MB NEWS:टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... परळी तालुक्यातील विकासात्मक कामात अग्रेसर ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने रविवार दि.०७.०५.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने रविवार दि.०७.०५.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. जि.प.प्रा. शाळा, टोकवाडी येथे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.आदर्श गाव, पाटोदा निर्मितीचे जनक भास्करराव पेरे पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ व माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन म...