पोस्ट्स

अडचण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा

इमेज
  शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व विमा लागू करावा अशी मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे. परळी शहर व तालुक्यात मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना गुरुवार दि 20 रोजी अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत.यातच गाढे पिपळगाव येथील 25 वर्षीय युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून जात दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही वीज पडून मृत्यू झाले. सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक

MB NEWS-पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी _तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला केल्या सूचना_ परळी वैजनाथ ।दिनांक २१। गुरूवारी मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळीच कौठळी, तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.    काल रात्री तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही गावात  ढगफुटीसदृश पाऊस झाला. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली. पिकासोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.     पंकजाताई मुंडे यांनी आज तळेगाव, कौठळी शिवारातील शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदतीचा शब्द दिला. यावेळी तहसीलदार शेजूळ उपस्थित होते, त्यांना नुकसानीचा अहवाल तातडीने शास

MB NEWS-77 वर्षीय शेतकऱ्याने सांगितले आपल्या आयुष्यात एवढा पाऊस बघितला नाही

इमेज
  विदारक परिस्थिती: गेल्यावर्षीचं 100 अन् यंदाचे कट्टे 150 कट्टे सोयाबीन पाण्यात ;कोंबड्या मेल्या:अख्या घरात पाणीच पाणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....      परतीच्या पावसाने हाकार मांडला असून शेती शेतीतील पिके रानातले घर पाळलेले पशु या सर्वच घटकांवर या पावसाने वरवंटा फिरविण्याची चित्र निर्माण झाले आहे काल परळी तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत उरलंसुरलं सर्व खतम करून टाकला आहे अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकरी आपापली व्यथा मांडताना दिसत आहे यातच बेलंबा येथील वय वर्ष 77 असलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले की आपल्या आयुष्यात आपण एवढा पाऊस पाहिलेला नाही रानातील घर जमिनीपासून तीन फूट उंचावर बांधलेले आहे या घरात असलेले गेल्या वर्षीचे व यावर्षीचे सगळे सोयाबीन पाण्यात गेले आखाड्यावर असलेल्या पाळलेल्या कोंबड्या मेल्या सगळ्या घरात पाणीच पाणी झालं अशा परिस्थितीत नेमकं करावं काय असा खिन्न प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.         प्रभू धर्म गिरी रा.बेलंबा यांचे घरात कालच्या पावसाचे पाणी घुसल्याने यावर्षी झालेले 150 कट्टे सोयाबीन व मागच्या वर्षीचे 100 कट्टे सोयाबीन घरातच होते. ते सर्व पाण्य

MB NEWS-विदारक परिस्थितीत पंचनामे न करता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - संभाजी ब्रिगेड

इमेज
विदारक परिस्थितीत पंचनामे न करता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी  हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - संभाजी ब्रिगेड  परळी (प्रतिनिधी) तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.  मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे परळी तालुक्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये व काल खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन शंभर टक्के गेलं आहे एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार असून क

MB NEWS- प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना

इमेज
 प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी  सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. परळी तालुक्यातील मोजे संगम येथे रात्री विजेच्या कडकडाटासह अतिशय जोरदार पावसाचा कहर झाला. प्रा.टी.पी.मुंडे (सर )यांनी संगम येथे पुलाची, घरांची तसेच शेतातील पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. संगम वस्ती व गावाला जोडणाऱ्या पुलावरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्यामुळे गावचा संपर्क तुटला असून गावातील घरात पाणी शिरले आहे त्यामुळे घरात ठेवलेले सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिके भिजवून गेली आहेत. पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.    संगम वागबेट येथील तलाठी श्रीमती गोरे मॅडम यांना सोबत घेऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पुलाची घरात भिजलेले पिके आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तसेच सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी यांना दिल्या. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी तेथील नागरिकांशी तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना धीर दिला.   रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे य

MB NEWS-पुराच्या पाण्यात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू: मृतदेह शोधून काढण्यात यश

इमेज
  पुराच्या पाण्यात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू: मृतदेह शोधून काढण्यात यश परळी शहर व तालुक्यात गुरुवार दि 20 रोजी रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावत अक्षरशः दाणादान उडविली. विजेच्या कडकडाटासह अनेक तास धुंवादार पाऊस झाल्याने शहर व तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले.परळी तालुक्यातील गाढे पीपळगाव येथील अक्षय विक्रम आरगडे हा 25 वर्षीय युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला असून परळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर  व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवीत शोध कार्य सुरू केले.वाहून गेलेल्या अक्षय आरगडे याचा मृत देह आढळून आला आहे.सध्या अनेक ठिकाणी नदी,ओढे याला पूर आला असून यातुन कोणीही प्रवास करण्याचे धाडस करू नये असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. ● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...... ■ *उरलं, सुरलं सगळं ऽऽऽऽऽऽऽ संपलं......!* ■ _All the rest, everything is over...!_ *#mbnews #subscribe #like #share #comments*

MB NEWS-कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

इमेज
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश  मुंबई, दि.२०-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.   अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना  प्रशासनाला देण्यात आल्या. ००००

MB NEWS-शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सरसकट विमा लागू करावा— प्रा.टी.पी.मुंडे

इमेज
  शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन  सरसकट  विमा लागू करावा— प्रा.टी.पी.मुंडे   मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे  मागणी! परळी वैजनाथ प्रतिनिधी बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः रुद्र रूप धारण केले असून शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. संपूर्ण पीक शेतकऱ्याचे नष्ट झाले शासनाने प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सरसकट पिक विमा लागू करावा तसेच तलाठी यांच्यामार्फत सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.     सध्या सुगीचे दिवस असून शेतकऱ्यांना मात्र आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाच्या पाण्यामुळे नष्ट झाले त्यामुळे शेतकरी हातबल झाला असून त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच परतीच्या पावसाने रुद्र रूप धारण केले असून शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेले आहे.    

MB NEWS-शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा -कैलास नाईकवाडे पाटील

इमेज
  शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा - कैलास नाईकवाडे पाटील  परळी वै ( प्रतिनिधी ) तालुक्यांत परतीच्या पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत , परळी  तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये परतीच्या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका तूर आदींचा समावेश आहे नु क सा न झाल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी परळी चे  शिवसंग्राम शहर अध्यक्ष कैलास नाईकवाडे पाटील यांनी केली आहे

MB NEWS-नुकसानीची पहाणी: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर थेट बांधावर

इमेज
  नुकसानीची पहाणी: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर थेट बांधावर बीड- कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या तोडणीनंतर चार पैसे हातात येतील अन दिवाळी जोरात साजरी होईल या बळीराजाच्या आशेवर सततच्या पावसाने पाणी फेरलं अन बळीराजा कोलमडून पडला.या शेतकऱ्याला थेट बांधावर जात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आधार दिला.नुकसानभरपाई निश्चित मिळेल,काळजी करू नका अस म्हणत केंद्रेकर यांनी गेवराई, बीड,आष्टी,पाटोदा या भागातील शेतकऱ्यांना आधार दिला. औरंगाबाद चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत गेवराईत रस्त्यावरील काही शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले, त्याठिकाणी शेतकरी चिखलामध्ये कापसाची वेचणी करत होते. शेतकर्‍यांनी केंद्रेकरांना पाहताच आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. तेव्हा केंद्रेकरांनी नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, हे सांगायची गरज नाही. आपणाला मदत मिळेल, वस्तूस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे उपस्थित शेतकर्‍यांना केंद्रेकरांनी आश्वासीत केले बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडून शेतातील पिके

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले ! सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची  मागणी पंकजाताई मुंडे यांनी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या  पिकांची केली पाहणी बीड । दिनांक १९। परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीनसह अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे, अशा संकटात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. तालुक्यातील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त शेती पिकांची आज पाहणी करून पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना मदतीचा विश्वास दिला.    जिल्हयात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या शेतातील पिकांची अक्षरशः माती झाली आहे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी आज मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील जाधववाडी शिवारात शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतात अक्षरशः पाण्याचे तळे साचले असून पिके पूर्णपणे उध्वस

MB NEWS-■ नुकसान भरपाई व विमाप्रश्नी किसान सभेचे जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार निदर्शने

इमेज
  ■ नुकसान भरपाई व विमाप्रश्नी किसान सभेचे जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार निदर्शने ◆ दिवाळी पूर्वी शासन व प्रशासनास दिला इशारा बीड/परळी : प्रतिनिधी सैंपल सर्वे'द्वारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिकविमा मंजूर करून तो वितरित करावा व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन मदत देण्यात यावी या मागणीला घेऊन पुन्हा एकदा किसान सभेचे लाल वादळ दिवाळी सणापूर्वी जिल्हाधिकारी कचेरीवर धडकले.या निदर्शने आंदोलनात जिल्ह्याभरातुन मोठ्या संख्येने शेतकरी,शेतकरी पुत्र,तरुण सहभागी झाले होते.यावेळी संतप्त शेतकरी पुत्रांनी भ्रष्ट पीक विमा कंपनी व कंपनी धार्जिनी सरकारचा प्रतिकात्म पुतळ्याचे दहन केले. गतवर्षी विमा प्रश्नी किसान सभेने शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळी साजरी केली होती आजच्या या निदर्शने आंदोलनाने गतवर्षीचा प्रश्न आणखी सुटला नसल्याने हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून,जुलै मधील अतिवृष्टी, ऑगस्ट मधील 21 दिवसापेक्षा अधिक काळ पावसाचा खंड आणि 11 ऑक्टोबर पासून बीड जिल्ह्यातील विविध महसूल मंडळात परतीच्या पावसाची अतिवृष्टी होत आहे. आकाशातील

MB NEWS-परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास

इमेज
  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास                      परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार मांडला असून काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले असून सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक बनली आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. अशी मागणी होत असताना भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना व्यथीत करणारी परिस्थिती निर्माण झालेली असून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकार निश्चित करेल असा विश्वास  व्यक्त केला आहे.          भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था परतीच्या पावसाने व अतीवृष्टीने व्यथीत करणारी झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार निश्चित उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या माध