MB NEWS-पट्टिवडगाव घटनेतील आरोपीच्या केज तालुक्यातुन पोलीसांनी बांधल्या मुसक्या

पट्टिवडगाव घटनेतील आरोपीच्या केज तालुक्यातुन पोलीसांनी बांधल्या मुसक्या अंबाजोगाई, प्रतिनिधी.... गावातीलच रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून एका १७ वर्षिय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली.याप्रकरणी 'त्या' रोडरोमिओ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाला आरोपीच्या अटकेबाबत निर्देश दिले होते. या प्रकरणातील आरोपी शोधून पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १०) अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली होती. गावातीलच एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०५ अन्व...