MB NEWS- गंगाखेड, बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी

बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिला 178 लक्ष रुपये विकास निधी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीस मतदान संख्येनुसार निधी देण्याची आमदार गुट्टे यांनी केली होती घोषणा पालम येथे पार पडलेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बिनविरोध ग्रामपंचायतीस केले निधीचे वाटप गंगाखेड/प्रतिनिधी: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी गावातील मतदान संख्येनुसार प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून विकास निधी घोषित केला होता. बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस विकास निधीचा पहिल्या टप्प्याचे वितरण पालम येथे घेण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये करण्यात आले. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2020 21 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील एकूण 187 ग्रामपंचायती निवडणूका होऊ घातल्या होत्या यापैकी 25 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये गंगाखेड ...