पोस्ट्स

गुन्हेगार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  न्यायालय परिसरात भांडण करु नका सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे पडले महागात: ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       येथील न्यायालय परिसरात भांडण करु नका असे सांगणाऱ्या पोलीसाशी झटापट करणे चांगलेच महागात पडले असुन ५ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click &watch: *⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. 14/12/2022 रोजी 12.15 वा. परळी कोटचि गेट समोर परळी वै. येथे असतांना यातील फीर्यादी पोह भास्कर गंगाधरराव केंद्रे हे आरोपींना येथे भांडण करु नका असे म्हणाले असता तुम्ही कोण पोलीस आम्हाला सांगणारे ,आमच्या घरातले भांडण आहे असे म्हणुन फिर्यादीचे अंगावर धावुन जावुन फिर्यादीचे शर्टला धरून त्यांचे शर्ट फाडले व फिर्यादीचे अंगाला झटापट करुन नखाने बोचकुरे घेतले. म्हणुन आरोपी  1 ) दिपक अंकुशराव घुगे वय 34 वर्ष रा. केहाळ ता. जिंतूर जि. परभणी 2) संतोष अंकुश

MB NEWS-1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले

इमेज
  1 लाख 38 हजाराचे दागिने तीन महिलांनी होतोहात लांबविले सोन्याचे दागिने पाहण्यास आलेल्या तीन महिलांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना परळी शहरातील सराफा बाजारात घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिला विरोधात सराफा व्यापारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न सराई सुरू असल्याने सराफा बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून येत असून परळी शहरातील सराफा बाजारात असलेल्या बालाजी टाक या सराफा दुकानातअनोळखी तीन महिला सोन्याचे दागीने घ्यायाचे आहेत म्हणून दाखल झाल्या.सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी दाखविलेल्या विविध सोनाच्या दागिन्यापैकी एक सोन्याचे 26.700 ग्रामचे सोन्याचे मिनीगंठण मिलीमिनी गंठन ज्याची किंमत 1 लाख 38 हजार 840  रु आहे तो दागिना सराफा व्यापारी यांची नजर चुकवत चोरून घेवुन गेल्या. या प्रकरणी दागिना चोरी गेल्याची माहिती झाल्यावर सराफा व्यापारी बालाजी टाक यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुरन 277/2022 कलम 379 भादवि नुसार अज्ञात तीन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्य

MB NEWS-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ

इमेज
  सिरसाळा: दहा हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास पकडले बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ बीड | सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. Click: ● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments        बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रकाश शेळके असे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्

MB NEWS-डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

इमेज
  डोक्यावरील विंगचे कारण: दोन डॉक्टरांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी बीड: मादळमोही येथे दोन डॉक्टरांमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे             विठ्ठलदास हरकूट आणि अतुल बिर्ला हे दोघे डॉक्टर आहेत. डॉक्टर हरकूट यांनी अतुल बिर्ला यांना तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं विचारलं आणि हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चार जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली.         दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय आणि याच अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस आरोपी डॉक्टरांचा शोध घेत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या दोघांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमध्ये हे दोन्ही डॉक्टर मादळमोही या गावी आपल्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात. एकाचा दवाखाना मोठ्या प्रमाणात चांगला चालतोय तर दुसऱ्या डॉक्टरांना मात्र हवा तसा प्रतिसाद येत नाहीये. दोन्ही क्लिनिकमध्ये अंतर ही फारसे नाहीये आणि यामुळेच या