पोस्ट्स

पालखी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई

इमेज
  प्रभू वैद्यनाथांचा पालखीचे मानकरी परळीचे भोई  परळी (प्रतिनिधी) विजयादशमीच्या दिवशी प्रभुवैद्यनाथांची पालखी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने काढण्यात येते. देवी काळरात्रीच्या भेटीला प्रभू वैद्यनाथ विजयादशमीच्या दिवशी पालखीमध्ये बसून जातात अशी आख्यायिका आहे. पालखीचे भोई म्हणून दरवर्षी निघणाऱ्या या पालखी उत्सवाचा मान परळी शहरातील भोई समाजाला असतो. प्रभू वैद्यनाथ आणि देवी काळरात्री यांचे बहीण भावांचे नाते आहे. विजया दशमीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथ बहिणीसाठी म्हणजेच काळरात्री यांना बोळवण (साडी - चोळी) घेऊन जातात. सनई - चौघडे आणि वाजंत्रीच्या निनादात शहरात पालखी काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी उत्सव जोरात साजरा करण्यात आला. यंदाचा पालखीचा मान आयलोजी घटमल यांच्यासह भोई समाजातील बांधवांना मिळाला. पालखीच्या सुरुवातीला खांदा देऊन भोई समाज बांधव पालखीची सुरुवात करतात