पोस्ट्स

पथक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई

इमेज
परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी;२लाख ११ हजाराचा गुटखा जप्त:४ चार जणां विरुद्ध गुन्हा: एक अटक ३ मोकाट परळी वैजनाथ, प्रतिनिधी... पंकज कुमाववत यांच्या पथकाने परळी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत २ लाख ११ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेतला असून यात एक जण ताब्यात घेतला आहे ;तर अन्य तिघे फरार झाले आहेत.            पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,परळी येथे सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या राघव इन्टरप्राजेस या किराणा मालाच्या दुकानात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच; त्यांनी धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात छापा मारला. त्या छाप्यात परळी येथील सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात धाड टाकली. त्या धाडीत पोलीस पथकाला गोवा गुटखा, बाबा पान मसाला, रॉ

MB NEWS-पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

इमेज
  सावधान ! आपण कोणते दुध वापरतो ? केमिकल पावडर पासून होतेय बनावट दुध निर्मिती ! पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकली धाड : ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात केज :- पाटोदा तालुक्यात केमिकल पासून बनावट व आरोग्याला हानिकारक असे दुध तयार करून ते दुधात मिसळून ते डेअरीवर विक्री करीत असल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही केली.          पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे पावडर पासून दुध आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे केमिकल पावडर पासून मानवी आरोग्याला धोकादायक असे दूध तयार करून ते बनावट दूध त्यांच्या जवळील दुधात मिसळून दूध डेअरीवर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले. दि. २५ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वा. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने नागेशवाडी येथे  बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध बनवीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी  तयार केलेले १६० लिटर दूध व केमिकल पाव