MB NEWS-परळीतील चार बालके रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफ ने घेतले ताब्यात 🌑 परळीहून पालकांच्या अपरोक्ष बसले होते शिर्डी एक्स्प्रेसमध्ये ; बालसुधारगृहात केली व्यवस्था

परळीतील चार बालके रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफ ने घेतले ताब्यात 🌑 परळीहून पालकांच्या अपरोक्ष बसले होते शिर्डी एक्स्प्रेसमध्ये ; बालसुधारगृहात केली व्यवस्था परळी वैजनाथ, प्रतिनिधी...., परळीतील चार बालके पालकांच्या अपरोक्ष रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफने ताब्यात घेतले आहेत. या बालकांचे संरक्षण व काळजी घेण्याच्या दृष्टीने बालसुधारगृहात व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काकीनाडा- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस परळी रेल्वे स्थानकातुन मध्यरात्री १२ वा.सुमारास निघते. दि.९ रोजी परळी रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी नगर या भागातील चार मुले परळीहून पालकांच्या अपरोक्ष शिर्डी एक्स्प्रेसमध्ये बसले.घरातुन निघुन ही मुले का गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चार मुलांनी परळी ते जालना प्रवास करतांना जालना येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याने ही मुले एकटीच असल्याचे लक्षात आल्यावरुन या मुलांना ताब्यात घेतले. औरंगाबादमध्ये उतरवुन आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले.या मुलांची चौकशी केली...