पोस्ट्स

ऑगस्ट २३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS: *विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महंत सुधीर दास यांची निवड ; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव*

इमेज
 *विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महंत सुधीर दास यांची निवड ; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव* नाशिक - जगभरात कार्यरत असणाऱ्या विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीमहंत सुधीरदास पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून  विविध वाहिन्यांवर म्हणून प्रभावी बाजू मांडत असतात.तसेच कुंभ पर्वात अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या निर्मोही आखाड्याचे महंत अशीही त्यांची सर्वदुर ओळख आहे. नाशिक येथील काळाराम मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी घराण्याचे २७ वे वंशज म्हणून त्यांची ख्याती आहे.श्रीमहंत यांनी कला क्षेत्रात सर्पूंण शुक्ल यजुर्वेद या विषयात पदव्युत्तर अध्ययन केले असून ते श्रौत स्मार्त संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक आहेत.या निवडीबद्दल संघटनेचे आंतरराष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष योगी श्री आदित्यनाथजी महाराज(मुख्यमंत्री,उत्तरप्रदेश) यांच्याकडून अभिनंदन केले गेले आहे.अशी माहिती संघटनेचे आर बी मल्ल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.दरम्यान विश्वहिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी पुजारी यांची निवड झाल्याने देशभरातून अभिन

MB NEWS:*अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे* *13 कोटीचे 8 दिवसात वितरण*

इमेज
 *अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे* *13 कोटीचे 8 दिवसात वितरण* मुंबई दि. 28. अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार  असून त्यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12. 98 कोटीचा मार्जिन मनी  वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.  मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व  सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योगासाठीच्या योजना बाबत झालेल्या आढावा बैठकीत श्री मुंडे बोलत होते . मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत आढावा बैठकीत श्री मुंडे बोलत होते . यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,लीडकाॅमचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम,  डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष कांबळे,रवी घाटे,  डिक्कीचे सदस्य ,अनेक लघुउ

MB NEWS:पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा* *_जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांचे आवाहन_*

इमेज
 पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा* *_जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांचे आवाहन_* परळी । प्रतिनिधी कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनलोड मुळे हातावर पोट भरण्यासाठी रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणारे खुपच अडचणीत सापडले आहेत. आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार कर्ज स्वरूपात अर्थिक मदत देण्यात येणार आहे . केंद्र सरकारने (एमएसएमई) सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील व्यवसायीकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने स्वनिधी योजना जिल्ह्यातील सर्व शहरातील नगर परिषद, नगरपंचायत मार्फत सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व शहरांत असणाऱ्या पात्र छोट्या व्यवसायीकांनी Www.Pmsvanidhi.Mohua.Gov.In या संकेतस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील विविध शहरातील रस्त्यावर व रस्त्या लगत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाले, आणि छोटे दुकानदारांना शासनामार्फत कर्ज देणार असल्याने त्याच्या मदतीन

MB NEWS:परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती

इमेज
 परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरासह महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने वैद्यनाथाच्या पायर्‍यावर घंटानाद आंदोलन करुन आरती करण्यात आली. महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी भाजपाच्यावतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. परळी भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथाच्या उत्तरघाटावरील पायर्‍यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी दार घड उध्दवा ! दार उघड, मंदिरा चालू, मंदिर बंद उध्दवा तुझा कारभाच धुंद अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळी 11 वाजता करण्यात आलेले हे आंदोलन वैद्यनाथाच्या आरतीने समाप्त झाले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, डॉ. शालिनीताई कराड, निळकंट चाटे,उत्तम माने,राजेश गित्ते, सौ.सारिका कुरील, राजेंद्र ओझा, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, रवि कांदे , सुरेश माने,नरसिंग सिरसाट, किशोर केंद्रे, नरेश पिंपळे, उमेश खाडे, चंद्रकांत

MB NEWS:परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय*

इमेज
  *परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय* परळी (प्रतिनिधी) : राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून तट प्रयत्नांना आता यश आले आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्

MB NEWS:पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !* *_कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून दिले ; परळीचे जलवैभव वाढवले - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* • *सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत* •

इमेज
 *पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !* *_कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून  दिले ; परळीचे जलवैभव वाढवले  - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* • *सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत* • परळी वैजनाथ/प्रतिनिधी.........            परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय लातुर येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचे ना.धनंजय मुंडे हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी  पूर्ण विराम मिळवून दिला आहे. हे कार्यालय आता परळीत तर असणार आहेच तसेच या कार्यालयांतर्गत तीन जिल्ह्यांचा कारभार चालणार आहे.कार्यक्षेत्र वाढवून परळीचे जलवैभव वाढवले  असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.        राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे

MB NEWS: *स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित - धनंजय मुंडे यांची माहिती* *अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ*

इमेज
 *स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित - धनंजय मुंडे यांची माहिती* *अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ* मुंबई ) ------- : अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज (दि. २८) वितरित करण्यात आला असून लवकरच लाभार्थी  विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेनंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते.  त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी ३५

MB NEWS:राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

इमेज
 *⭕राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण⭕*       मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रीत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर काळजी घेतली जात नसल्याने ग्रामीण तसेच निमशहरी भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. काही तालुक्यांमध्ये दिवसाला सरासरी १० ते ६० असे कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात उघडल्यानंतर ग्रामीण भागातील व्यवहार सामान्य झाल्यासारखं वातावरण आहे. पण काळजी घेतली जात नसल्याने उतार वयातील लोकांना कोरोनाची अधिक लागण होत आहे.                      सुरूवातीला दिसणाऱ्या लक्षणांकडे दूर्लक्ष होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर सरासरी हात धुण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडेही लक्ष दिलं जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.                 मात्र सार्वजनिक वाहतुकीला ग्रामीण भागात अजूनही वेग आलेला नाही. कारण एसटी सुरू होवूनही प्रवासी वाहनांकडे फिरकत नसल्याचं चित्र आहे.               ग्रामीण आणि निमशहरी भागाला लागून असलेली खासगी रूग्णालयं देखील अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याचं रूग्ण सांगतात. काही रूग्णांचं ७ दिवसां

MB NEWS:परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणी पुण्यातून आरोपी जेरबंद; एका महिलेसह तीन अटक*

इमेज
  परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणी पुण्यातून आरोपी जेरबंद; एका महिलेसह  तीन  अटक* _खळबळ उडवणारा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत होता कैद _    परळी वैजनाथ..... परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील   सोने-चांदीच्या दुकानी हातचलाखी करून दोन लाखांचे सोने लंपास केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता आणि ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी परळी पोलिसांनी पुण्यातून आरोपी जेरबंद केले आहेत.एका महिलेसह  तीन जणांना ताब्यात घेतले आहे. परळी पोलिसांचे तपासातील हे मोठं यश आहे.          राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात अरुण टाक यांचे गेली अनेक वर्षांपासूनचे जुने अरुण टाक अँड सन्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. या दुकानी भरदिवसा म्हणजे अंदाजे बारा ते साडेबारा दरम्यान काही अज्ञात महिला तोंडास स्कार्फ बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. बघता बघता डोळ्यात धूळ फेकत दोन गंठण व एक नथनीचा सेट हातचलाखी करून लांबवले. परळी शहरात सलग दोन दिवस बाजारपेठेत चोरीचे प्रकार

MB NEWS:मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर* *२३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया -डाॅ.उषा बांगर*

इमेज
 *मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर*  *२३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया -डाॅ.उषा बांगर* धारुर प्रतिनिधी धारुर तालुक्यातील मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी तेवीस महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आरोग्य प्रशासनाने या प्रसंगी घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ उषा बांगर यांनी दिली आहे.     मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आसरडोह, उपकेंद्र हिंगणी, उपकेंद्र कान्नापुर,उपकेंद्र तेलगांव,उपकेंद्र भोपा अंतर्गत ४० ते ४५ गावातील गरजवंत महिलांवर आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या ४ महिन्यांत १३० महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांत आयोजित शिबीरात २३ महिलांवर कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बीड येथील स्रीरोग तज्ञ डाॅ. अशोक मुंडे यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असुन बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन श

MB NEWS:सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन -धनंजय मुंडे

इमेज
 *सफाई कामगारांसाठी  स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन*                 *धनंजय मुंडे* मुंबई दि . 28. सफाई कामगारांच्या विविध प्रश्न  व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे    प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.       सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे  ,   सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.            श्री मुंडे म्हणाले,  सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला   जाईल. कामगारांच्या निवाराच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करणार

MB NEWS:कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

इमेज
 कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून  - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना   अंबाजोगाई, प्रतिनिधी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून विवाहितेचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणात सासऱ्याचा हात असल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला आहे.  शीतल अजय लव्हारे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या गळ्यावर कु-हाडीने वार करण्यात आले असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित सासरा फरार झाला असून बर्दापूर पोलिसांचे पथक रात्रीपासून त्याचा कसून शोध घेत आहेत. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.   *प्रेमविवाह केल्याच राग ?* सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय लव्हारे याने पाच वर्षापूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना चार वर्षाची एक मुलगी देखील आहे. आपला विरोध झुगारून अजयने विवाह केल्याचा राग व

MB NEWS:'त्या' मयत वृध्दाचा कोरोना बाधीत अहवाल आल्याने एकच खळबळ ;अंत्यविधीला १०० ते १५० ग्रामस्थांची उपस्थिती

इमेज
'त्या' मयत वृध्दाचा कोरोना बाधीत अहवाल आल्याने एकच खळबळ ; अंत्यविधीला १०० ते १५० ग्रामस्थांची उपस्थिती एका दिवशी कोरोनाचे दोन बळी  धारुर / प्रतिनिधी धारुर तालुक्यातील गांवदरा येथिल एका वृद्धाचा मृत्यू बुधवारी रात्री झाला होता. गुरुवारी सकाळी या वृद्धावर गावंदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या वेळी १०० ते १५० गांवकरी उपस्थित होते. सदर वृद्धाचा कोरोना बाधित अहवाल आल्याने गावंदरा गावात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी कोरोन मुळे तालूक्यात दोन जनाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.          सविस्तर वृत्त असे की धारुर तालुक्यातील गावंदरा येथील 62 वर्षीय वृद्धाला बुधवारी सायंकाळी थंडी ताप व हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता या वृद्धास धारुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी नेण्यात आले होते. धारूर येथील स्वॕब सेंटरला बुधवारी वृद्धाचा स्वॅब देण्यात आला होता त्याचा अहवाल गुरूवारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून मयत वृद्धावर गुरुवारी सकाळी गावंदरा येथे हे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी अंत्यविधीस गावातील शंभर ते दिडशे नागरिक उपस्थित असल्याने एकच खळबळ उडाली आहे

MB NEWS: दगडफेक करीत दहशत निर्माण केली व घरात घुसून अल्पवयीन मुलींची छेड काढली;. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

इमेज
  *दगडफेक करीत दहशत निर्माण केली व घरात घुसून अल्पवयीन मुलींची छेड काढली;. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        वृद्ध आजी व आईसोबत राहणा-या अल्पवयीन मुलींना सातत्याने त्रास देणाऱ्या आरोपींनी छेडछाडीची परिसिमा  केली. मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या घरासमोर आरडाओरडा करत घरावर लाथा घालून दगडफेक करून दहशत निर्माण केली.बाहेर काय होत आहे बघण्यासाठी दार उघडले असता घरात घुसून अल्पवयीन मुलींची छेड काढली व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी १७ वर्षिय मुलगी खंडोबानगर गल्लीत किरायाने आपल्या दोन लहान बहिणींसह आजी व आई यांच्यासमवेत राहते. घरात कोणीही पुरुष नाही , मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत हे कुटुंब राहते.गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींपैकी दत्ता रामभाऊ त्रुप व प्रितम रोहीदास बनसोडे हे येता जाता तसेच मोटारसायकलवरून नेहमीच फिर्यादी मुलीची छेड काढत तीने ही बाब घरच्यांनाही सांगितली. परंतु आपल्या पाठीशी कोणी नाही या विचाराने अनेकदिवस या प्रकारा

MB NEWS:दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार - धनंजय मुंडे* *दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेण्याच्या धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विभागाला सूचना*

इमेज
 *दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार - धनंजय मुंडे* *दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेण्याच्या धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विभागाला सूचना* मुंबई (दि. २६) ---- : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वेबिनार बैठकीमध्ये याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी दत्ता बाळसराफ, दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर अन्य पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित व वेबिनार द्वारे सहभागी होते. मार्चपासून कोरोनामुळे मंदा

MB NEWS:JEE / NEET च्या परीक्षा आता घेऊ नये- धनंजय मुंडे

इमेज
  JEE / NEET च्या परीक्षा आता घेऊ नये- धनंजय मुंडे मुंबई, प्रतिनिधी... देशभरात कोविड १९ च्या भयावह व अनिश्चित परिस्थितीत JEE / NEET च्या परीक्षा आयोजित करणे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळ आहे. त्यामुळे याप्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय आता रद्द करावा, असा माझा आग्रह आहे.असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे.

MB NEWS:महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यात बीड जिल्ह्यातील २४ वर्षीय युवकांची प्रचंड मेहनत !

इमेज
महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यात बीड जिल्ह्यातील २४ वर्षीय युवकांची प्रचंड मेहनत ! सलग २६ तास पोकलेन चालवत अनेकांचे जीव वाचवणार्या किशोर लोखंडेचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक परळी वैजनाथ,प्रतिनिधी...  महाड इमारत दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना.  दुर्घटनेनंतर ४०तास चाललेल्या बचावकार्यात आमच्या बीड जिल्ह्यातील ऊखंडा ता.पाटोदा येथील केवळ २४ वर्षाच्या किशोर लोखंडेने सलग २६ तास पोकलेन चालवत अनेकांचे जीव वाचवले आहेत. किशोर तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे.  #RealHero #Beedkar

MB NEWS:मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

इमेज
  मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

MB NEWS:जगातील 26 टक्के नवे कोरोना रुग्ण भारतातून, चिंता वाढवणारी आकडेवारी

इमेज
 *⭕जगातील 26 टक्के नवे कोरोना रुग्ण भारतातून, चिंता वाढवणारी आकडेवारी⭕*   मुंबई : भारतात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकूण रुग्णांची संख्या 31 लाखांवर गेली आहे. भारत हा तिसरा देश आहे जिथे 30 लाखाहून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 30 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात जगातील 26 टक्के प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत.   वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या 2 कोटी 38 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 8 लाख 17 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 63 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 66 लाखाहून अधिक आहे.    24 ऑगस्ट रोजी जगात 2 लाख 13 हजार नवीन रुग्ण आढळले, त्याच दिवशी भारतात नवीन रूग्णांची संख्या 59 हजाराहून अधिक होती. त्याचप्रमाणे 23 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 10 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर भारतात नवीन रूग्णांची संख्या 61 हजाराहून अधिक आहे.  22 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 67 हजार रुग्ण संख्या नोंदवली गेली होती, तर एकट्या भारता

MB NEWS:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा खा.प्रितमताईनी घेतला आॅनलाईन आढावा

इमेज
  राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा खा.प्रितमताईनी घेतला आॅनलाईन आढावा *जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्सची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना* परळी.दि.२६----कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मंगळवारी ( दि.२५ ) राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ऑनलाइन आढावा बैठक घेतली.जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेताना त्यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिल्या. कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.या निधीचा योग्य व्यय होता आहे का याची माहिती घेऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी परीक्षांची वाट न बघता कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सना सेवेत रुजू करून घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच प्रशासन व आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टर्स व रुग्णालयांचे सहकार्य मिळवण्यासाठी खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण न करता त्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन तज्ञ सेवा घेण्याचा विचार मांडला.यावेळी त्यांनी

MB NEWS:*परळी- बीड- नगर रेल्वे मार्ग : राज्य सरकारने ३७७ कोटीचा निधी थकीत ठेवला !*

इमेज
 * परळी- बीड- नगर रेल्वे मार्ग : राज्य सरकारने ३७७ कोटीचा निधी थकीत ठेवला !* •_ही तर बीडच्या विकासाला खीळ; निधी तातडीने देण्याची मुख्यमंत्र्यांकडे पंकजाताई मुंडे यांनी केली मागणी_  मुंबई दि. २५ ------- नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या कामाचा ३७७ कोटी रूपयांचा निधी सध्या राज्य सरकारकडे थकीत आहे, बीड जिल्हयाच्या सुपरफास्ट विकासात मानाचा तुरा असणा-या या रेल्वेच्या कामाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, ही तर बीडच्या विकासाला खीळ आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.    नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जिल्हयातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते स्वप्न होते. या रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि राज्याने अर्धा अर्धा वाटा देण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने आपल्या वाट्याचा निधी प्रकल्पाला दिला आहे, त्या निधीतून सध्या काम सुरू आहे, परंतु राज्य सरकारकडे या प्रकल्पाचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा २२८ कोटी आणि सन २०२०-२१ मधील १४९ कोटी असा एकूण ३७७ कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मंगळवारी रेल्वे अधिका-यांच्या घेतलेल्या

MB NEWS: आजचे कोरोना अहवाल आले:परळीत १२ तर बीड जिल्ह्यात ७६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

इमेज
  आजचे कोरोना अहवाल आले:परळीत १२ तर बीड जिल्ह्यात ७६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. बीड : आज 76 पॉझिटिव्ह तर 905 निगेटिव्ह *बीड 18, अंबाजोगाई 11, आष्टी 7, केज 9 ,वडवणी 2, माजलगाव 9, धारूर 6, गेवराई 1 , पाटोदा 1 आणि परळी तालुक्यात 12 रुग्ण आढळले* -------------------- -------------------- -------------------- आजचे कोरोना अहवाल आले:परळीत १२ तर बीड जिल्ह्यात ७६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह.

MB NEWS: दिलासादायक! दिवसभरात राज्यात १४ हजार २१९ कोरोनामुक्त*

इमेज
 दिलासादायक! दिवसभरात राज्यात १४ हजार २१९ कोरोनामुक्त* मुंबई :  आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  आज राज्यात ११ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या १ लाख ६८ हजार १२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ चाचण्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज २१२ करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या २२ हजार ४६५ इतका झाला आहे. सध्या राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ व्यक्ती होम क्वारंटाइनममध्ये आहेत. तर, ३३ हजार ९२२ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. (आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा

MB NEWS:सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात असणार मुसळधार पाऊस आणि कडाक्याची थंडी !*

इमेज
 *सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात असणार मुसळधार पाऊस आणि कडाक्याची थंडी !* जगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट समोर आलं आहे. प्रशांत महासागरात ला-निना वादळाचा प्रभाव दिसून येत असल्यानं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणि कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात 2020 च्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भारतात ला निनाचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांत सगळ्यात जास्त दिसून येण्याची शक्यता आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 1994 पासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एकूण 28 लाख कोटी टन बर्फ वितळला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, आणि वितळणाऱ्या बर्फामुळे जमीन आणि समुद्रातील तापमानावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

MB NEWS:परळीत आज ९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह; बीड जिल्ह्यात ८५

इमेज
  परळीत आज ९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह; बीड जिल्ह्यात ८५

MB NEWS: सोनपेठ,केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडुन स्वागत .

इमेज
  केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडुन स्वागत . सोनपेठ दि.२४(प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेती संबधाने काढलेल्या तीन अध्यादेशांचे शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व हे अध्यादेश कायद्यात रुपांतरीत करण्याची मागणी करण्यात आली. देशातील शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे या साठी शेतकरी संघटना गेली चाळीस वर्ष लढा देत आहे .या लढाईतील प्रमुख मागण्यापैकी एक शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य असावे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही बाजारात विकता यावा ही मागणी केंद्र सरकारने एक बाजार एक देश ही घोषणा करत शेतमालाचा बाजार सामान्य नागरीकांसाठी एका अध्यादेशा द्वारे खुला केला आहे. या मुळे शेतकरी आपला माल आता थेट विकू शकणार आहे .तसेच दुसऱ्या एका अध्यादेशामुळे शेतीमाल आवश्यक वस्तु कायद्याच्या बाहेर काढल्यामुळे सरकार आता शेतीमालाच्या किमंती नियंत्रीत ठेवणार नाही तसेच करार शेतीच्या अध्यादेशामुळे शेतीत गुंतवणूक वाढणार असल्याने थेट शेतीला फायदा होणार आहे . हे तीन ही अध्यादेश शेती व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याने केंद्र सरकारच्या या धाडसी अध्यादेश

MB NEWS:कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ३२ हजार गुन्हे दाखल; ३३ हजार ७७४ व्यक्तींना अटक

इमेज
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ३२ हजार गुन्हे दाखल; ३३ हजार ७७४ व्यक्तींना अटक मुंबई दि. २३ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ३२ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३३ हजार ७७४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच २२ कोटी ०६ लाख १५ हजार ९९४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.   राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २२ ऑगस्ट या कालावधीत   अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ७४ हजार २०३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.   पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३३५ (८९० व्यक्ती ताब्यात)   १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १० हजार ८५७   राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.   अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७   जप्त केलेली वाहने – ९५, ९७७   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –   (मुंबईतील ५९ पोलीस व ६ अधिकारी अशा एकूण ६५, नवी मुंबई २, ठाणे शहर १६, पुणे शहर ३, नागपूर शहर २, नाशिक शहर १, अमरावती शहर १ wpc,

MB NEWS:गंगाखेड परिसरातील गुढ आवाजाने नागरिक भयभित...!

इमेज
  गंगाखेड परिसरातील गुढ आवाजाने नागरिक भयभित... गंगाखेड/प्रतिनिधी.... गंगाखेड शहर आणि परिसरात आज प्रचंड प्रमाणामध्ये मोठा हादरा बसणारा आवाज झाल्यामुळे भयचकित वातावरण आहे. दरम्यान गंगाखेड उपविभागाचे अधिकारी सुधीर पाटील यांनी याप्रकरणी शोध सुरू असल्याची माहिती दिली.   गंगाखेड शहरासह परिसरात सोमवारी (दि. 24) पावणेबाराच्या सुमारास जमिनीतून गुढ आवाज आल्याने नागरिक अक्षरशः भयभित झाले आहेत. दरम्यान, काही नागरिकांनी आवाजाबरोबर हादरेसुध्दा बसल्याचे म्हटले आहे. परंतु तालुका महसूल प्रशासनाने या संदर्भात कोणतीही स्पष्टता केली नाही. त्यामुळे दुपारी उशीरापर्यंत या आवाजाचे गुढ कायमच होते.

MB NEWS:राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू !

इमेज
  राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू !   नागपूर: काँग्रेसच्या नेतृत्त्वावरून सुरु असलेल्या राजकीय घुसळणीमुळे आता महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.  मात्र, त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातील पत्रकारपरिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाऊ नये, अशी राहुल गांधी यांची इच्छा होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यास काँग्रेसची भूमिका काय असेल, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. त्यावर वडेट्टीवार यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकासआघ

MB NEWS:खाजगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

इमेज
खाजगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती मुंबई: केंद्र सरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून ई-पासबद्दलचा निर्णय घेऊ, अशी माहिती देशमुखांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर देशमुखांनी पुन्हा ट्विट केलं. 'मिशन बिगिन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल,' असं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ई-पाससह सध्या लागू असलेले सर्व नियम कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यापुढेही राज्यात खासगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक असेल. केंद्र सरकारनं कोविडच्या लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दि

MB NEWS:राज्यातील कापूस खरेदीच्या अडचणीसंदर्भात पणनमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

इमेज
  राज्यातील कापूस खरेदीच्या अडचणीसंदर्भात पणनमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न मुंबई, दि. २१ :  राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी शिवाय राहणार नाही, असे आश्वासन पणन मंत्री जयंत पाटील यांनी दिले. कापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात पणन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. श्री. पाटील म्हणाले, राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल तसेच दि कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत (सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागली तर अडचणी येणार नाहीत त्यासाठी या उपाययोजना तातडीने करण्यात येत

MB NEWS:खा.प्रितमताई मुंडे यांनी केले पवार,भोसले कुटुंबीयांचे सांत्वन बीडचे निवृत्त मंडळ अधिकारी शेख जहांगीर यांच्या कुटुंबीयांची ही घेतली भेट

इमेज
  खा.प्रितमताई मुंडे यांनी केले पवार,भोसले कुटुंबीयांचे सांत्वन बीडचे निवृत्त मंडळ अधिकारी शेख जहांगीर यांच्या कुटुंबीयांची ही घेतली भेट गेवराई.दि.२१----बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी काल ( दि.२१ ) गेवराई येथे भेट देऊन भाजपचे गेवराई तालुका विस्तारक ईश्वर पवार यांचे वडील स्व.भाऊराव पवार व पत्रकार स्व.संतोष भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.याप्रसंगी त्यांच्यासोबत गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गेवराई तालुक्यातील रोहीतळ येथे भेट देऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी ईश्वर पवार व त्यांच्या  कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन पवार कुटुंबाला आधार दिला.गेवराई शहरातील पत्रकार स्व.संतोष भोसले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते,भोसले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.खा.प्रितमताई मुंडे यांनी पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.तसेच गेवराईचे नगरसेवक राजाभाऊ आर्दंड यांच्या घरी भेट देऊन आर्दंड यांच्या मातोश्रींच्या निधनावर शोक व्यक्त केला.याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे,उपनगराध्यक्ष राजेंद

MB NEWS: *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !*

इमेज
 *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !!*   *केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश*   नवी दिल्ली : कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम अनेक घटकांवर होताना पाहायला मिळत आहे. त्याचा विचार करता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवा आदेश जारी केला आहे. राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची  अट आता शिथिल करण्यात आली आहे.

MB NEWS:*देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक*

इमेज
*देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक* नवी दिल्ली.... केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं. याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देश

MB NEWS:भाजपच्या 'या' नेत्यांच्या साखर कारखान्यांना 'महाविकासआघाडी' सरकारची हमी*

इमेज
*भाजपच्या या नेत्यांच्या साखर कारखान्यांना 'महाविकासआघाडी' सरकारची हमी* -----------------------------------   मुंबई : राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. या कारखान्यांमध्ये महाविकासआघाडीतील नेत्यांच्या कारखान्यांबरोबर भाजपच्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. राज्यात मागील वर्षी आणि यंदा चांगला पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाल्याने ऊसाच्या पिक क्षेत्रात वाढ झाली आणि पर्यायाने ऊसाचे पिकही मुबलक आले. मोठ्या प्रमाणावर असलेल्या या ऊसाचे गाळप करण्याचं आव्हान राज्य सरकार समोर आहे. त्यातच राज्यातील काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत. या कारखान्यांना कर्ज उपलब्ध झाले नाही, तर त्याचे गाळप होऊ शकणार नाही. त्यामुळेच अडचणीत असलेल्या ३० साखर कारखान्यांच्या ३७१ कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या उपसमितीने तयार केलाय. या कारखान्यांमध्ये महाविकासआघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांच्या कारखान्यांबरोबर भाजपच्या नेत्यांच्या