महाशिवरात्रीचे औचित्य; प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम

परळीत हजारो भाविकांनी घेतले बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन महाशिवरात्रीचे औचित्य; प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम परळी वैजनाथ/प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी बर्फाचे शिवलिंग श्री अमरनाथजींचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी 8 वा. मान्यवरांच्या हस्ते बर्फाचे शिवलिंग श्री अमरनाथजींची पुजा व आरती करण्यात आली. यावेळी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटीनगर, जुने पावर हाऊसच्या समोर, वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन भाविक भक्तांनी घेतले.