पोस्ट्स

नोव्हेंबर २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS- *प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द*

इमेज
प्रामाणिकपणा : ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग केली सुपूर्द परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       ६५हजार रोख व अतिमहत्त्वाची कागदपत्रे असलेली रस्त्यावर सापडलेली बॅग पोलिसांकडे जमा केली व ज्याची होती त्याला सुपुर्द करण्यात आली.एका हाॅटेल चालकाने हा प्रामाणिकपणा दाखवला.त्याबद्दल पोलिसांनी त्यांचा सत्कार करुन कौतुक केले.        प्रामाणिक माणसेही आजही आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण शनिवारी परळीत घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. विशाल हॉटेलचे संचालक दत्ता लहूदास मुंडे यांनी हा प्रमाणिकपणा सिद्ध केला आहे. अंबाजोगाई येथील रहिवासी शेख सादेक हे परळीहून अंबाजोगाईला  रिक्षाने जात होते. आपली बॅग त्यांनी रिक्षाच्या मागच्या बाजूस  ठेवली. अंबाजोगाई येथे पोचल्यानंतर रिक्षातून उतरत असतांना आपली बॅग नसल्याचं लक्षात आलं.  परळी ते अंबाजोगाई रोडवर कण्हेरवाडी येथील विशाल हॉटेलचे मालक दत्ता लहूदास मुंडे यांना हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर बॅग पडलेली आढळून आली. बॅग त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. बॅग मालकाचा शोध घेतला.बॅगमधील महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम 65 हजार रुपये शेख

MB NEWS-प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले

इमेज
  प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले परळी वैजनाथ/प्रतिनिधी महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे या पार्श्वभूमीवर नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे (बबलू सेठ)यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले.   नागापूर जिल्हा परिषद गटातील नागापूर,मांडेखेल , अस्वल आंबा तडोळी दौनापूर वानटाकळी ,मोहा, गडदेवाडी ,कावळेवाडी तसेच परिसरातील संतप्त शेतकरी यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आंदोलन केले आंदोलन करताच सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.    परळी कार्यालयातील महावितरणचे उप अभियंता मा. आंबडकर साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तोडलेले कृषी पंपाचे कनेक्शन पूर्ववत करणार अशी ग्वाही दिली.       या आंदोलनास संबोधित करताना प्रदीप भैया मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत लोकनेते प्रा. टी.पी.मुंडे (सर)यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न

MB NEWS- *वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याचे धमकीचे पत्र ; पोलीस सतर्क-वेगाने तपास; दोघांना घेतले ताब्यात*

इमेज
 *वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याचे धमकीचे पत्र ; पोलीस सतर्क-वेगाने तपास; दोघांना घेतले ताब्यात*  परळी वैजनाथ,...        बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली. यामुळे संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.         शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहात होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर,

MB NEWS-कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे

इमेज
  कोणीही घाबरून जाऊ नये;वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील-ना.धनंजय मुंडे    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील.कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करुन ना.धनंजय मुंडे यांनी धमकीच्या पत्राबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.         🕳️अशी आहे ना.धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट.......      श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री ना. श्री. दिलीप वळसे पाटील साहेब, डिजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे.  कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे

MB NEWS-*'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' - धमकीच्या पत्रावरील मोबाईल नंबर इनव्हॅलिड* 🕳️ पोलिसांनी पत्र घेतलं गांभीर्याने;तपास वेगाने सुरू

इमेज
 '५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू' - धमकीच्या पत्रावरील मोबाईल नंबर इनव्हॅलिड 🕳️ पोलिसांनी पत्र घेतलं गांभीर्याने;तपास वेगाने सुरू    परळी वैजनाथ, प्रतिनिधी...              आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने परळीत एकच खळबळ उडालीय.              संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात कडून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलीसांनी तपासाची सूत्र हलवली आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव  हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत ह

MB NEWS-26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

इमेज
  26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्तदानातून श्रद्धांजली कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम परळी | प्रतिनिधी मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला तो आजचाच दिवस पण यात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या शूरवीरांना परळी येथिल 22 जणांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परळी व परिसरातील युवकांनी  रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला. आज शुक्रवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीरास सुरुवात झाली. अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. सदरील शिबिरात रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तपेढी व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या सर्वांचे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तर याकामी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील डॉ.अनुराधा डाके, शशिकांत पारखे, शेख, अफसर, यादव या

MB NEWS-जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*

इमेज
 * जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे-प्राचार्य अतुल दुबे* *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन व शहीद दिन साजरा.*         परळी वैजनाथ परळी वैजनाथ येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करत संविधान दिन व मुबंईच्या अतिरेकी हल्यात शहीदाना श्रद्धांजली अर्पण करून शहीद दिन साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याच अनुषंगाने यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले तर मुबंई येथील 26/11च्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रध्दांजली अर्पण करून शहीद दिन साजरा केला. या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे म्हणाले की समाजातील स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत या सर्वांना समान अधिकार देऊन सर्वसामान्य माणसाला सर्वच पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणारे जगात सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाचे आहे. या वे

MB NEWS-*कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संविधान दिन उत्साहात साजरा*

इमेज
  *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संविधान दिन उत्साहात साजरा* सोनपेठ दि.२६ (प्रतिनिधी) -           तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था  संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा  येथे  संविधान दिन साजरा करण्यात आला.           कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या संविधान दिन कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. एल. सोनकांबळे, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री आर. बी.जोशी, एस.एम. राठोड, एस.जी.चव्हाण, व्ही.पी. महाजन,एन.आर. निळे, हारगिले इ.एन.धनंजय भिसेगावकर,शुभम चाकुरे, लक्ष्मण आडे,मनिष चव्हाण, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

MB NEWS- *महाराष्ट्र विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*

इमेज
 *महाराष्ट्र विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा* परळी वै:दि 26 प्रतिनिधी         परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्यावतीने संविधान दिनानिमित्त *संविधान जनजागृती अभियान* राबविले.      या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच संविधान दिनी विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून *संविधान जनजागृती* केली विद्यार्थ्यांच्या हातातील फलक व घोषणाबाजी लक्ष्यवेधी ठरली.यानंतर गावातील मुख्य जागेवर संविधानाबद्दल शाळेचे पर्यवेक्षक विनायक राजमाने यांनी परिपूर्ण माहिती दिली.या नंतर शाळेत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देहमुख, सुदाम शिंदे, उपमुख्याध्यापक सुरेंद्र हरदास आदी मंचावरउपस्थित होते यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक मुरलीधर बोराडे यांनी संविधान

MB NEWS- *पंकजाताई मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात ; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती*

इमेज
पंकजाताई मुंडे दोन दिवस मध्यप्रदेशात ; भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थिती मुंबई ।दिनांक २५। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. भोपाळ येथे आज व उद्या होणाऱ्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्या पूर्णवेळ उपस्थित असणार आहेत.     मध्यप्रदेश भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची व विधिमंडळ सदस्यांची दोन दिवसीय बैठक भोपाळ येथे आजपासून होत आहे. मध्यप्रदेश भाजपच्या सह प्रभारी असल्याने या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे आज सकाळी विमानाने भोपाळ येथे दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर आगमन होताच  प्रदेश सरचिटणीस कविता पाटीदार, जिल्हाध्यक्ष सुमीत पचौरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, त्यानंतर बैठकीसाठी प्रदेश कार्यालयाकडे त्या रवाना झाल्या. बैठकीत प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, सरचिटणीस भगवानदास सबनानी यांनी त्यांचे स्वागत केले. ••••

MB NEWS-प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन

इमेज
  प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन *अन्यथा तीव्र आंदोलन करणार* परळी वै:दि 24 प्रतिनिधी   सेवांतर्गत प्रशिक्षण हा शैक्षणिक प्रक्रियेचा भाग आहे. आपल्या शिक्षक कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी दोन हजार रूपये शुल्क आकारण्याचा फतवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढला असून शुल्क आकारणी ताबडतोब रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे, सरचिटणीस व्ही.जी. पवार आणि राजकुमार कदम,बंडू अघाव  यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.         या बाबतीत मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली अधिक माहिती अशी की बारा व चोवीस वर्षांच्या अर्हताकारी सेवे नंतर शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ दिला जातो. यासाठी शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करते. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षण ही महत्त्वाची अट असल्याने

MB NEWS- *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले

इमेज
 *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले परळी--(प्रतिनिधी)      पेट्रोल आणि डिझेल चे भाव १०० रुपयाच्या पूडे गेल्यामुळे परळी शहरातील अँटोचे भाडे वाढविण्यात आले असून प्रवाशांसाठी ती एक समस्या होऊन बसली आहे.या अँटो भाडे संदर्भात शहर ट्राफिक पोलिसांनी पूढाकार घेऊन दरपत्रक निश्चित करणे गरजेचं असल्याचे मत युवा नेते मुन्ना बागवाले यांनी व्यक्त केले आहे.          या संदर्भात पूढे बोलताना ते म्हणाले की, परळी शहराचे बसस्टॅंड आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळचं आहे. तेथून परळीच्या कोणत्याही कोपर्‍याकडे जाण्यासाठी जवळपास  २ की.मी. चे अंतर पडते. प्रवाशांना अँटो केल्यानंतर पुर्वी जे भाडे द्यावे लागत होते त्यात गेल्या कांही दिवसापासून पेट्रोल व डिझेलमुळे भाडेवाढ झालेली आहे.                     *अडवणूक ?*           हे जरी खरे असले तरी अनेक वेळा वयस्क प्रवासी, महीला तसेच प्रवाशांसोबत सामानांच्या बॅगा पाहून कांही अँटोवाले त्यांना आव्वाच्यासव्वा भाडे सांगत असल्याची अनेक प्रवाशांकडून तक्रार होताना दिसत आहे. अशाप्रकारे अडवून घेतलेले भाडे प्रवाशांना देणे भाग पडत असून त्यांना विनाकारण

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.२४ नोव्हेंबर २०२१*

इमेज
    ⬛ आजचे राशिभविष्य ⬛        दि.२४ नोव्हेंबर २०२१                           मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील, कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहावे. वृषभ – भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायामध्ये प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मिथुन – कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक गोष्टींत हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहावे. कर्क – व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. यशाकडे वाटचाल कराल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. सिंह – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कन्या – आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल. तूळ – गुणगौरव होईल. सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल. एकंदर प्रगतीच्या दिशेने प्रवास कराल. कौटु

MB NEWS-ओबीसी आरक्षण संरक्षणाबाबत राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला -पंकजा मुंडे

इमेज
  ओबीसी आरक्षण  संरक्षणा बाबत राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला -पंकजा मुंडे मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा....        प्रत्‍येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका.    इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी राज्‍य सरकारची मानसिकताच नाही. राज्‍य सरकारने ओबीसी समाजाच्‍या पाठीत खंजीर खूपसला आहे. ,अशा शब्‍दात भाजप नेत्‍या पंकजा मुंडे यांनी आज राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला. त्‍या पत्रकार परिषदेत बोलत होत्‍या.          इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. राज्‍य सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवायचे आहे का, शेतकर्‍यांना पीक विमा दिला जात नाही. अतिवृष्‍टीग्रस्‍तांना सरकारने कोणती मदत केली. संकटात असणार्‍या शेतकर्‍यांकडून सक्‍तीची वीजबिल वसुली का सुरु आहे, असे सवालही पंकजा मुंडे यांनी केला.ठाकरे सरकारमध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून येत आहे. राज्‍य सरकारमध्‍ये विसंवाद असल्‍याने याचा फटका राज्‍यातील सर्वसामान्‍य नागरिकांना बसत आहे, अशी टीकाही त्‍यांनी केली.

MB NEWS-ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले - खा.डाॅ.प्रितम मुंडे

इमेज
  ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले - खा.डाॅ.प्रितम मुंडे बीड । दि.२३ । सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी पंधरा महिन्यांमध्ये सात वेळा सुनावणी घेतली,परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सातही वेळा वेळकाढूपणा केला, राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली.हा राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसींवर झालेला अन्याय असून ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप या सरकारने केले भाजप प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे. बीड शहरातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी आ.लक्ष्मण पवार,राजेंद्र मस्के,राम कुलकर्णी,देविदास नागरगोजे,भगीरथ बियाणी उपस्थित होते.राज्यातील मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारची असलेली उदासीनता यावेळी त्यांनी मांडली.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या लोकांनी न्यायालयात पिटीशन दाखल केल्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याची टीका त्यांनी केली.मागासवर्गीय आयोग स्थापन करून न्यायालयात इंपिरीकल डाटा सादर करण्याच्या सूचन

MB NEWS-२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी परळीत रक्तदान शिबिर ______________________________________________ 🕳️कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम 🕳️उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान 🕳️शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन _________________________________________

इमेज
  २६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी परळीत रक्तदान शिबिर ______________________________________________ 🕳️कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम 🕳️उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान 🕳️शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन _________________________________________ परळी | प्रतिनिधी २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून येथील कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान शिबीर आयोजित केले असून या शिबिरात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार  दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होत असून या शिबिरातील रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील पथक येणार आहे तरी शहर व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.२३ नोव्हेंबर २०२१*

इमेज
 ⬛ आजचे राशिभविष्य ⬛       दि.२३ नोव्हेंबर २०२१ मेष – दिवस लाभदायक जाईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल,आत्मविश्वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्वास वाढेल . वृषभ – बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक. मिथुन – आरोग्य उत्तम राहील, मनासारख्या गोष्टी घडतील, प्रसन्नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कर्क – संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकांना शब्द देऊ नका, गैरसमजातून वादविवाद होतील. सिंह – उत्साही राहाल, आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, आठवणींना उजाळा मिळेल. कन्या – आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कार्यसिद्धी होईल. तूळ – जुनेे आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे, नियमांचे पालन करा, नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा

MB NEWS-आज अंगारकी संकष्टी, जाणून घ्‍या तिचे माहात्म्य

इमेज
  आज अंगारकी संकष्टी, जाणून घ्‍या तिचे माहात्म्य आज मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी संकष्टी. त्यानिमित्त… पौर्णिमेनंतर जी चतुर्थी येते, तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. अमावास्येनंतर जी चतुर्थी येते, तिला विनायकी चतुर्थी म्हटले जाते. संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी मंगळवारी येते, त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटले जाते. ही अंगारकी संकष्टी विशेष अशी आहे. सर्व संकष्टींमध्ये तिचे महत्त्व अधिक मानले जाते. ही अंगारकी संकष्टी कल्याणप्रद आणि शुभदायक अशी मानली जाते. त्यामुळे तिचे माहात्म्य अधिक मानले जाते. अंगारकी संकष्टीचा उपवास आणि व्रत भाविकतेने केले जाते. मुदगल पुराणात अंगारकी संकष्टीचे माहात्म्य सांगणारी कथा आहे. त्यातून अंगारकी संकष्टीचा प्रारंभ कसा झाला, याची माहिती मिळते. मुदगल पुराणाप्रमाणे गणेश पुराणातही अंगारकी संकष्टीसंबंधीची कथा आहे.मुदगल पुराण आणि गणेश पुराण यात सांगितलेली कथा अशी – वेदविद्या पारंगत, प्रख्यात गणेशभक्त भारद्वाज ऋषी हे अवंतीनगरीत वास्तव्यास होते. त्यांचा पुत्र अंगारक. आपल्या पुत्राला त्यांनी गणेशमंत्र दिला. गणेश उपासना करायला सांगितले. अंगारकाने अरण्यात जाऊन

MB NEWS-नीट परीक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल* *पवनराजे अर्बन निधी बँकेच्या वतीने चि.यश श्रीकांत ढेेले याचा सत्कार*

इमेज
  नीट परीक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन उत्तीर्ण झाल्या बद्दल  पवनराजे अर्बन निधी बँकेच्या वतीने  चि.यश श्रीकांत ढेेले याचा सत्कार *परळी वैजनाथ / प्रतिनिधी* माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1300 रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले असून त्याच्या या यशाबद्दल आज सोमवार दि 22 नोव्हेंबर रोजी पवनराजे अर्बन निधी बँकेत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.     आज सोमवार दि 22 नोव्हेंबर रोजी पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेच्या वतीने परळीचे पहिले तहसीलदार स्व.मन्मथआप्पा ढेले व  माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सौ.सरोजीताई हालगे यांचा नातू चि.यश श्रीकांत ढेले याने माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1310  तर ओपनमधून 4010 वा रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले आहे. यश श्रीकांत ढेले याचा आज सोमवारी पवन राजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प

MB NEWS-चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेडचे कुलमुखत्यार त्रिंबकराव (तात्या) कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेडचे कुलमुखत्यार  त्रिंबकराव (तात्या) कुलकर्णी यांचे निधन परभणी, प्रतिनिधी......       परभणी शहरातील प्रसिध्द ऊद्योजक व चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेड चे कुलमुखत्यार श्री. त्रिंबकराव (तात्या)नागोराव कुलकर्णी*यांचे परभणी येथे  निधन झाले. ते परभणी शहरातील धार्मीक व सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर असायचे.         श्री त्र्यंबकराव { तात्या  )कुलकर्णी यांचे दिनांक २२/११/२०२१ रोजी  दुःखद निधन झाले आहे.शशिन व नीतीन कुलकर्णी यांचे ते वडील होत.त्यांचा अंत्यविधी दि.२२/११/२०२१ रोजी 3;00 दुपारी  वैकुंठ धाम स्मशानभूमी जिंतुर रोड, परभणी येथे होणार आहे.अंत्ययात्रा राहत्या घरून (तुकामाई) बाळासाहेब ठाकरे नगर, जिंतूर रोड येथुन निघेल. कुलकर्णी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांना पत्नीशोक

इमेज
  अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांना पत्नीशोक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी वकील संघाचे माजी अध्यक्ष व सर्व परिचित विधिज्ञ अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई गित्ते यांचे आज दि.२२ रोजी सकाळी निधन झाले.            सौ.ज्योती राधाकिशन गित्ते यांचे लातुर येथील फुलाबाई बनसोडे रुग्णालयात आज दि.२२ रोजी ८ वाजता निधन झाले.परवा परळी येथील खासगी रुग्णालयात त्यांचे एक आपरेशन झाले होते.पंरतु बीपी लो होत गेला त्यामुळे लातुर येथे अडमीट केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पती अॅड.आर.व्ही. गित्ते,दोन मुले असा परिवार आहे. परळी येथे आज दि.२२ रोजी सायंकाळी ४ वा.अंत्यसंस्कार होणार आहेत.गित्ते परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.        

MB NEWS-शिक्षणप्रेमी स्व. शामरावजी देशमुख

इमेज
  शिक्षणप्रेमी स्व. शामरावजी देशमुख             कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळीचे संस्थापक अध्यक्ष स्व. शामरावजी देशमुख यांचा आज  22  नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन. या निम्मीताने संस्थेच्या वतीने भव्य असा तीन दिवसीय स्मृतीसमारोह आयोजित करण्यात आला असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद  येवले यांच्या हस्ते या स्मृतीसमारोहाचे उद्घाटन होणार आहे.         कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. शामराव संतुकराव देशमुख हे परळी पंचक्रोशीत एक सामाजिक आणि दुसरे सांस्कृतिक क्षेत्रात दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. नव्या पिढीला कदाचित हा इतिहास माहिती नाही. परंतू हे वास्तव आणि सत्य आहे. परळी शहरात शिक्षणाची गंगा यावी. शिक्षण हे सर्वसामान्य बहुजन समाजापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही.         मराठवाडा हा 17  सप्टेंबर  1948  पर्यंत निजामाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे सहाजिकच मराठवाड्यात निजामाचे राज्य होते. त्याचेच कायदे कानून इथे लागू होते. त्यावेळेस परळ

MB NEWS- *ध्येयनिष्ट ध्येय पथिक...शामरावजी देशमुख*

इमेज
 ध्येयनिष्ट ध्येय पथिक... शामरावजी देशमुख* .........................स्व.शामरावजी देशमुख- -स्मृती समरोह निमित्याने आयोजित भरगच्च कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली.त्यात लिहलं आहे,कौटुंबिक विकासापेक्षा संस्थेचा विकास श्रेष्ठ मानून व मुलींचे उच्च शिक्षण हे ध्येय निश्चित करून ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा ध्येयासक्त व्यक्तीश्रेष्ठाच्या विचारांचा जागर घालण्या साठी... ते वाचून ,ती निमंत्रण पत्रिका पाहून मला स्व. शामरावजी देशमुखांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची प्रेरणा मिळाली.श्री संजयजींनी ही तशी इच्छा व्यक्त केली.... म्हणून स्व.शामरावजींना आदरांजली म्हणून ही शब्दपुष्पांजली . महिला उच्च शिक्षणाचे उद्दिष्टं स्वतःपुरते पक्कं करून,ज्यांनी निष्ठापुर्वक दमदार पावलं टाकली व अल्पावधीत ,प्रामुख्याने शहरासाठी व सर्व साधारणपणे मराठवाड्यात आदर्श ठरावे असे महिला ज्यूनिअर व वरिष्ठ महाविद्यालय उभे केले ,अशा व्यक्तीश्रेष्ठाचे कार्य जमेल तसे शब्दबध्द करण्याचा प्रयत्न.. शहराच्या केंद्रस्थानी कोट्यावधीचे मुल्य असलेल्या आपल्या जागेत ,शामरावजींनी या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची संस्थापना केली व

MB NEWS- ⬛ *नौकरी लावतो म्हणून पुण्याहून आणले परळीला व दोन दिवस केला इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार* 🕳️ *सोलापूरच्या ३८ वर्षिय महिलेची परळीच्या २४वर्षिय युवकाविरुद्ध फिर्याद दाखल*

इमेज
 ⬛ नौकरी लावतो म्हणून पुण्याहून आणले परळीला व दोन दिवस केला इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार 🕳️ सोलापूरच्या ३८ वर्षिय महिलेची परळीच्या २४वर्षिय युवकाविरुद्ध फिर्याद दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           परळीत नौकरीला लावतो, रूम बघून देतो असे म्हणून सोलापूरच्या एका ३८ वर्षिय महिलेला पुण्याहून परळीला घेऊन येऊन तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी परळी शहर पोलिसात परळीच्या एका २४ वर्षिय युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी परळी येथील रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी वय 24 वर्षे राहणार जंगम गल्ली, गणेशपार, परळी वैजनाथ याने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेला पुण्याहून परळीला आणले. परळी येथे तुला नौकरी लावून देतो असे अमिष दाखवुन तो तिला परळीला घेऊन आला असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. परळीत आल्यानंतर रूम बघून देतो असे म्हणून दिनांक 19 रोजी रात्री व दि.२० रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला. कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही तसेच इथेच मारुन टाकीन अशी ज

MB NEWS-*आजचे राशिभविष्य* ⬛ ््् *दि.२१ नोव्हेंबर २०२१*

इमेज
  *आजचे राशिभविष्य* ⬛      ््््*दि.२१ नोव्हेंबर २०२१* मेष ः चंगळवादावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. आपले काम चोख करा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास कमी होईल. वृषभ ः आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. स्वभावामुळे लोक आपलेसे होतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल. मिथुन ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. आळस व परावलंबित्व सोडावे लागेल. कर्क ः जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचा मार्ग मिळेल. नियोजनबद्धतेमुळे यशाकडे वाटचाल कराल. जीवलगांचा सहवास लाभेल सिंह ः वरिष्ठांची मर्जी राखाल. विश्‍वास संपादन कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्याचे कौतुक होईल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कन्या ः ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास द‍ृढ ठेवणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. नियमांचे पालन करा. तुळ ः उष्णतेचे विकार उद्भवतील. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची