MB NEWS- *■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो*

■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो परळी / प्रतिनिधी देशाच्या स्वतंत्र संग्रामाप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास आहे.निजामशाहीच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देत शहीद झाले.मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास भावी पिढीला कळवा,त्यातून प्रेरणा मिळावी याकरिता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास पाठय पुस्तकात असावा असे मत संशोधन,गणितज्ञ डॉ.विवेक मॉंटोरो यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे 74 व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी पुणे येथील नवनिर्मिती फौंडेशनच्या संचालिका गीता महाशब्दे, स्वाती मोरे,संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,सखाराम शिंदे आदी उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.विवेक मॉंटोरो यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. अमेरिका येथील जागतिक ख्यातीचे स्टोनी ब्रूक या विद्यापीठातून गणितीय भौतिकशास्त्र या विषयात पीएचडी...