पोस्ट्स

जानेवारी ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-*संत दत्तशरणानंदजी महाराजांचे होणार गौतम खटोड यांच्या निवासस्थानी आगमन* *बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन*

इमेज
  *संत दत्तशरणानंदजी महाराजांचे होणार गौतम खटोड यांच्या निवासस्थानी आगमन* *बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन* बीड (प्रतिनिधी) परम श्रद्धेय गोऋषि स्वामी संत दत्त शरणानंदन्दजी महाराज आज दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी औरंगाबादला बीड मार्गे जाणार आहेत. या दौऱ्यात ते दोन तास  बीडकरांसाठी वेळ देणार आहेत. येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या एमआयडीसीतील आकाशवाणी नजीकच्या निवासस्थानी ते सकाळी 12 ते दुपारी 3 यावेळेत थांबणार  आहेत. बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी केले आहे. दत्तशरणानंदजी महाराज यांनी गोसेवेच्या माध्यमातून हजारो गायींचे रक्षणासाठी पुढाकार घेतला.राजस्थान पतमेढा येथे 8 ठिकाणी मिळून 1 लाख 20 हजार गोमाता व नंदीचा सांभाळ केला जातो. एकाच ठिकाणी एक सारखे १७ हजारापेक्षा पेक्षा जास्त नंदी या गोशाळेत आहेत. सर्वात मोठे गोरक्षण म्हणून या गोशाळेची गणणा आहे. तेथील गोसेवक श्री स्वामी दत्तशरणानंदजी बीड शहरात येत आहेत. बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड साम

MB NEWS-*रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_

इमेज
  *रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          श्रीहरिकोटा (राजस्थान) येथील देशभरातील नामांकित आणि अग्रगण्य "रेजोनंस करीअर अकॅडमी "यांनी परळी मधील फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे "इंटिग्रेटेड स्कूल" सुरु केले आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना  रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल असे प्रतिपादन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.         फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला, रेजोनंस चे उपाध्यक्ष अजय नागर ,नागेश त्रिपाठी ,अकॅडमीक चीफ झा ,रितू तोतला ,प्रभारी मुख्याध्यावपक गजानन  यांच्यासह गुरुजन,पालक व विद्यार्थी शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था समुपदेशक म्हणून चेतन सौंदळे यांची नियुक्ती

इमेज
  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था समुपदेशक म्हणून चेतन सौंदळे यांची नियुक्ती परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांनी जारी केली असून औरंगाबाद बोर्डामार्फत परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी 16 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 12 तर बीड जिल्ह्यातील 4 समुपदेशकांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यातील समुपदेशकामध्ये परळी तालुक्यातील नंदनज येथील श्री केदारी महाराज विद्या मंदिर या शाळेतील व सर्व परळीकरांना ज्ञात असलेले व्यक्तिमत्व श्री.चेतन अरविंद सौंदळे यांची मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 व 12 वि बोर्ड परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना कोणते ही व कशा ही प्रकारे दडपण येत असेल त्यांनी निःसंकोचपणे  9422930599  या माझ्या मोबाईल क्रमांकावर फोन करावा श्री.चेतन अरविंद सौंदळे मार्गदर्शक व समुपदेशक,बीड म.रा.शै.श.व प्र संस्था,पुण

MB NEWS-अतुलनीय:प्रा. अतुल दुबे वाढदिवसाच्या शुभेच्छा......

इमेज
अतुलनीय:प्रा. अतुल दुबे वाढदिवसाच्या शुभेच्छा...... . नेतृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशील पणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व अतुल दुबे या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्‍नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. अतुल दुबे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.                -प्रा.रविंद्र जोशी @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ *🟥 विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्राचार्य अतुल दुबे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!* ---------------------------------------- _MB NEWS ला नक्की

MB NEWS-अँड.मनोज संकाये यांच्या समाज कार्याची समाज बांधवांनी घेतली दखल!* *मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य साधून अँड.मनोज संकाये याचा समाज बांधवांनी केला सत्कार!*

इमेज
  अँड.मनोज संकाये यांच्या समाज कार्याची समाज बांधवांनी घेतली दखल!* *मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य साधून अँड.मनोज संकाये याचा समाज बांधवांनी केला सत्कार!* परळी/प्रतिनिधि लोकमत पर्सन ऑफ द डे साठी येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या समाजकार्याची दखल घेत मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य  साधून समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला.     महाराष्ट्रातील वाचकांच्या पसंतीला उतरलेले अग्रेसर दैनिक लोकमत च्या वतीने बीड जिल्ह्यातील विविध नेते, समाज कार्यकर्ते यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी लोकमत पर्सन ऑफ द डे यासाठी निवड केली जाते. यामध्ये त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेतली जाते त्यातच परळी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अँड.मनोज संकाये यांचा समावेश करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला होता त्यानिमित्ताने मनमथ स्वामी जन्मोत्सवाचे औचित्य साधून समाज बांधवांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा लोकमत पर्सन ऑफ द डे ची फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला.त्यानी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये दिवाळीचा फराळ गोरगरीब मंदिरासमोर बसणारी गरीब लोक यांना ब्लँकेटचे वाटप के

MB NEWS-*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग*

इमेज
*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग .....  *परळीत श्री. संत मन्मथस्वामी महाराजांचा जन्मोत्सव थाटात साजरा* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-* येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये विरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या जन्मोत्सव आज शनिवार दि.5 फेबु्वारी 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींचा जन्मोत्सवानंतर आरती झाली. गुरूवारपासुन श्री मन्मथस्वामी महाराजांचे तीन दिवसीय परम रहस्य पारायणास प्रारंभ झाला होता, शनिवारी जन्मोत्सवचा कार्यक्रम झाला.यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या महिला  सहभागी झाल्या. गुरूराज माऊली, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय अशा जयघोषाचा निनाद करण्यात आला. शनिवारी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महिलांची उपस्थिती होती. सकाळी पारायण दुपारी जन्मोत्सव व महाप्रसाद झाला व तीन दिवसीय पारायण कार्यक्रमाची सांगता  झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव  लिंगायत समाज परळीच्या महिला, पुरूष व युवकांनी अथक परिश्रम घेतले. दरम्

MB NEWS- *बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते गणेश जयंती निमीत्त गणेशपारावरील "श्रीं"ना अलंकार अर्पण*

इमेज
 *बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते गणेश जयंती निमीत्त गणेशपारावरील "श्रीं"ना अलंकार अर्पण*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      गणेश जयंतीनिमीत्त गणेशपार येथील प्राचीन आराध्य दैवत गणेश मंदिर येथे गणरायांच्या मूर्तीला सर्व भक्तमंडळी यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चांदीचा मुकुट अलंकार माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.         गणेशपार भागातील गणेश मंदिर म्हणजे प्राचीन आणि जागृत देवस्थान.राज्याचे सामाजिक न्याय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या सहकार्यातून गणेश मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे.अनेक गणेशभक्त दररोज गणरायाचे नित्यदर्शन घेवूनच आपले कामकाज सुरुवात करतात. दि.४ रोजी गणेश जयंती निमीत्त  चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. या सोहळ्यास नंदुकाका रामदाशी,नारायण देव गोपनपाळे, राजु भंडारी, चारुदत्त करमाळकर, सौ.कडगे, विनोद कौलवार, पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी,प्रकाश वर्मा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

MB NEWS-शिस्तप्रिय मुख्याध्यापिका छाया नाईक- कुलकर्णी सेवानिवृत्त

इमेज
  शिस्तप्रिय मुख्याध्यापिका  छाया  नाईक- कुलकर्णी सेवानिवृत्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......      परळी शहर व परिसरात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका व जि.प.प्रा.शाळा दाऊतपूर या.परळी वै. येथील शिस्तप्रिय मुख्याध्यापिका  छाया  नाईक- कुलकर्णी नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. यानिमित्ताने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.        जि.प.प्रा.शाळा दाऊतपूर ता.परळी वै.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया वामनराव नाईक (कुलकर्णी),39 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31-01-2022 ला सेवानिवृत्त झाल्या. याप्रसंगी शाळेत सेवागौरव कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री पल्लेवाड सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांचा सेवाप्रवास तांदळवाडी, नेकनुर,येळंबघाट,मांजरसुबा व परळी असा ग्रामीण भागातून झाला.,सेवाकालावधीत सामाजिक बांधीलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यासाठी त्यांना जि.प.बीडचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.ओपन हार्ट सर्जरी झालेली असताना प्रबळ इच्छाशक्ती, सतत हसतमुख, प्रचंड आत्मविश्वास असल्याने उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे त्या परिसरात शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून ज्ञात आहेत. याप्रसंग

MB NEWS-*विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; अंबाजोगाईतील दुर्घटना*

इमेज
  *विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; अंबाजोगाईतील दुर्घटना* अंबाजोगाई - शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी (दि.०४) दुपारी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय १६) आणि सानिया अल्ताफ शेख (वय १८) अशी त्या बहिणींची नावे आहेत.  अतिशय गरीब कौटुंबिक परिस्थिती असलेल्या निदा आणि सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाईतील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. मुळचे हैदराबादकडील राहिवासी असलेले हे कुटुंब अंबाजोगाईत स्थायिक झाले होते. अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी लोकांकडे धुणीभांडी करते. शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना त्या विहिरीत बुडाल्या. विहिरीबाहेर त्यांची पर्स पडलेली दिसून आल्याने एका युअकाने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला दोघींचे मृतदेह तरंगताना आढळून आले. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई  शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्था

MB NEWS-बीडमध्ये सामाजिक न्याय भवनची नवीन इमारत होणार; धनंजय मुंडेंचा निर्णय* *सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख रुपये निधी उपलब्ध*

इमेज
  * बीडमध्ये सामाजिक न्याय भवनची नवीन इमारत होणार; धनंजय मुंडेंचा निर्णय* *सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख रुपये निधी उपलब्ध* मुंबई (दि. 04) --- : बीड येथे सामाजिक न्याय भवनाची नवीन इमारत होणार असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून यासाठी तातडीने सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे. बीड येथील सामाजिक न्याय भवन मध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनावणी कक्ष, जात पडताळणी तसेच विभागांर्गतच्या विविध महामंडळाची कार्यालये एकाच इमारतीमध्ये आहेत. त्यामुळे प्रशस्त नवीन इमारत उभारणी करण्याचा ना. मुंडे यांचा मानस होता. त्यानुसार ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.  सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून धनंजय मुंडे यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेक विकासकामे बीड जिल्ह्यात आणली आहेत. आपल्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या

MB NEWS- *श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवनिमित्त पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ*

इमेज
 *श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवा निमित्त पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ* *परळी/प्रतिनिधी* वीरशैव लिंगायत समाज, परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवानिमित्त आज गुरूवार दि.3 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ झाला. श्री वैद्यनाथ मंदिरशेजारी असलेल्या श्री गुरूलिंगस्वामी मठ (बेलवाडी) येथे आज गुरूवार दि.3 ते 5 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 8 ते 12 या वेळेत वीरशैव लिंगायत समाज, परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवानिमित्त आज गुरूवार दि.3 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळयास आज गुरूवारी उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान शनिवार दि.5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.21 वा. श्री संत मन्मथस्वामी जन्मोत्सव साजरा केला जाणार असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान कोविड-19 चे सर्व नियम व अटींचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

MB NEWS-राशिभविष्य (दि. ४ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. ४ फेब्रुवारी २०२२) मेष-अनावश्यक खर्च होईल. परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. तरच परिस्थिती सुधारेल. समज-गैरसमज होतील. स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील. वृषभ-मनासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी असेल. लाभदायक दिवस. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. मिथुन-संकल्प पूर्णत्वाकडे जातील. मेहनत व चिकाटीला यश येईल. अधिकारांत वाढ होईल. मान-सन्मान मिळेल. गृहसौख्य उत्तम राहील. कर्क-जुने रोग उद्भवतील. सरकारी कामांत अडचणी येतील. प्रतिकारशक्ती कमी होईल. अचानक खर्च उभे राहतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सिंह-पूर्वनियोजित कामांत अडचणी येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. कन्या- प्रेम-प्रणयाचा अनुभव येईल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस. तूळ- आरोग्य उत्तम राहील. आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. शत्रू पीडा कमी होईल. सज्जन मित्रमंडळींची ओळख होईल. सौख्यकारक दिवस जाईल. वृश्चिक-दुःखदायक घटनांचा अनुभव येईल. कामांत अडचणी य

MB NEWS-◆ श्री.हिंगलाज माता मंदिर येथे होणार सामाजिक सभागृह; ना.धनंजय मुंडे यांनी केले 53 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन ◆

इमेज
  ◆ श्री.हिंगलाज माता मंदिर येथे होणार सामाजिक सभागृह; ना.धनंजय मुंडे यांनी केले 53 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन ◆ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी शहरातील शंकर पार्वती नगर येथील श्री.हिंगलाज माता मंदिर येथे राज्याचे सामाजिक न्याय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते 53 लक्ष रुपये प्रकल्प खर्च असलेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन गुरुवार दि 03 रोजी  करण्यात आले.           परळी शहरात ना.धनंजय मुंडे  यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून अनेक बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले असून अनेक सभागृह प्रगतीपथावर आहेत.ज्योतिर्लिंग नगरी परळी मध्ये धार्मिक व अध्यात्मिक,आरोग्यविषयक उपक्रमांसाठी सदर सभागृह उपयुक्त ठरत आहेत व प्रत्येक समाज घटकाला आपले हक्काचे दालन निर्माण होत आहे.  गुरुवार दि 03 रोजी शहरातील शंकर पार्वती नगर मधील भावसार समाजाचे दैवत असलेल्या श्री.हिंगलाज माता मंदिर येथील सभागृहाचे  भूमिपूजन ना.मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, भावसार समाज परळीचे अध्यक्ष प्रभाकर

MB NEWS-अडीच लाखांचा गुटख्याचा माल व दोन गाड्या जप्त; पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई

इमेज
  अडीच लाखांचा गुटख्याचा माल व दोन गाड्या जप्त; पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई माजलगाव, प्रतिनिधी.....        अडीच लाखांचा गुटख्याचा माल व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षकपंकज कुमावत यांच्या पथकाने  कारवाई केली.           दिनांक 02/02/2022रोजी  पोलीस अधीक्षक  यांना माहिती मिळाली की माजलगाव येथील राजाभाऊ गाडगे व त्र्यंबक डुकरे हे दोघेजणह बेकायदेशीररित्या स्वतःची फायदा करीता महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला व लोकांचे जीवितास हानिकारक असलेला गुटख्याचा माल त्यांचे जवळील स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच 20 सी एस 3199 मध्ये मध्ये आणून आझाद चौक माजलगाव येथे माजलगाव व बीड येथील व्यापारी यांना देणार आहे अशी माहिती  सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात  यांना कळविल्याने श्री पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अध्यक्ष कार्यालयाचे पोलीस आमलदार यांना सदर बातमीची ठिकाणी पाठवून दिनाक 03/02/2022 रोजी 08.15वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी पाच इसम एक स्कार्पिओ एक शिफ्ट डिझायर जागीच ताब्यात घेऊन झडती घेता स्कार्पिओ डिजायर मध्ये राज निवास सुगंधी प

MB NEWS-तरूण शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या

इमेज
 . तरूण शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या गेवराई .....  तालुक्यातील भोजगांव येथील 25 वर्षीय तरूण शेतमजुराने गुरुवार रोजी दुपारी दोन च्या सुमारास शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.या प्रकरणी उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.     दिपक बाळासाहेब संत वय 25 राहणार भोजगांव असे गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नावं असुन त्याने गुरुवार रोजी दुपारी 2 च्या सुमारास शिवारातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.हि आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली ते मात्र समजु शकले नाही.हा तरूण दुस-यांच्या शेतात शेतमजुरी करण्याचे काम करत होता.याला शेती नव्हती या प्रकरणी पोलिस नवनाथ गोरे,सिद्दीकी यांनी घटनेचा पंचनामा केला असुन.या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

MB NEWS-गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला व वैद्यकीय आढचणीतील रुग्णांना केली जाते आर्थिक मदत पौळ पिंपरीचे सरपंच पती माणिकराव पौळ यांचा उपक्रम

इमेज
  गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला व वैद्यकीय आढचणीतील रुग्णांना केली जाते आर्थिक मदत  पौळ पिंपरीचे सरपंच पती माणिकराव पौळ यांचा उपक्रम  परळी (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. येथील ग्रामपंचायत गेल्या 15 वर्षांपासून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. गावातील विकासाबरोबरच सामाजिक अडचणी सोडविण्यात पक्षाचे गावातील नेते नेहमी अग्रभागी असतात. त्यापैकीच अग्रगण्य नाव म्हणजे युवक नेते माणिकराव पौळ आणि त्यांच्या पत्नी सौ.शामल माणिकराव पौळ. गावातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला आर्थिक हातभार लावण्यासोबत कोणाला वैद्यकीय अडचणीत आर्थिक मदत लागत असेल तरीही ते धावून जातात. गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची ही मदत परंपरा अद्यापही अविरतपणे सुरूच आहे. राजकारण हे समाजकारणाला धरून केले गेले पाहिजे असं म्हणतात. आशा पद्धतीचे राजकारण करणारे लोक फार क्वचित आढळून येतात. त्यातल्या त्यात गावातील राजकारणात त

MB NEWS-मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांची मागणी,रेल्वे राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

इमेज
  मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांची मागणी,रेल्वे राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद बीड । दि. ०२ । बीड जिल्हावासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प सध्या जलद गतीने पूर्णत्वाकडे जातो आहे.या प्रकल्पाचा नगर ते आष्टी दरम्यानच्या लोहमार्ग कामाचा टप्पा पूर्ण झाले असल्याने या मार्गावर मुंबई ते आष्टी दरम्यान प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. गतवर्षी नगर ते आष्टी दरम्यानचा एकसष्ठ किमीच्या लोहमार्गाचे काम पूर्ण  झाल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत नगर तर आष्टी दरम्यान रेल्वेची ट्रायल घेण्यात आली होती.हा रेल्वे मार्ग पूर्णपणे प्रवासी वाहतुकीस सज्ज असल्यामुळे मुंबई-नगर-आष्टी दरम्यान प्रवासी वाहतुक सुरू करण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे,जनसामान्यांच्या भावना आणि प्रवासी नागरीकांच्या मागणीची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मुंबई ते आष्टी रेल्वेसेवा सुरू क

MB NEWS-यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर...

इमेज
  यशवंत विभागीय ऑनलाईन  सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर...  सिरसाळा (वार्ताहर):- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात  भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 26 जानेवारी रोजी यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली येथील *प्रा.  शरद बाविस्कर* यांचे *भुरा* या  आत्मकथनावर आधारीत यशवंत विभागीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती.  यामध्ये सर्वप्रथम कुमारी निकिता व्यंकट दंडगुले (बीएससी प्रथम वर्ष श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा) 98 गुण घेऊन *प्रथम* क्रमांक पटकाविला असून तीन हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच सर्वद्वितीय क्रमांक हा समान गुण मिळाल्यामुळे विभागून देण्यात आला. अविनाश शंकर पवार (बीए द्वितीय वर्ष श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय) 94 गुण  आणि यशकुमार अशोकराव मुंडे (बी.ए. व्दितीय वर्ष एस. एस. एस. पी. मंडळ कला महाविद्यालय नांदुरघाट ता.  केज) याने पटकाविला असून त्यांना प्रत्येकी एक हजार रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार आह

MB NEWS-अखेर ठरलं....दहावी बारावी परीक्षा होणार ऑफलाईन ° गृहकेंद्रांवर होणार परीक्षा-मंडळाची अधिकृत माहिती

इमेज
  अखेर ठरलं....दहावी बारावी परीक्षा  होणार ऑफलाईन °  गृहकेंद्रांवर होणार परीक्षा-मंडळाची अधिकृत माहिती पुणे दि.०३ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.         प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी म्हणाले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.बारावीच्या परीक्षा  4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा त्याच वेळेत 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रात्याक्षिक परीक्षा 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान घेण्यात येईल. पुर्वी ठरलेल्या पद्धतीनेच परीक्षा

MB NEWS-परळी बीड नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी रेल्वे सुरु, आष्टीपर्यंत धावली दहा डब्यांची पहिली गाडी

इमेज
  परळी बीड नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी रेल्वे सुरु, आष्टीपर्यंत धावली दहा डब्यांची पहिली गाडी आष्टी, प्रतिनिधी...       बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं  महत्त्वपूर्ण असलेल्या परळी बीड नगर रेल्वे मार्गावर आज दि.३  रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू झाली.  याचा अधिकृत शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती आहे.            नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते . अखेर आज आज दि.३  रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली.रेल्वे प्रवाशांनी दहा डब्यांच्या गाडीतून प्रवास केला. दरम्यान स्वप्नपूर्ती झाली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

MB NEWS-परळी वैजनाथ: गणेशपार भागात दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल

इमेज
परळी वैजनाथ: गणेशपार भागात दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        दोन  गटांत तुंबळ हाणामारीची  घटना बुधवार, दि.02 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.           गणेशपार रोडवर दोन  गटांत तुफान भांडण झाले. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक देशमुख व माजी नगरसेवक कराळे यांच्यात ही भांडणे झाली. धनंजय बालासाहेब कराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख, मुकुंद दीपक देशमुख, निलेश देशमुख, गणेश देशमुख, सुनील देशमुख यांच्यावर कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गणेश दिपकराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहेशनाना कराळे, धनंजय कराळे व ओम कराळे यांच्यावर संभाजीनगर ठाण्यात कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आले. पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.

MB NEWS-डॉ. बालासाहेब लोमटे यांना मातृशोक;श्रीमती राजुबाई लोमटे यांचे निधन

इमेज
  डॉ. बालासाहेब लोमटे यांना मातृशोक;श्रीमती राजुबाई  लोमटे यांचे निधन अंबाजोगाई, प्रतिनिधी....       अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मातोश्री श्रीमती राजुबाई बाबुराव लोमटे,यांचे आज (दि.२ )अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.         श्रीमती राजुबाई बाबुराव लोमटे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मातोश्री होत. अत्यंविधी उद्या दि. 03-02-2022 वार गुरुवार रोजी  सकाळी  10=00 वाजता बोरूळ तलाव, अंबाजोगाई येथे करण्यात येतील. एमबी न्युज परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

MB NEWS-सुशिलराव देशमुख यांचे दुःखद निधन

इमेज
  सुशिलराव देशमुख यांचे दुःखद निधन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील प्रतिष्ठीत नागरीक सुशिलमामा माधवराव देशमुख यांचे आज बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.           शहरातील युवा उद्योजक संजय देशमुख, रवी देशमुख यांचे वडील सुशीलराव माधवराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी सकाळी ठीक 11 वाजता  अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

MB NEWS- *पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर*

इमेज
  * पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर* *परळी वै.ता.२ प्रतिनिधी* तुकोबारायांच्या ओवी मधून बुरांडे कुटुंबचे वर्णन करत. संत कोणाला म्हणावे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो.पांढरे कपडे,पांढरा सदरा,पांढरा फेटा परिधान केला म्हणजे संत नव्हे तर समाज उद्धार करणारे सर्वच संत असतात हे तुकोबा रायांनी सांगितले आहे. दिवंगत गंगाधरअप्पा, दिवंगत परमेश्वरअप्पा या बुरांडे कुटुंबातील सदस्यांनी गोरगरीब परिवारातील मुलांना वसतिगृह सुरू करून पवित्र अशा ज्ञान दानाचे कार्य केले हे काही संतांच्या कार्यापेक्षा कमी नाही.  महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक, मोहा गावचे माजी सरपंच कॉ.परमेश्वरअप्पा बुरांडे यांच्या बुधवार दि 2 रोजी आयोजित गोड जेवणाच्या कार्यक्रम प्रसंगी कीर्तनकार,समाज प्रबोधनकार हभप श्यामसुंदर सोंनर महाराज आपल्या सुमधुर वाणीतून कीर्तन करत असताना सांगत होते. संत तुकोबारायांच्या अभंगाचे वर्णन करीत उपस्थिती समुदायाला विचार करण्यास प्रवृत्त करीत प्रबोधन करत हभप श्यामसुंदर सोंनर महाराज यांनी हल्लीच्या तथाकथिक संतावर परखड टीका करीत  हल्ली संतांची देखील जाहिरातबाजी होत आहे,भगवे व

MB NEWS-खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घ्या-सकल मराठा समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

इमेज
  खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घ्या-सकल मराठा समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या दीड वर्षभरात परळी तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव येथे अनेक खोटे अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावात कुठल्याही जातीच्या व्यक्तीचा इतर कुठल्याही माणसाचा द्वेष नाही. सर्वजण एकोप्याने राहतात. मात्र काही गावाबाहेरील नेतेमंडळी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खोट्या केसेस दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज परळीत सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरण्यात आली.  गुन्हा दाखल नंतर होतो आणि आरोपी अगोदर अटक केला जातो हा प्रकार संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे एकतर्फी वागणे चुकीचे असून शहानिशा न करता गुन्हे दाखल करून घेण्याचा प्रकार चुकीचा आणि निषेधार्य आहे. गणेश शिंदे हा व्यक्ती अपंग असून कुठलीही चूक नसतांना त्याच्यावर खोटा अट्र

MB NEWS-राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ प्रवेशिका १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

इमेज
  राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ प्रवेशिका १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन मुंबई,  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि.31 जानेवारी 2022 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या  www.maharashtra.gov.in   आणि महासंचालनालयाच्या  dgipr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हु

MB NEWS-परळी बीड नगर रेल्वे मार्ग उद्यापासून सुरु, आष्टीपर्यंत धावणार बारा डब्यांची पहिली प्रवाशी रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार शुभारंभ

इमेज
  परळी बीड नगर रेल्वे मार्ग उद्यापासून सुरु, आष्टीपर्यंत धावणार बारा डब्यांची पहिली प्रवाशी रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार शुभारंभ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं  महत्त्वपूर्ण असलेल्या परळी बीड नगर रेल्वे मार्गावर उद्या दि.३ पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे आणि नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित राहणार आहेत.            नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले ह

MB NEWS-सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश टाक, उपाध्यक्षपदी सुनील दहिवाळ, सचिवपदी संदीप टाक

इमेज
सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश  टाक, उपाध्यक्षपदी सुनील  दहिवाळ, सचिवपदी संदीप टाक परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)           येथील सुवर्णकार समाज व सराफा असोसिएशनची माजी नगरसेवक व समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण टाक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुवर्णकार समाज व सराफा असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.        श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात मंगळवारी (दि.०१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी सुरेश (आण्णा) सखाराम टाक, उपाध्यक्षपदी सुनील दिगंबरराव दहिवाळ, सचिवपदी संदीप सुभाषराव टाक, कोषाध्यक्षपदी भारत टाक, तर सदस्य म्हणून संदीप वामनराव टेहरे व काशिनाथ शहाणे, सुनीलराव विडेकर, अनिरुद्ध डहाळे, संजयराव बुरांडे, सूर्यकांत कुलथे, रमेशराव मुंडलिक धारासूरकर, बाळू शेठ उदावंत रमाकांत बाबुराव डहाळे यांची निवड करण्यात आली आहे, तसेच प्रसिद्धी प्रमुख संतोष कमलाकरराव उदावंत यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर अध्यक्षपदी एकमताने अरुण शेठ टाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याच बैठकीत सराफा असोसिएशनची कार्यक

MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप‌ ; गोरगरिबांना मदत करणाऱ्या अण्णांना दीर्घायुष्य लाभो - रवींद्र परदेशी

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप‌ ; गोरगरिबांना मदत करणाऱ्या अण्णांना दीर्घायुष्य लाभो - रवींद्र परदेशी परळी वैजनाथ दि १ ( प्रतिनिधी ) :- परळी नगरपरिषद येथील माजी गटनेते तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक तथा गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय देणारे वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नेहमीच गोरगरिबांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या वाल्मीकआन्नांना दीर्घायुष्य लाभो असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवींद्र परदेशी यांनी केले. वाल्मीकआन्ना कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आज माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रवींद्र परदेशी यांनी आज वैजनाथ सोळंके, जालिंदर नाईकवाडे, आनंद इंगळे, महादेव रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक नगर व आंबेडकर नगर येथील जवळपास ३०० गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.  यावेळी बोलताना रवींद्र परदेशी म्हणाले की वा

MB NEWS- *दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ गोपीनाथ गडावर नतमस्तक*

इमेज
  *दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ  गोपीनाथ गडावर नतमस्तक * *दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ गोपीनाथ गडावर नतमस्तक* परळी । दिनांक ०१। अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालकांनी आज गोपीनाथ गडावर येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.     भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली, त्यानंतर बॅकेच्या अध्यक्षपदी ॲड. मकरंद पत्की तर उपाध्यक्ष पदावर ॲड. राजेश्वर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच माजी अध्यक्षा शरयू हेबाळकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, बिपिन क्षीरसागर, किशन पवार, राजाभाऊ दहिवाळ, चैनसुख जाजू, मकरंद सोनेसांगवीकर, जयकिरण कांबळे, डॉ. विवेक दंडे आदींनी गोपीनाथ गडावर येऊन लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बॅकेला अधिक प्रगतीपथावर नेऊ असा विश्वास

MB NEWS- *सर्व सामान्यांच्या सर्वांगिण विकासाचं हित साधणारा अर्थसंकल्प* - *पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया*

इमेज
 *सर्व सामान्यांच्या सर्वांगिण विकासाचं हित साधणारा अर्थसंकल्प*  - *पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया* मुंबई । दिनांक ०१।  शेती, शिक्षण, तरूणाई, सहकार, महिला आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासाचं हित साधणारा आजचा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.  सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार पंकजाताई मुंडे यांनी मानले आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना, आर्थिक सहाय्य, प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी व ग्रामीण भागात घर बांधणी, तरूणांना व्यवसाय उभारणीसाठी नाबार्ड मधून अर्थसहाय्य,  कृषी आधारित नव्या उद्योगांना कर्ज, महिलांसाठी वात्सल्य योजना, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद आदी ठळक वैशिष्ट्य आजच्या अर्थसंकल्पाची आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या हिताचा व कल्याणाचा आहे असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. ••••

MB NEWS- *शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प : खा.प्रितमताई मुंडे* *आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित करणारा व समग्र विकासाला गती देणारा अर्थसंकल्प*

इमेज
 *शेतकऱ्यांना बळ आणि तरुणांना नव्या संधी देणारा अर्थसंकल्प : खा.प्रितमताई मुंडे* *आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित करणारा व समग्र विकासाला गती देणारा अर्थसंकल्प* बीड । दि.०१ । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना बळ देणारा आणि तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देणारा आहे.सर्व घटकांना पूरक व देशाच्या समग्र विकासाला गती देणाऱ्या अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब अधोरेखित होते आहे अशी प्रतिक्रिया देऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष २०२२-२३ साठी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. नाबार्डच्या माध्यमातून देशातील तरुणांना स्टार्टअपसाठी अर्थसहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना कृषी आणि कृषी आधारित उद्योगांसाठी बळ देणारी तरतूद त्यांनी अर्थसंकल्पातून जाहीर केली. यामुळे शेतकरी आणि तरुणांना उभारी मिळणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. तसेच देशात पंचवीस हजार किलोमीटरचे नवे राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वसामान्यांसाठी ऐंशी लाख घरे बांधणे

MB NEWS-रमाई आवास योजनेतून नाथऱ्याच्या 14 घरकुलांना मंजुरी* *जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित*

इमेज
  * रमाई आवास योजनेतून नाथऱ्याच्या 14 घरकुलांना मंजुरी* *जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित* परळी (दि. 31) : रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2019-20 अंतर्गत परळी तालुक्यातील नाथरा येथील आणखी 14 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, सदर मंजुरी आदेशांचे जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते संबंधित लाभार्थींना वितरण करण्यात आले. गावातील आणखी पात्र लाभार्थींना घरकुल मंजूर करून देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री अजय मुंडे म्हणाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मार्फत मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू कुटुंबांचे स्वतःचे हक्काचे घर उभारण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे.  बीड जिल्ह्यात मागील वर्षी ग्रामीण व शहरी भागातील सुमारे 8000 घरकुलांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला होता तर यावर्षी ग्रामीण व शहरी मिळून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 15 हजार घरकुलांना मंजुरी देण्याच्या उद्दिष्टाला मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान नाथरा ग

MB NEWS-गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

इमेज
  गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ  परळी दि. १ फेब्रुवारी....  कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्कार २०२१-२२ साठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे अर्ज मागविण्यात येत आहे. विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी सदर पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.  मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेत स्थळावर तसेच कामगार कल्याण केंद्रात सदर पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या दुकान, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स,  उपहारगृहे, बँका आदी मध्ये काम करणारे कामगार/कर्मचारी यांना मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.  गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी कामगारांची विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान पाच वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक आहे. ५१ कामगारांना या पुरस्क

MB NEWS-अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

इमेज
  अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे   यंदाच्या अर्थसंकल्पाचा  फोकस: पंतप्रधान गती शक्ती, सर्वसमावेशक विकास, उत्पादकता वाढ, सौर उर्जेच्या संधी, ऊर्जा संक्रमण, हवामान कृती, गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताची वाढ सर्वाधिक; आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही आता मजबूत स्थितीत आहोत कॅपेक्सचे उद्दिष्ट ३५.४ टक्क्यांनी ५.५४ लाख कोटींवरून ७.५० लाख कोटींपर्यंत वाढले 14 क्षेत्रातील उत्पादकता-संबंधित प्रोत्साहन योजनांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे; 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट मिळाले   कर - याशिवाय कोणतेही बदल नाहीत डिजिटल मालमत्ता हस्तांतरणाच्या उत्पन्नावर सरकार 30% कर लावणार क्रिप्टोकरन्सीची भेट प्राप्तकर्त्याच्या शेवटी कर आकारली जाईल   इन्फ्रा आर्थिक वर्ष 22-23 मध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 25,000 किलोमीटरने वाढवले जाईल FY23 मध्ये चार मल्टी-मॉडल राष्ट्रीय उद्यानांचे कंत्राट दिले जातील 100 PM गती शक्ती टर्मिनल पुढील तीन वर्षांत उभारले जाणार आहेत एक उत्पादन एक रेल्वे स्टेशन लोकप्रिय केले जाईल, 400 नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील   गृहनिर्माण आणि शह