पोस्ट्स

वैद्यनाथ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई

इमेज
  प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई  परळी (प्रतिनिधी) विजयादशमीच्या दिवशी प्रभुवैद्यनाथांची पालखी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने काढण्यात येते. देवी काळरात्रीच्या भेटीला प्रभू वैद्यनाथ विजयादशमीच्या दिवशी पालखीमध्ये बसून जातात अशी आख्यायिका आहे. पालखीचे भोई म्हणून दरवर्षी निघणाऱ्या या पालखी उत्सवाचा मान परळी शहरातील भोई समाजाला असतो. प्रभू वैद्यनाथ आणि देवी काळरात्री यांचे बहीण भावांचे नाते आहे. विजया दशमीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथ बहिणीसाठी म्हणजेच काळरात्री यांना बोळवण (साडी - चोळी) घेऊन जातात. सनई - चौघडे आणि वाजंत्रीच्या निनादात शहरात पालखी काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी उत्सव जोरात साजरा करण्यात आला. यंदाचा पालखीचा मान आयलोजी घटमल यांच्यासह भोई समाजातील बांधवांना मिळाला. पालखीच्या सुरुवातीला खांदा देऊन भोई समाज बांधव पालखीची सुरुवात करतात

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे आयोजन

इमेज
आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम  परळी (दि. 14) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी येथे तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी 7 वा. प्रख्यात गायक उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' हा कार्यक्रम शहरातील मोंढा मैदान येथे होणार आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला उदय साटम यांचा 75 कलाकारांचा चमू व त्यातून साकारण्यात येणारी भीम वंदना म्हणजे अलौकिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  या तीन दिवसीय महोत्सवांतर्गत दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. कलारंजना मुंबई, निर्मित व उदय साटम दिग्दर्शित 75 कलाकारांचा समावेश असलेला वंदन भीमराया हा कार्यक्रम होईल. दि. 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा लाईव्ह भीम गीतांचा जंगी कार्यक्रम होईल व अखेरच्या दिवशी 17 एप्रिल रोजी प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होईल. ह