सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सिरसाळा (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबीर दि. २९/१२/२०२३ शुक्रवार रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये नुकतेच संपन्न झाले. सदरील कार्यक्रमाचे उध्दघाटन बीड येथील के. एस. के. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागातील प्रा . डॉ. दुष्यंता रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. व्यंकटराव कदम हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. एन. वळेकर, बलभीम महाविद्यालय, बीड येथील नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. केशव भागवत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील, ...