MB NEWS:श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न

श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न रविवारी डॉ. फत्तेपुरकर यांचे पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य शिबीरासह रक्तदान शिबीर परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी) भजनाच्या तालावर पावली खेळत चालणाऱ्या, एकाच रंगाच्या आकर्षक साड्या घालून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तसेच मंगल कलश मस्तकी धारण केलेल्या, हाती भगवा निशाण फडकावत मुखी गुरुराज माऊलीचा गजर करणाऱ्या महिला भगिनी आणि पांढऱ्या शुभ्र पोशाखात दोन-दोनच्या रांगेत शिस्तीने चालणाऱ्या पुरुषांनीही श्री शनैश्वर जन्मोत्सवाच्या आणि अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेची शोभा वाढवली. येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी श्री.शनैश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा प्रथमच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेची सुरुवात मोंढा मैदानातील हनुमान मंदिरापासून झाली. नियोजनानुसार महिला भगिनींनी भगव्या पताका, मंगल कलश, एकाच रंगाच्या साड्या, परमरहस्य ग्रंथाचे...