MB NEWS-साईप्रसाद दिलीप लड्डा यांचे दहावीच्या परीक्षेत 92.60 % गुण घेऊन यश

साईप्रसाद दिलीप लड्डा यांचे दहावीच्या परीक्षेत 92.60 % गुण घेऊन यश अबाजोगाई (प्रतिनिधी ) दहावी बोर्डाचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये साने गुरुजी विद्यालय भावठाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील विद्यार्थी साईप्रसाद दिलीप लड्डा याने 92.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. भावठाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवासी दिलीप लड्डा यांचा मुलगा चि. साईप्रसाद याने दहावी बोर्डाच्या परीक्षेत उतुंग यश संपादन केल्याबद्दल साने गुरुजी विद्यालय भावठाणा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नातेवाईक, मिञपरिवार तसेच नागरीकांनी त्याचे कौतुक करून अभीनंदन करण्यात येत आहे. या यशाचे श्रेय त्याने शाळेतील सर्व शिक्षकवृंद, आई-वडील, नातेवाईक व मिञपरिवार या सर्वांना दिले आहे. भविष्यात डाॅक्टर होऊन ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचा त्याचा मानस असल्याचे त्याने यावेळी बोलून दाखवले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.