पोस्ट्स

घटना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-नवजात मयत अर्भक आढळले

इमेज
  नवजात मयत अर्भक आढळले बीड, सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एक नवजात मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.  बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत अर्भक गुराख्याला दिसले. त्याने याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, अंमलदार प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, चालक कृष्णात बडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पांढर्‍या कपड्यामध्ये गुंडाळलेले मयत पुरुष जातीचे अर्भक दिसून आले. त्यावर कुठेही जखम झालेली नव्हती. हे अर्भक एक दिवसाचे असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदरील अर्भक हे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. 

MB NEWS-आगीतून बहिण व लहान मुलांना वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

इमेज
आगीतून बहिण व लहान मुलांना वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू  धारूर....        तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवरील दोन घरांना  अचानक आग लागली  त्यामध्ये घरीच उपचार घेत असलेल्या बहीण ,लहान दोन मुलांना घराच्या बाहेर काढत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने या स्फोटामध्ये रवी श्रीहरी तिडके वय २१ यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी घडली. Click &Watch:महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक;परळीत नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन(News &video)          पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्राचे शेड व गोठा आहे या गोठ्यास  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली व घरातील बहिण व लहान मुलांना बाहेर काढून  आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके हा येथील जवळील टाकीतील पाणी घेऊन विझवत असताना अचानक घरातील गॅस टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात टाकीचा  पत्रा मा...

MB NEWS-धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल

इमेज
  धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल बीड- सहा महिन्यांपूर्वी विवाह करून सासरी आलेल्या  विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (दि २४ रोजी) सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळरा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!