MB NEWS:त्रिंबकराव देशमुख यांचे दुःखद निधन

त्रिंबकराव देशमुख यांचे दुःखद निधन परळी । प्रतिनिधी शहरातील त्रिंबकराव सदाशिवराव देशमुख यांचे शुक्रवार दि.२५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८४ वर्षांचे होते. शनिवारी त्यांच्यावर परळी वैजनाथ येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा जेष्ठ नेते दत्ताभाऊ देशमुख यांचे वडील व वैद्यनाथ महाविद्यालयातील प्रा.एम.एल.देशमुख यांचे सासरे त्रिंबकराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्रिंबकराव देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागात अनेक वर्षे आपली सेवा बजावली आहे. अत्यंत नम्र, शांत आणि सुस्वभावी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्यांच्या जाण्याने परळीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. देशमुख कुटूंबियांवर त्यांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला असून, MB NEWS देशमुख कुटूंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.