MB NEWS:लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांचे काका स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गड येथे जाऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले. गोरगरीब, दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा, संघर्षाचा वसा आणि प्रेरणा घेऊन काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्यच करत नाही असे म्हणत ते त्रिवार नतमस्तक झाले.