सामाजीक कार्यकर्त्या सौ.चंद्रकला कोल्हे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.चंद्रकला कोल्हे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित परळी (प्रतिनिधी) प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाउन कुटुंबाला सावरण्याबरोबरच सामाजीक, धार्मिक व पतीच्या व्यावसायीक क्षेत्रात मोलाचे कार्य करणार्या परळी येथील शिवम शॉपी च्या संचालिका सौ.चंद्रकला वैजनाथअप्पा कोल्हे यांना राजामाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवारी (ता.12) संगम येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व समाजकार्यात सक्रिय सहभाग असणार्या महिलांचा कार्यक्रमास व्यासपीठावर श्री क्षेत्र केदारनाथ उत्तराखंड येथील महामंडलेश्वर साध्वी सुश्री श्री वैष्णवी देवश्री दुर्गा, विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरणकुमार गित्ते,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.शालिनीताई कराड, परभणी जि.प.च्या माजी अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, माजी सरपंच सौ.वच्छलाताई कोकाटे, चेतना गौरशेटे, राधिका जायभाये, रमाताई आलदे, अ.भा. वारकरी भजनी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महार...