MB NEWS-'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट

'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट मुंबई...... राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात फाईलचा ढिग पडल्या बाबतचा एक व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला.याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत वास्तविकता सांगितली आहे. क्लिक करा: *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे* आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,"सामान्य प्रशासन विभागाने सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या मंत्री कार्यालयातील सर्व नस्त्या जमा करून उर्वरित रद्दी नष्ट करून कार्यालय रिकामे करून देण्याचा प्रघात आहे. कार्यालयीन कर्मचारी रद्दी नष्ट करण्यासाठी संकलन करत असताना कुणीतरी खोडसाळपणाने एक व्हीडिओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे समजले. चुकीच्या पद्धतीने मांडणी करून पसरवल्या जात असलेल्या त्या व्हीडिओवर कृपया दुर्लक्ष करावे व प्रसिद्धी देऊ नये, ही नम्र विनंती." 🔵 हे देखील वाचा पहा क...