MB NEWS:जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन--जिल्हाधिकारी राहुल रेखावार * बीड, दि. २७:-- जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार्या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून सदर कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी कोणत्या्ही रुग्णालयात दाखल होण्यासाठी काहीही अडचण येत असल्यास याबाबत माहिती साठी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे त्यासाठी नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जिल्ह्या रुग्णालयाचे डॉ सचिन आंधळकर आहेत. कक्षात नियुक्त शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांचे नाव , शाळेचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.