पोस्ट्स

आरोग्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-*राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*

इमेज
 * महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत !* * राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* *ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गरजू, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळतोच -डाॅ.संतोष मुंडे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी मतदार संघात  रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत राबवला गेला. केवळ राशन कार्ड वितरित केले असे नाही तर राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळीत सांगितले. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फ

MB NEWS-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा- प्रा .डॉ . माधव रोडे

इमेज
  हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा- प्रा .डॉ . माधव रोडे धर्मापुरी: -  येथील राष्ट्रीय सेवा योजना,  कै . शंकरराव गुट्टे ग्रामीण कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  , धर्मापूरी ता . परळी यांच्या व  डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय निवासी शिबीर संकल्पना निरोगी  आरोग्यसाठी युवक - युवती विशेष शिबीराचा समारोप दि . २५ मार्च २०२२ रोजी संपन्न झाला . याशिबीरातून स्वच्छता अभियान, पर्यावरण संर्वधन उपक्रम राबविले . या उपकमाच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष जय भगवान सेवा भावी संस्थेचे  डॉ . शिवाजीराव गुट्टे तर प्रमुख पाहुणे एन . एस . एस . बीड जिल्हा समन्वयक प्रा . डॉ . माधव रोडे, प्राचार्य डॉ . टी. एल . होळंबे, प्रा . नारायण चाटे आदि उपस्थिती होते. या कार्यक्राम प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा . माधव रोडे म्हणाले, आपणास आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत ते मला वाटते  परिस्थिती बदला किंवा मनस्थिती बदला जीवन आपोआप बदलेल, प्रत्येकाच्या जीवनात अडचणीचा काळ येतो आपण धैर्यने सामोरे जावे , सरळ एक तत्व लक्षात ठेवा .  हे ही दि

MB NEWS-डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी

इमेज
  डॉ.संतोष मुंडे बनले दुवा - परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम:गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन राशन कार्डबाबतची सर्व कामे सुलभ पद्धतीने करुन देऊ- नम्रता चाटे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आज शुक्रवार, दि.25 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते  उद्घाटन झाले.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तहसील मधील राशनकार्ड पद्धत सुलभ करून देण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी दिले.     फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीर सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व त

MB NEWS-पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

इमेज
  सावधान ! आपण कोणते दुध वापरतो ? केमिकल पावडर पासून होतेय बनावट दुध निर्मिती ! पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात केज :- पाटोदा तालुक्यात केमिकल पासून बनावट व आरोग्याला हानिकारक असे दुध तयार करून ते दुधात मिसळून ते डेअरीवर विक्री करीत असल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही केली.          पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे पावडर पासून दुध आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे केमिकल पावडर पासून मानवी आरोग्याला धोकादायक असे दूध तयार करून ते बनावट दूध त्यांच्या जवळील दुधात मिसळून दूध डेअरीवर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले. दि. २५ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वा. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने नागेशवाडी येथे  बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध बनवीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी  तयार केलेले १६० लिटर दूध व केमिकल पाव