MB NEWS:एक वही एक पेन' अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल - पीआय.सलीम चाऊस

' एक वही एक पेन' अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल - पीआय.सलीम चाऊस परळी प्रतिनिधी - महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त युवा पत्रकार-अभिनेता विकास वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात 'एक वही एक पेन' अभिमान राबविले. या अभियानाचे उद्घाटन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल.या प्रसंगी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादूर भाई, प्रख्यात सिने-नाटय दिग्दर्शक डॉ. सिध्दार्थ तायडे, सहदेव कांबळे, पत्रकार कैलास डुमणे, साहित्यिक-नाटककार-संपादक रानबा गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते अमन पटेल, बुकतर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना दिग्दर्शक प्रा. डॉ. सिध्दार्थ तायडे यांनी भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावी...