MB NEWS- *महिला व बाल विकास विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी* 🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_
*महिला व बाल विकास विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित; हजारो विद्यार्थ्यांची मागणी* 🕳️ _परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून भरण्यात येणारी महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे परिक्षेची पूर्वतयारी करणार्यांना मानसिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षाधीन अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) ही पदे आता सरळसेवा परीक्षा पद्धतीने न भरता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत.ही पदे राज्यसेवा परीक्षेतून भरण्याऐवजी सरळसेवेने भरावित अशी हजारो विद्यार्थ्यांची मागणी आहे. अन्यथा परिक्षेची तयारी करणारे उमेदवार आंदोलनाच्या मार्गावर आहेत. ‘एमपीएससी’च्या या निर्णयावर परीक्षेच्या विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली ...