राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी

राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी ना. मुंडे, पंडित, क्षिरसागर यांनी केली स्टेज आणि परिसराची पाहणी गेवराई, दि.२९ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१ ऑक्टोबर रोजी बीड येथे होणार्या राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी झाली असून ना.धनंजय मुंडे यांनी सभास्थळी जावून उभारलेला स्टेजची पाहणी करून उपस्थितांना विविध सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ.अमरसिंह पंडित, जि.प.सदस्य संदीप क्षिरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने बीड येथे पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१ ऑक्टोबर रोजी बीड येथील बागलाने ईस्टेट नाट्यगृहासमोर भव्यदिव्य राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे स्टेज ६०×४० असुन एक लाख लोक बसतील अशी व्यवस्था केली आहे. पुर्ण बीड शहरासह जिल्ह्यात बँनरच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेची संपूर्ण जय्यत तयारी झाली ...