पोस्ट्स

पुजा लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे आयोजन

इमेज
आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम  परळी (दि. 14) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी येथे तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी 7 वा. प्रख्यात गायक उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' हा कार्यक्रम शहरातील मोंढा मैदान येथे होणार आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला उदय साटम यांचा 75 कलाकारांचा चमू व त्यातून साकारण्यात येणारी भीम वंदना म्हणजे अलौकिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  या तीन दिवसीय महोत्सवांतर्गत दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. कलारंजना मुंबई, निर्मित व उदय साटम दिग्दर्शित 75 कलाकारांचा समावेश असलेला वंदन भीमराया हा कार्यक्रम होईल. दि. 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा लाईव्ह भीम गीतांचा जंगी कार्यक्रम होईल व अखेरच्या दिवशी 17 एप्रिल रोजी प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होईल. ह...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या