MB NEWS:दगडवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

दगडवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी परळी प्रतिनिधी. तालुक्यातील दगडवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सौदागर कांदे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दगडवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली तात्या गडदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य प्रा. डॉ. मधुकर आघाव, सामाजिक कार्यकर्ते भीमराव सातपुते, सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास बिडगर, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर सदस्य शिवदास बिडगर, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, प्रमुख वक्ते नवनाथ दाने, दादाहरी वडगावचे सरपंच शिवाजी कुकर, श्रीकांत मुलगीर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरा...