MB NEWS:पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन

पांगरी येथे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन परळी वैजनाथ दि.२८ येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीराचे आयोजन दि.२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या विशेष युवती शिबीराचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२७) उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख प्रमुख पाहुणे माजी सरपंच अक्षता सुशिल कराड, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ अमोल गंगणे, मंडळ अधिकारी मंगल मुंडे, माऊली मुंडे,दत्तराव कराड, नंदकिशोर मुंडे,अजित तिडके, महादेव कराड, सचिन तिडकेसह महाविद्यालयाचे प्राचार्य ड...