पोस्ट्स

आंदोलन लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

MB NEWS-विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन

इमेज
  विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन  भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - राज्यात सुरू केलेले अघोषित भारनियमयाविरुद्ध आता भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.भाजपा  राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने परळी येथील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत  तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यलयापर्यंत काढण्यात आली.यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे राज्यात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रापैकी 750 मॅगाव्हेट चे प्रकल्प आहेत.या प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातले नागरिक भोगत आले आहेत.असे असतानाही परळी परिसरात होणारे

MB NEWS-महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन

इमेज
  महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी..          महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई यांनी केला होता. आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त होऊन त्यांनी तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नायब तहसीलदार रुपनर यांच्या दालनात बेशरम फेकीत प्रशासनाच्या "बेशरमपणाचा" कार्यकर्त्यांनी निषेध केला असे काॅंग्रेस पदाधिकारी यांनी म्हटले आहे.          महसुलचे अधिकारी पक्षपातीपणे काम करतात असा आरोप पत्रकार परिषदेत  काॅंग्रेस शहराध्यक्ष बहादूरभाई  यांनी केला होता.परळी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पक्षपाती काम करत आहेत महसूल प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रेशन कार्डधारकांच्या मुद्यावर काँग्रेसकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांची नवे वगळून ज्यांना धान्य मिळत नाही त्यांना दे