पोस्ट्स

उपोषण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS- *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा* _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_

इमेज
 *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा*  _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         पदवी आधारे व प्रकल्पग्रस्ता अधारे थर्मल पावर स्टेशन, परळी येथील युनिट क्र.६, ७ व ८ मध्ये जलप्रक्रिया विभागामध्ये सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना सरळ सेवा भरतीमध्ये न्याय द्यावा या मागणीसाठी दि.१० आॅगस्ट पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.          महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ दि. १८.०४.२०१७ काढण्यात आलेले आहे.सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना या परिपत्रकात जाणुन बुजुन डावलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर प्रगतकुशल श्रेणीमध्ये समाविष्ट असतानाही सरळसेवा

MB NEWS-उद्या मिळणार पेन्शन: नगर परिषदे समोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखी हमीनंतर उपोषण मिटले

इमेज
उद्या मिळणार पेन्शन: नगर परिषदे समोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखी हमीनंतर उपोषण मिटले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी यांची फेब्रुवारी व मार्चची पेन्शन मिळावी म्हणून 11 एप्रिल पासून नगरपरिषदे पुढे उपोषण सुरू केले होते.नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या दोन वेळेसच्या बोलणीत मार्ग निघू शकला नव्हता.त्यामुळे उपोषण सुरुच होते.आज दि.१२ रोजी न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मुख्याधिकारी मुंडे, संतोष रोडे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उद्या दि.१३ रोजी पेन्शचे पैसे देण्याची लेखी हमी दिली.त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.           सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पेन्शन व अन्य मागण्यांसाठी  नगर परिषद समोर उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर रास्त मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या दोन वेळेसच्या बोलणीत चर्चा झाली मात्र बोलणी फिसकटली होती.या उपोषणाला सेवानिवृत्त महिला कर्मचारी यांच्यासह ५०पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.आज यावर मार्ग काढण्यासाठी नप गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मुख्याधिकारी मुंडे, संतोष रोडे यांनी