परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन नुतन कार्यकारिणी जाहीर

परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन नुतन कार्यकारिणी जाहीर सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा नुतन कार्यकारिणीचा निर्धार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.29 - विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहून सामाजिक जाणीव जागृत ठेवणारे संघटन म्हणून परिचित असलेल्या परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.यामध्ये सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली.विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन च्या माध्यमातून विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन चे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिलेले आहे.सामाजिक चळवळीत अग्रेसर परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन ची नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्...