पोस्ट्स

उशीरा लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार

इमेज
  सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार आज शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुन नांदेड-पनवेल रेल्वे आज 100 मिनिटे लेट होणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी गुरुवारी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटली सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि 21 रोजी देखील ही एक्सप्रेस 100 मिनिटे उशिरा नांदेड येथून सुटणार असून या गाडीची नियमित वेळ सायंकाळी 6:20 असून ती आज सायंकाळी 8 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या