पोस्ट्स

ग्रामपंचायत निवडणूक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS:ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया

इमेज
  ग्रामपंचायत निवडणूक: परळीतील अशी असणार मतमोजणी प्रक्रिया परळी तालुक्यातील  76 ठिकाणी सरपंच व 625  इच्छुक सदस्य यांच्या निवडीची प्रक्रिया रविवार दि 18 रोजी संपन्न झाली असून सर्वांचे लक्ष्य उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.परळी तहसील कार्यालयात होणारी मतमोजणी 29 टेबलवर होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. Click &watch: ● *मासिक एकादशी पर्वकाळात पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ दर्शनाला भाविकांची रीघ.* _#mbnews # subscribe #like #share #comments_ ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. 20  रोजी मतमोजणी होत आहे. तहसील कार्यालयात यासाठी 29 टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी अधिकारी, 3 सहाय्यक असे 4 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे प्रत्येक टेबलवर एक या पद्धतीने तीन फेऱ्या होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. ------------------------------------------------------- MB NEWS: LIVE: अंबाजोगाई -भागवतकथा (पंचम दिन) ● भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज जोशी उखळीकर ● स्थळ: पंचमुखी हनुम

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले

इमेज
  ग्रामपंचायत निवडणुक: आ.धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क; मुंडे भगिनींचे मतदान राहिले परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नाथ्रा येथे आज आ.धनंजय मुंडेंनी  मतदानाचा हक्क बजावला मात्र पंकजाताई व खा.डॉ.प्रीतमताई मतदानाला काही अपरिहार्य कारणास्तव  पोहचू शकल्या नाही.त्यामुळे मुंडे भगिनींचे मतदान राहिले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व अधिवेशन सुरु असल्याने  खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.      नाथरा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी मुंडे भावंडांपैकीच अभय मुंडे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या विरोधातील वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांच्यासह प्रकाश मुंडे आणि रमेश मुंडे या दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे निवडणुक झाली. राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोघांचे फोटो अभय मुंडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर एकत्र आले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी रविवारी पंकजा मुंडे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाला येऊ शकल्या नाहीत.तर संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने खासदार डॉ. प्रितम मुंडे द

MB NEWS-मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात

इमेज
  मतदार दक्षिण आफ्रिकेत अन् मतदान झालं गावात आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आता बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत असतानाही त्याच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात हा खळबळजनक प्रकार घडला. काय आहे संपूर्ण प्रकरण - बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरी करत आहे. मात्र, त्याच्या नावाने मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या गावामध्ये उपस्थित नाही. मात्र, तरीसुद्धा त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले. यासंदर्भात झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली, जावी अशी मागणी होत आहे. • 

MB NEWS-ईव्हीएम मशीनमध्ये टाकले चिकटद्रव्य !

इमेज
  ईव्हीएम मशीनमध्ये टाकले स्टिकफास्ट ! बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली. बीड जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक ग्रामपंचायत साठी रविवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली.महसूल आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने जिल्ह्यात फार कोठे गैरप्रकार झाल्याचे चित्र दिसून आले नाही. दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीन मध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता.मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती.सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

MB NEWS:निवडणूक कामात कसूर ; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

इमेज
  निवडणूक कामात कसूर ; सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा  बीड- निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत वडवणी तालुक्यातील सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदान सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रविंद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे,

MB NEWS-मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू !

इमेज
  मतदानासाठी येणाऱ्या तरुणाचा दुचाकी – कारच्या अपघातात मृत्यू ! नेकनूर – ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानासाठी औरंगाबाद येथून केज तालुक्यातील आनंदगाव सारणीकडे चाललेल्या दुचाकीस्वराची समोरून येणार्‍या कारला मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर धडक बसल्याने यामध्ये दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. श्रीकृष्ण अनिल गायकवाड (वय 35) असे मयताचे नाव आहे. हा तरुण औरंगाबाद येथून दुचाकीवर क्र.(एमएच क्र.20 सीएक्स 1102) केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील ग्रामपंचायत मतदानासाठी जात असताना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावरील गवारी पाटी नजीक समोरुन येणार्‍या कारला क्र.(एम.एच.20 एल 7009) या गाडीला धडक बसली. अपघातातील या युवकाला नेकनूरच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.