नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील नैसर्गिक सानिध्यात असलेला एकमेव जॉगिंग ट्रॅक आहे. नगर परिषदेने येथे तात्काळ हायमास्ट लॅम्प बसवावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी केली आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाच्या या जॉगिंग ट्रॅकवर परळी शहरातील युवक - युवती दररोज विविध प्रकारचे खेळ खेळतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मैदानात सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी वयोवृद्ध महिला व पुरुष मंडळी पण बहुसंख्येने येत असतात. परंतु या मैदानाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने जॉगिंग ट्रॅक वर येणाऱ्या युवकांसह नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी सोबतच सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. त्याकरिता नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवेश्वर कॉलनीतील वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर नगर परिषदेने हायमास्ट लॅम्प तात्काळ बसवावेत. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.