MB NEWS- *स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !*

*स्व.पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ किर्तन महोत्सवाचे परळीत गटनेते अजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन !* अध्यात्ममाने मनशुद्धी होते,सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शक - अजय मुंडे _नामवंत किर्तनकारांची परळीत मांदियाळी_ परळी......ता. २ - शेमारो मराठी बाणा व नाथ प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित स्व. पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते श्री. माऊली गडदे, नगरसेवक गोपाळराव आंधळे, प्रा. अतुल दुबे, संयोजक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, सूर्यकांत मुंडे उपस्थित होते.अध्यात्ममाने मनशुद्धी होते व सर्व धर्म सम भाव आणि सामाजिक सलोखा जपण्यास कीर्तन व कीर्तनकार समाजासाठी मार्गदर्शकच आहेत असे यावेळी श्री. मुंडे म्हणाले.परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.