प्रथम) या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी थाळी फेक स्पर्धेत *प्रथम* व गोळा फेक स्पर्धेत *तृतिय* क्रमांकाचे पारितोषिक पट

सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे उपोषणावर ठाम

इमेज
  जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील 'हे' महत्त्वपूर्ण मुद्दे - • आधीच तुम्हाला किती वेळ लागणार हे माहिती नव्हतं का. आम्ही सगळं ऐकतो म्हणून तुम्ही आमच्याकडून काहीही करणार का? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी मांडला. • तुमचं काय कारण आहे, ते इथं येऊन सांगा तिथं भिंतीआड चर्चा करू नका. • सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही. आम्हाला अर्धवट आरक्षण नको हा आमचा आग्रह आहे. निजामकालीन दस्तऐवज जमा करून त्याचा प्रथम अहवाल स्वीकारून, सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हे आमचं म्हणणं आहे. त्यामुळं तो रद्द करा. आम्हाला सरसकट आरक्षण द्या. • हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत थांबू शकत नाही, असा समाजाला शब्द दिला आहे, त्यामुळं आंदोलन थांबणार नाही. त्यांनी इथं येऊन सगळ्यांना आरक्षण देणार का? हे सांगावं. • वेळ पाहिजे हे आधी सांगत नाहीत. मराठा समाजाला गरम करून सोडतात. मला रक्त जाळायला लावतात आणि मग वेळ पाहिजे म्हणतात. पण मी रक्त जाळायला तयार आहे. Click- ● सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत: जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन Click-  ● मनोज जरांगे उपोषणावर ठाम, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहनही फेटा

सर्वपक्षीय बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी संवाद

इमेज
  मुख्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' 12 मुद्दे सर्वपक्षीय बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. • सर्वपक्षीय नेते, मंत्री, तसंच महाधिवक्ता आणि संबंधित अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. • मराठा आरक्षण मिळावं हे सर्वांचं एकमत या बैठकीत समोर आलं. • कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं मराठा आरक्षण द्यावं ही भावना याठिकाणी व्यक्त झाली आणि तसा ठराव झाला. • इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सर्वांनी मांडली. • दोन पातळ्यांवर सरकारचं काम सुरू आहे. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देणं आणि सुप्रीम कोर्टातील क्युरेटिव्ह पिटीशन या दोन्ही बाजूंनी काम सुरू आहे. • राज्यात ज्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, त्यावर सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांमुळं मराठा समाजाच्या शांततेनं आणि शिस्तप्रिय आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आंदोलक हिंसक होत आहे, त्यावर सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली. Click- ● सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत: जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन Click-  ● मनोज जरांगे उपोषणावर ठाम, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्य

वेळ म्हणजे किती आणि कशासाठी पाहिजे? - जरांगे

इमेज
  मनोज जरांगे उपोषणावर ठाम, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहनही फेटाळलं मराठा आरक्षणाच्या मागणीबाबतीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत, उपोषणावर ठाम असल्याचं जाहीर केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (1 नोव्हेंबर) आठवा दिवस आहे.    सर्वपक्षीय बैठकीनंतर तिकडे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले की, "सरकारला वेळ म्हणजे किती आणि कशासाठी पाहिजे? तसंच, सरसकट महाराष्ट्राला आरक्षण लगेच देणार का हे सांगावं, मग समाजाला विचारून पाहू. "मला बैठकीचा तपशील समजलेला नाही आणि मला जाणून घेण्याचीही इच्छा नाही. माझ्या समाजातील गरिबांचा जीव जातोय आणि सरकारला काळजी नाही. ते हसत आहेत, याला जनता सांभाळणारं सरकार म्हणावं का? Click- ● सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत: जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन Click-  ● मनोज जरांगे उपोषणावर ठाम, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय

सगळे पुढारी एकत्र: सर्वांचं एकमत : मराठा समाज काय निर्णय घेणार?

इमेज
 सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत: जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन मराठा आरक्षणाच्या मागणीबाबतीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत, उपोषणावर ठाम असल्याचं जाहीर केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (1 नोव्हेंबर) आठवा दिवस आहे. "मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी सर्व पक्षांचं एकमत आहे. मात्र, कायद्याच्या सर्व बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते. त्यासंदर्भात राज्यातील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करण्यास तयार आहेत," असं सर्वपक्षीय बैठक बोलावलं आहे. Click- ● सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत: जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन Click-  ● मनोज जरांगे उपोषणावर ठाम, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहनही फेटाळलं Click- ● सर्वपक्षीय बैठक: मुख्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' 12 मुद्दे Click- ● जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील 'हे' महत्त्वपूर्ण मुद्दे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा का

बीडमध्ये परिस्थिती निवळली, संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

इमेज
  बीड जिल्ह्यातील संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती बीड..... बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आज दिवसभर जिल्ह्यात संचारबंदी होती. यावेळी सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. जिल्ह्यातील वातावरण आता निवळलं आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीत उद्या सकाळी सहा वाजेपासून शिथिलता देण्याचा निर्णय घेतलाय. पण अद्यापही इंटरनेटबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही.              बीडमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे आज दिवसभर बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता देण्यात येणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी याबाबत माहिती दिली. “उद्या सकाळी 6 वाजता संचारबंदीत शिथिलता केली जाईल. पण जिल्ह्यात जमावबंदी लागू असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बीड जिल्हा उद्यापासून पूर्वरत होणार”, असंही जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत. ‘शाळा, महाविद्यालये, बसेस सुरू होतील’ “उद्या सकाळी सहा वाजता संचारबंदी शिथिल होणार आहे. मात्र जमावबंदी राहणार आहे. पाच पेक्षा

राजपान फुलचंदराव कराड यांचे निधन

इमेज
  भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांना पुत्रशोक  राजपान फुलचंदराव कराड यांचे निधन परळी (प्रतिनिधी) - श्री संत भगवान सेनेचे सरसेनापती भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड यांचे चिरंजीव राजपान फुलचंदराव कराड यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले फुलचंदराव कराड यांचे राजपान कराड हे एकुलते एक चिरंजीव होते राजपान कराड हे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून पदवीधर होते. सध्या ते परळी तालुका दूध व्यवसायिक सहकारी संघाचे काम पाहत होते. मनमिळावू,सुस्वाभावी अत्यंत हुशार होते.अशी त्यांची सर्वत्र ख्याती होती. आज मंगळवारी अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले.यामुळे ज्येष्ठ नेते फुलचंदराव कराड व कराड कुटुंबीयाला मोठा धक्का बसला आहे.या निधनामुळे सहकारी मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.राजपान कराड यांच्या पक्षात आई-वडील, चार बहिणी,दोन मुली असा मोठा परिवार आहे . राजपान कराड यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी मौजे लिंबुटा येथे बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे,असे शोकाकुल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

संचारबंदी: जिल्हाधिकाऱ्यां कडून बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू

इमेज
  संचारबंदी: जिल्हाधिकाऱ्यां कडून बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू बीड:बीड जिल्हयात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालू आहेत. दिनांक 29.10.2023 च्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. जिल्हयात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनास आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. आणि आज दि.30.10.2023 रोजी आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केली व काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.            बीड जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. त्यामुळे जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिपा मुधोळ मुंडे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी  प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये एकतर्फी बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्

शांतता राखा : शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचे आवाहन

इमेज
  उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक बीड, प्रतिनिधी......          बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. ३१.१०.२०२३ रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.                  मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण अंतरवली सराटी ता. अंबड जिल्हा जालना येथे सुरू केलेले आहे. उपोषणादरम्यान त्यांची आज रोजी प्रकृती खालवली असल्याचे सूत्रांकडून समजलेले आहे.या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्यता असल्याने, व काही समाजकंटक मराठा समाजाच्या नावाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण आंदोलन भरकटावे आंदोलनास हिंसक वळण लागावे या दुषित हेतूने काही लोक मराठा आंदोलनाच्या नावावर जाळपोळ व हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी तसेच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये व शांततेच्या मार्गाने चाललेले मराठा आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे चालावे, या

आणखी एका ज्येष्ठ आमदारांचा राजीनामा

इमेज
  मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षण:आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिला राजीनामा               पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी मराठा व धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आज आपला राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात मराठा ,मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आपण राजीनामा देत असून आपला राजीनामा स्वीकृत करावा अशा प्रकारची विनंती आमदार सुरेश वरपूडकर यांनी केली आहे.             मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी सर्वस्वी पाठिंबा देत असून सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावे.तसेच धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे, त्याची दखल न घेता धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण देण्याची भूमिका शासन घेताना दिसत नाही. धनगर समाजास उपेक्षित प्रवर्गातील आरक्षण जाहीर करावे.त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवाना सुध्दा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या प्रवर्गात आरक्षणाची गरज आहे. ते आरक्षण मुस्लीम समाजास देण्यात यावे. वरील मागण्यांसाठी मी माझा विधानसभा सदस्यत्वाचा

शरद पवार मराठा आरक्षण आंदोलनावर काय बोलले?

इमेज
  महाराष्ट्रात वणवा पेटेल अशी स्थिती -शरद पवार महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा उग्र बनला आहे. राज्यात ठिकठिकाणी नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आंदोलक आक्रमक होताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. पण, लांबवला आणि आता महाराष्ट्रात वणवा पेटेल की, काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. यावेळी पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याचाही उल्लेख केला मुंबईत राजकीय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शरद पवारांनी दोन तीन मुद्द्यांवर भूमिका मांडली. यात एक मुद्दा होता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आरक्षण. या मुद्द्यावर बोलताना शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवलं. शरद पवार मराठा आरक्षण आंदोलनावर काय बोलले? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख आता केला आणि ज्या कामासाठी पक्षाचे अध्यक्ष (जयंत पाटील) आता गव्हर्नरांकडे गेले तो एक आरक्षणाचा प्रश्न.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णय -

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण  व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णय  ✅ न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल. ✅ निवृत्त न्यायमूर्ती श्री.दिलीप भोसले, श्री.एम जी गायकवाड आणि श्री. संदीप शिंदे यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय झाला असून ही समिती मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात तसेच सरकारला मागासवर्ग आयोग आणि शासनाला मार्गदर्शन करेल. ✅ सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे राज्य शासनासमोर चांगली संधी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी आपण स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठक तातडीने घेण्यात येऊन त्यामध्ये पुढील न्यायालयीन लढाई लढण्याविषयी निश्चित दिशा ठरविण्यात येईल. ✅ सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह याचिकेवर न्यायालयीन कार्यवाही सुरु राहील. मात्र तो पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती श्री. आनंद निरगुडे हे कर

पिंपळनेर कडकडीत बंद; चौकात चौकात टायर जाळून निषेध

इमेज
  पिंपळनेर कडकडीत बंद; चौकात चौकात टायर जाळून निषेध पिंपळनेर, प्रतिनिधी....         बीड जवळील पिंपळनेर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू असून पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली होती. पिंपळनेर येथे कडकडीत बंद पाळण्यात येत असून चौकाचौकात टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे.        ठिकठिकाणी मराठा आंदोलन पेटलेले असून वेगवेगळ्या प्रकारे विविध मार्गांनी सुचेल त्या पद्धतीने मराठा समाज बांधव आंदोलन करत आहेत व आपला रोज व्यक्त करत आहेत आरक्षण द्यावे या मागणीसाठी साखळी उपोषण आंदोलन उपोषण याचबरोबर आता शासकीय कार्यालय सुद्धा टार्गेट करण्यात येत आहेत पिंपळनेर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला त्याच बरोबर चौकाचौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात येत होता

आ.सोळंके यांच्या घरा पाठोपाठ माजलगाव नगरपरिषदेलाही लावली आग

इमेज
  आ.सोळंके यांच्या घरा पाठोपाठ माजलगाव नगरपरिषदेलाही लावली आग     माजलगाव : मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले असून सोमवारी (दी.30) सकाळी अकराच्या सुमारास संतप्त मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावली. यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा माजलगाव नगरपरिषदेकडे वळवला. नगरपरिषद कार्यालयाला देखील संतप्त मराठा आंदोलकांनी आग लावली असून आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची कागदपत्रे जळून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.          मराठा समाजाच्या आंदोलन करताना माजलगाव नगरपरिषदेलाही आग लावली नगरपरिषदेमध्ये जाऊन आग लावून नगरपरिषदेला सर्व साहित्य संगणकाची मोडतोड करून मोठ्या प्रमाणात पालिकेचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण : परळी वैजनाथ प्रशासकीय इमारतीवर चढून केली जोरदार घोषणाबाजी

इमेज
  मराठा आरक्षण : परळी वैजनाथ प्रशासकीय इमारतीवर चढून केली जोरदार घोषणाबाजी परळी वैजनाथ.... मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना हिसक वळणाच्या घटनाही घटना दिसत आहेत. यातच वेगवेगळ्या पद्धतीने मराठा आंदोलक सुचेल त्या पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी टायर जाळणे, बस जाळणे ,रस्ते अडवणे, आत्महत्या आदींसह अनेक प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात घडताना दिसत आहेत. यातच आज परळी वैजनाथ प्रशासकीय इमारतीवर चढत काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. Click-  ■ *आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू*              एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत युवक आंदोलक हे परळीच्या उपविभागीय कार्यालय या प्रशासकीय इमारतीवर चढले होते. या ठिकाणी  चढून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाची मागणी केली .ठिकठिकाणी होणाऱ्या या अशा प्रकारच्या आंदोलनामुळे प्रशासनाची घालमेल होत असून तारांबळ उडताना दिसत आहे. Click- ■ *ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी : १८

ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी : १८ जण जखमी २ गंभीर

इमेज
  ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी : १८ जण जखमी २ गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज दि.३० रोजी पहाटे २.४५ वा.सुमारास परळीजवळ घडली या आपघातात १८ जण जखमी तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.             ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रक पांगरी ता. परळी वै जि बीड येथे पहाटे २.४५ वा.सुमारास पलटी झाला. तातडीने  108 रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाली.या अपघातात 18- ते 20 व्यक्ती ट्रकमध्ये होते.यातील 2 गंभीर जखमी असुन बाकीचे किरकोळ जखमी झालेआहेत.सर्व  रुग्णांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले. तसेच गंभीर रुग्णांनाअंबेजोगाई येथे दाखल करण्यात आले आहे.सर्व मजूर मानवत  जि परभणी येथील आहेत. घटनेची माहिती कळताच परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी आपघातग्रस्तांना उपचारार्थ मदत मिळण्यासाठी कार्यवाही केली. तातडीने  108 रुग्णवाहीका घटनास्थळी  दाखल होत सर्व रुग्णांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले.

आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू

इमेज
  आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू आंध्र प्रदेशात मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे विजियानगरममध्ये रविवारी दोन गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनमध्ये ही टक्कर झाली. बचावकार्य सुरू असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. याशिवाय एनडीआरएफच्या पथकांचीही मदत घेण्यात आली आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेने अपघाताची काही फोटो ट्विटवर शेअर केले हेत. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून काही डबे रुळावरून घसरल्याचे दिसून येते. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना नेण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा