इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे

 *परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे*



*मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी*



परळी/प्रतिनिधी...परळी शहराला पाणीपुरवठा करणारे वान धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे चार वर्षापूर्वी वान धरण ओव्हर फ्लो झाले होते परळी शहराला नगरपालिकेच्या वतीने दर पाच दिवसाला पाणीपुरवठा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे केला जात होता परंतु आता वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी शहराला एक दिवसाआड करून पाणीपुरवठा करावा व परळी करांची तहान भागवावी अशी मागणी  परळी नगरपालिकेचे  मुख्याधिकारी  यांच्याकडे  निवेदनाद्वारे  परळी मार्केट कमिटीचे  उपसभापती  प्रा. विजय मुंडे  यांनी केली आहे. तसेच शेतीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे.



   दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,वान प्रकल्पामध्ये पाणीसाठा हा आगामी काळासाठी आरक्षित सुद्धा राहिला पाहिजे जेणेकरून पिण्याच्या पाण्यासाठी परळी करांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे तसेच शेतकरी सुद्धा आनंदित झाला आहे कारण वान धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतीसाठी सुद्धा  पाणी  मिळणार आहे.



    परळीतील सामान्य माणूस हा सर्वस्वी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नळ योजनेवर अवलंबून आहे त्यामुळे त्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस  गंभीर होत चालली होती परंतु वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे अशी आशा सुद्धा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रत्येकच सामान्य माणसाकडे बोर अथवा विकत घेण्याची परिस्थिती नाही त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता प्रशासनाने एक दिवसाआड करून परळी शहराला पाणीपुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रा .विजय मुंडे यांनी केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!