अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ?

● अंतर्मुख व्हा - विचार करा : मीच का ? मी कोणताही राजकीय व्यक्ती नाही, त्यातीलत मला काही समजत पण नाही, किवा समजावे अशी ईच्छा सुध्दा नाही, तसेच मी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभार्थी नाही, मग हा लेखन प्रपंच कशामुळे? वेळचं आली आहे! मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागील 24 वर्षांपासून कार्यरत आहे. आज सकाळी एक उच्चभ्रू कुटुंबातील आजी त्यांच्या नातवाला माझ्याकडे लसीकरणासाठी घेऊन आल्या होत्या. अमुक अमुक ठिकाणी चांगला 3500 रुपयांना दिला आज तोच डोस तुमच्याकडे घेण्यासाठी आले आहे. मी ते डोसचे सजवलेले कार्ड पाहिले व अजींना समजावून सांगितले हे सर्व डोस आणि यात अजून एक इंजेक्शन पोलिओचा डोस आपल्या जवळील ग्रामीण रुग्णालयामध्ये अगदी मोफत मिळतो. आजींनी जरा आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. आणि म्हणाल्या सर 12 वर्षांपूर्वी याचाच मोठ्या भावाला डोस देताना आपण म्हणाला होतात की यातील हे हे डोस सरकारी रुग्णालयात मिळणार नाही. ते आपल्याला इथेच घ्यावे लागतील. मग आता असे का म्हणतात. मी म्हणालो आजीबाई यालाच विकास म्हणतात. ...