पोस्ट्स

मार्च १२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात

इमेज
पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ११ कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे उद्या भूमिपूजन हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात परळी वैजनाथ ।दिनांक १८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या रविवार व सोमवार या दोन दिवसांत सुमारे अकरा   कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे भूमिपूजन होत आहे. तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये त्या पाणी पुरवठा कामांना सुरवात करणार आहेत.     केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हयात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाली आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यासाठी प्रयत्न करून या योजनेत परळी तालुक्यासह जिल्हयातील सर्वच गावांचा यात समावेश केला आहे. या मिशन अंतर्गत पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ता. १९ व २० मार्च रोजी मागील आठवडय़ानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामांना सुरवात होणार आहे.    उद्या रविवारी सायंकाळी ५ वा. मलनाथपूर (५७ लाख रू.), सायंकाळी ६ वा. रामेवाडी-कासारवाडी (१ कोटी), संध्याकाळी ७ वा.हिवरा (३ कोटी ६७ लाख) आणि रात्रौ ८ व

MB NEWS:परळीचे भूमिपुत्र न्या. किरण देशपांडे यांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती

इमेज
  परळीचे भूमिपुत्र न्या. किरण देशपांडे यांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती                परळी/प्रतिनिधी - परळीचे भूमिपुत्र, कै. रंगराव (मामा) देशपांडे यांचे कनिष्ठ सुपुत्र न्या. किरण देशपांडे यांची तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती झाली आहे. यापूर्वी ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरपदावर पालघर येथे कार्यरत होते. नवी नियुक्तीही त्यांना पालघरमध्येच मिळाली आहे. न्या. किरण देशपांडे यांनी पूर्वी पुणे, नागपूर, दिंडोरी, नागभिड (जि. चंद्रपूर), पाटण, औसा येथील न्यायालयात न्यायदानाची सेवा बजावली आहे. न्या. किरण देशपांडे हे परळीतील गणेशपार भागात असलेल्या देशपांडे गल्लीतील मूळ रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात तर पदवीपर्यंतचे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले आहे. विधि शाखेचे शिक्षण आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आहे. माजी नगरसेवक तथा वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आर. आर. देशपांडे यांचे न्या. किरण देशपांडे हे कनिष्ठ बंधू आहेत. त्यांचे पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

MB NEWS:माणिकनगर महिला भजनी मंडळ व श्री महारुद्र संस्थानचा उपक्रम

इमेज
  पापमोचनी एकादशीनिमित्त परळीत श्री नामाचा गजर करत  निघाली वारकऱ्यांची पायी दिंडी माणिकनगर महिला भजनी मंडळ व श्री महारुद्र संस्थानचा उपक्रम *परळी वैजनाथ /प्रतिनिधी* हिंदू संस्कृतीत होळी नंतर येणाऱ्या मराठी महिन्यातील शेवटची पापमोचणी एकादशीला अनन्य साधारण महत्व असून यानिमित्त परळी वैजनाथ येथील माणिकनगर भागातील श्री महारुद्र संस्थान व माणिक नगर भजनी मंडळ यांच्या वतीने श्री नामाचा गजर करीत आज शनिवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी पाच वाजता प्रभु वैद्यनाथास मेरू प्रदक्षिणा करत वारकऱ्यांनी पायी दिंडी काढली. फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात आज शनिवारी १८ मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन असून, या वर्षातील ही शेवटची एकादशी असून या निमित्त शहरातील माणिक नगर भागातील श्री महारुद्र संस्थान हनुमान मंदिर व माणिक नगर महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आज सकाळी पाच वाजता संत श्री जगमित्र नागा महाराज मंदिर, श्री प्रभू वैजनाथ मंदिर, दक्षिणमुखी गणपती मंदिर, प्रति वैजनाथ मंदिर, वेताळ मंदिर असे मार्गक्रमण मेरू प्रदक्षिणा करण्यात आली.

MB NEWS:कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान

इमेज
  सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा गौरव  कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान साहित्यिक जैमिनी कडू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमात गौरव   परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष गौरव करण्यात आले. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत जैमिनी कडू यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  महात्मा फुले शिक्षण संस्था, ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व समृतीशेष जैमिनी कडू मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  कामगारांसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण व विशेष कार्याची दखल घेऊन नंदलाल राठोड यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या सत्कारबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.  कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे , केंद्र संचालक आरेफ शेख, शंकर काशीद, योगेश जोशी, नितीन पाटील, विजय वायाळ, उमेश जगदाळे, सलीम पठाण

MB NEWS:गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?

इमेज
  गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते? ● गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते . ● आता तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे विशेषच आहे. त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. ● गारा पडण्याचे दोन कारणे आहे. 1) हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी  2) हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं.  अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते. ● बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ● वारे येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. ● हे वारे फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात.  ● त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात.  हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ● ती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भ

MB NEWS:लक्ष्मण वानखेडे यांचे निधन,नितीन वानखेडे यांना पितृशोक

इमेज
  लक्ष्मण वानखेडे यांचे निधन,नितीन वानखेडे यांना पितृशोक परळी (प्रतिनिधी) -येथील बँक कॉलनीतील रहिवाशी व हॉटेल मैत्री चे संचालक नितीन वानखेडे यांचे वडील  लक्ष्मण नारायण वानखेडे यांचे शुक्रवारी सकाळी हृदय विकाराने दुःखद निधन झाले.   त्यांच्या पश्चात पत्नी, अमोल, नितीन आणि आकाश अशी तीन मुले,एक मुलगी सुना,जावई,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. शुक्रवारी  दुपारी 3.00 वाजता शहरातील सार्वजनिक स्मशाभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . या वेळी व्यापारी,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अदि क्षेत्रातील मान्यवरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                त्यांचा राख सावडन्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. वानखेडे परिवारावर कोसळलेल्या MB न्युज चॅनल सहभागी आहे.

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला राज्य सरकारने दिली चालना परळी वैजनाथ ।दिनांक १६। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची तसेच प्रत्यक्ष भेटीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला चालना दिली आहे. या आराखड्याच्या वाढीव मंजुरीस त्यांनी मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत.    पंकजाताई मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना  सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते.   पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला होता.  या आराखड्यातील कामांसाठी त्यावेळी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता.  याच निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे. दोन वेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पत्राची घेतली दखल ------------- हा आराखडा जशा

MB NEWS:धनंजय मुंडेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला!

इमेज
  धनंजय मुंडेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला! परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 283 कोटींच्या सुधारित आराखड्यास मंजुरी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश व्हावा, यासाठीचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश वैद्यनाथ वन उद्यानाला मिळणार निधी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास, पर्यटन व वन विभागाची एकत्र बैठक मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीश महाजन, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती धनंजय मुंडेंनी मानले आभार मुंबई (दि.16) - आ. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासंदर्भात केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत आज झालेल्या बैठकीत नगर विकास विभागाचा तीर्थ क्षेत्र विकास निधीतून वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र विकासाच्या सुधारित 283 कोटींच्या आराखड्यास प्रस्ताव प्राप्त होताच मंजुरी देण्याची घोषणा केली आहे.  धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील दालनात यास

MB NEWS:योगेश वांजरखेडे यांना मातृशोक : सौ.शामलता वांजरखेडे यांचे निधन

इमेज
  योगेश वांजरखेडे यांना मातृशोक : सौ.शामलता वांजरखेडे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      येथील स्नेहनगर मधील रहिवासी योगेश वांजरखेडे यांच्या मातोश्री सौ. शामलता जगदीशराव वांजरखेडे यांचे आज दि.१५ रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले. स्नेहनगर मधील रहिवासी असलेल्या शामलता जगदीशराव वांजरखेडे या अतिशय सुस्वाभावी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. उद्या अंत्यसंस्कार      दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 रोजी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वांजरखेडे यांचे राहते घर पावर हाऊस समोर परळी वैजनाथ येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

MB NEWS:डॉ. अंकिता गिरीश खिस्ते यांचे यश

इमेज
  डॉ. अंकिता गिरीश खिस्ते यांचे यश  परळी-प्रतिनिधी - परळीचे भूमिपुत्र तथा छत्रपती संभाजीनगरमधील लेखापरिक्षक सहकारी संस्था गिरीश गणपतराव  खिस्ते यांची सुकन्या व दयानिधी विनायकराव खिस्ते यांची चुलत बहीण डॉ. अंकिता गिरीश खिस्ते यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील (नीट-पीजी) परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले. डॉक्टर अंकिता यांनी 576 गुण घेतले असुन संपूर्ण भारतातून 4612 वा क्रमांक (रँक) मिळवला आहे. डॉ. अंकिता यांनी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशा बद्दल डॉ. अंकिता यांचे सर्व स्तरातून अभिनंदन, कौतुक होत आहे.

MB NEWS:सैरभैर भाविकांना दिला परळीकरांनी आधार

इमेज
  परळीजवळ  प्रवासादरम्यान  ह्रदयविकाराचा झटका ; भाविकांना 'यात्रा घडवणाऱ्या' यात्राकंपनी व्यवस्थापकाची संपली 'जीवनयात्रा' ! सैरभैर भाविकांना दिला परळीकरांनी आधार परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       गुजरात मधील भाविकांना विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी व धार्मिक स्थळांवर यात्रा घडवून आणणाऱ्या एका यात्रा कंपनी व्यवस्थापकाला परळी जवळ येत असताना प्रवासादरम्यान बस मध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. अतिशय दुःखद अशा प्रकारची ही घटना आज दिनांक 15 रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. भाविकांना यात्रा घडवणाऱ्या या व्यवस्थापकाने यात्रा मार्गावरच आपली जीवन यात्रा संपवल्याची ही घटना घडली आहे.          गुजरात राज्यातील यात्रा कंपनी ही महाराष्ट्रातील विविध देवस्थानांच्या ठिकाणी व तीर्थस्थळावर जाऊन देवदर्शन करण्यासाठी निघालेली आहे. गेल्या एक महिन्यापासून ही यात्रा गुजरातहून विविध धार्मिक स्थळांवर प्रवास करत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी या यात्रेकरूंची ट्रॅव्हल बस अंबाजोगाईहून परळी कडे येत असताना आज दिनांक 15 रोजी सकाळी सु

MB NEWS:मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच करा विविध दाखले देत केली ॲड.माधव जाधव यांनी मागणी

इमेज
  मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच करा विविध दाखले देत केली ॲड.माधव जाधव यांनी मागणी अंबाजोगाई(प्रतिनिधी)दि.13- विदर्भातील रिद्धपुर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली.राज्य सरकारच्या या घोषणेला आता अंबाजोगाईतुन विरोध होतांना दिसत आहे.मराठवाड्यावर राज्य सरकार आणखी किती अन्याय करणार आहे असा सवाल मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय किसान काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केला आहे.यामध्ये त्यांनी अंबाजोगाईला का विद्यापीठ झाले पाहीजे यासाठी दाखलेही दिले आहेत. मुकुंदराज स्वामींनी मराठी भाषेचा पहिला ग्रंथ व मराठी भाषेची पहिली ओवी विवेक सिंधू हा ग्रंथ अंबाजोगाई येथे लिहिलेला आहे.अकराव्या शतकामध्ये स्वामी मुकुंदराज यांनी अंबाजोगाई येथे समाधी घेतलेली आहे.आजही मुकुंदराज स्वामींची समाधी अंबाजोगाई येथे असून संपूर्ण महाराष्ट्रातून व देशभरातून मराठी भाषीक प्रेमी अंबाजोगाई येथे स्वामी मुकुंदराज यांच्या समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी र

MB NEWS:पंकज कुमावत पथकाची मोठी कारवाई: परळी ते गंगाखेड रोडवर ३३ लाखाचा गुटखा पकडला

इमेज
पंकज कुमावत पथकाची मोठी कारवाई: परळी ते गंगाखेड रोडवर ३३ लाखाचा गुटखा पकडला केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज  कुमावत हे रात्रीची गस्त घालीत असताना परळी-गंगाखेड रोडवर एका आयशर टेम्पो मधून गुटखा उतरून घेत असताना त्यांनी पकडला असून गुटखा व वाहतूक करणारा टेम्पो असा ५१ लाख रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, दि. १४ मार्च साहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, हेडपोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी दराडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपणे, वाहन चालक वंजारे हे जिल्हा रात्रगस्त घालीत असताना परळी शहर येथे आले असता सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक आयशर टेम्पो क्र. (एच आर६९/ डी-२३०२) मध्ये राजनिवास गुटख्याचा माल भरलेला असून सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणारे रोडवर एन के देशमुख यांचे इंडियन पेट्रोल पंपाचे बाजूला उभा करून त्यातील माल खाली उतरून घेत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन

MB NEWS:परळीत रस्त्यावर वाहनाने पुन्हा एकाला उडवले: दोन दिवसापूर्वीच्या घटनेची पुनरावर्ती

इमेज
  परळीत रस्त्यावर वाहनाने पुन्हा एकाला उडवले: दोन दिवसापूर्वीच्या घटनेची पुनरावर्ती परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        परळीत रस्त्यावर वाहनाने पुन्हा एकाला उडवले आहे.दोन दिवसापूर्वीच्या घटनेची पुनरावर्ती झाली असुन तिच जागा,तिच वेळ तसाच घटनाक्रम घडला.या आपघातात 50 वर्षिय इसम मृत्यू पावला आहे.     उड्डाणपूल ते आर्य समाज मंदिर रोड व गेल्या दोन दिवसापूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला होता या घटनेनंतर आज पुन्हा तशाच प्रकारची घटना घडली आहे.या घटनेत अमर बारटक्के वय 50 रा.पेठगल्ली परळी वैजनाथ या इसमाचा मृत्यू झाला आहे.   

MB NEWS:सतिष बियाणी यांचा सत्कार

इमेज
  सतिष बियाणी यांचा सत्कार   दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतिषसेठ बियाणी यांची बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना लोकमत टाइम्स चे पत्रकार प्रा. राजू कोकलगावे, मराठवाडा साठीचे विशेष प्रतिनिधी संजय क्षिरसागर व मराठवाडा साठी चे व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे दिसत आहेत

MB NEWS:वैद्यनाथ काॅरीडोरसाठी प्रभु वैद्यनाथास अभिषेक व सामुदायिक महाआरतीचे आयोजन

इमेज
  वैद्यनाथ काॅरीडोरसाठी  प्रभु वैद्यनाथास अभिषेक व सामुदायिक महाआरतीचे आयोजन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिराचा समावेश केंद्राच्या ज्योतिर्लिंग गॅझेटमध्ये समावेश करावा तसेच येथे काॅरीडोर घोषित करून केंद्रीय प्रसाद योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात यावे यासाठी सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांसह , सामाजिक कार्यकर्ते , विविध व्यापारी संघटना, पत्रकार बांधव, सामाजिक संस्थेतील प्रमुख तथा निःपक्ष मंडळी अर्थात आपण सर्व परळीकरांच्या हस्ते उद्या दि.15/03/23 बुधवार रोजी सकाळी ठिक 10 वाजता प्रभु वैद्यनाथास सामुदायिक अभिषेक व महाआरती करण्यात येणार असून आपल्या उपस्थितीमुळे वैद्यनाथ काॅरीडोर उभारण्यास प्रभु वैद्यनाथाच्या अशिर्वादाने आपनास बळ मिळेल..तरी आपन एक परळीकर म्हणून उपस्थित रहावे.

MB NEWS:जिल्हा परिषदेने घेतलेल्या इस्त्रो सहलीच्या परिक्षेत कपील गोपीनाथ कुंभारचे यशः गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

इमेज
  जिल्हा परिषदेने घेतलेल्या इस्त्रो सहलीच्या परिक्षेत कपील गोपीनाथ कुंभारचे यशः गावकऱ्यांच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)            जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्त्रो व नासासाठी विद्यार्थ्यांची सहल काढण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषदेच्या वतीने अगोदर तालुका स्तरावर व नंतर जिल्हा स्तरावर परिक्षा घेण्यात आली. यातून ३३ विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. या ३३ विद्यार्थ्यांमध्ये गाढे पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेचा कपील गोपीनाथ कुंभार यांची निवड झाली आहे. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार आला.                     जिल्हा परिषदेचे वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अगोदर परिक्षा घेतली.प्रत्येक तालुक्यातून टाँप १० विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र झाले. प्रत्येक तालुक्यातील दहा विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर परिक्षा घेण्यात आली. परळी तालुक्यातून जे दहा विद्यार्थी पात्र झाले होते. यामध्ये गाढे पिंपळगाव केंद्रीय जिल्हा परिषद शाळेचे ३ विद्यार्थी पात्र झाले. यातून जिल्हा स्तरावर घेण्यात आले

MB NEWS:संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा ; आमदारांसह पदाधिकारी उपस्थित

इमेज
  पंकजाताई मुंडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भेट संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा ; आमदारांसह पदाधिकारी उपस्थित मुंबई । दिनांक १४। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात भेट घेतली. संघटनात्मक तसेच विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.    प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात आले होते, विक्रांत पाटील हे देखील त्यांच्यासमवेत होते. पंकजाताईंनी यावेळी त्यांचे स्वागत केले. या दोघांमध्ये संघटनात्मक तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, सदाशिव खाडे, विजयकांत मुंडे, देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड, विष्णू घुले, गञेश पुजारी, अरूण राऊत आदी जिल्हयातील भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. वरळी ऑफिस नेहमीप्रमाणेच फुल्ल ! ------------- पंकजाताई मुंडे यांनी आज दिवसभर वरळी ऑफिसमध्ये सर्व सामान्य जनता व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्याची सोडवणूक केली. सामान्य गरजू गरीब मा

MB NEWS:प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

इमेज
  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा "प्रसाद" योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार पंकजाताई मुंडे यांनी मानले राज्य सरकारचे आभार मुंबई  ।दिनांक १४। केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी "प्रसाद" योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याच्या   पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या घोषणेचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले असून राज्य सरकारचे आभार मानले आहेत.    केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी सुरू केलेल्या प्रसाद योजनेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करून या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच सभागृहात सांगितले होते. दरम्यान  आम्ही सातत्याने करत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. ••••

MB NEWS: संपर्कासाठी आवाहन.

इमेज
  परळीच्या जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे सुवर्णमहोत्सवी स्नेहमीलन प्रतिनिधी/परळी परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद शाळेतील 1972 ते 1974 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा (गेट-टुगेदर) जून महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना भेटण्याचा "सुवर्ण"क्षण येणार असून शाळेप्रतीचे उत्तरदायित्व म्हणून काही शालोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस आहे. या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे एक आव्हान आहे. त्यामुळे या संदर्भातील माहिती सर्व दूर पोहोचून संपर्क करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. डॉ. प्रदीप जब्दे (मोबाईल क्रमांक 7264066225),  वैद्यनाथ गॅस एजन्सीचे संचालक श्रीपाद बुरकुले (9422241878), महाराष्ट्र बँकेतील निवृत्त व्यवस्थापक दिवाकर धोंड (8668831896), जि. प. शाळेतील निवृत्त विश्वंभर देशपांडे (9665212407) महानिर्मितीमधून निवृत्त झालेले बालासाहे

MB NEWS: सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

इमेज
  सचिन जगताप यांच्या 'आरंभ' माहितीपटाला राज्य शासनाचा एक लाखाचा पुरस्कार सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांनी या राज्य शासनाच्या उमेद अभियानावर तयार केलेल्या महिलांची यशोगाथा असलेल्या 'आरंभ' या माहितीपटाला एक लाख रुपयांचे राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांच्या हस्ते हे पारितोषिक सचिन जगताप यांना प्रदान करण्यात आले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 100 हून अधिक लघुपट व माहितीपट शासनाकडे सादर करण्यात आले होते.  यात सोलापूरने तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले.सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि

MB NEWS:♦️पत्रकार श्रीराम लांडगे लिखित अभिष्टचिंतन लेख...♦️ मनातील भावविश्वाचा अचुक रेशीम बंध गुंफणारे मार्गदर्शक प्रा. रवि सर...!

इमेज
   ♦️ मनातील भावविश्वाचा अचुक रेशीम बंध गुंफणारे मार्गदर्शक प्रा. रवि सर...! ♦️ परळीच्या पत्रकारितेतील कोहिनूर ...!       तस पहायला गेलं तर बीड जिल्हा म्हणजे निडर, अभ्यासू, जिज्ञासु व नाविन्याचा शोध घेणाऱ्या पत्रकारांची जणू खानच आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यातच सर्वाधिक वर्तमानपत्र व दैनिक चालवली जातात प्रकाशित होतात. आपसुकच यामुळे एकूणच येथील पत्रकारिता क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असून या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांचा कल वाढलेला आहे. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या बहुतांश नवोदितांना  याठिकाणी व्यासपीठ देखील उपलब्ध होते. पत्रकारिता क्षेत्र एका मृगजळासारखे असून बाहेरून पाहणार्‍याला त्याची झळाळी व चकाकी जाणवल्याशिवाय राहत नाही. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आदीं बाबी वरती बीड जिल्ह्यातील पत्रकार अभ्यासपूर्ण भाष्य करत असतात व तेवढी समग्र प्रतिभा देखील येथील पत्रकारांमध्ये असल्याचे जाणकारामधून बोलले जाते...        आज अशाच एका परळी तालुका व बीड जिल्हाच नव्हे तर आपल्या पत्रकारितेच्या जोरावरती सबंध महाराष्ट्रामध्ये सामान्य व वंचित घटकांच्या प्रश्

MB NEWS:पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे निधन

इमेज
  पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे निधन परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)         शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी पार्वतीबाई महादेव विटेकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.             शहरातील माणिकनगर भागातील रहिवासी पार्वतीबाई महादेव विटेकर यांचे शनिवारी (दि.११) सकाळी ११ च्या सुमारास निधन झाले. सायंकाळी ४ च्या सुमारास येथील  विरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.पार्वती विटेकर अत्यंत मनमिळाऊ, धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक महादेव विटेकर यांच्या पत्नी तर पोलीस जमादार वैजनाथ विटेकर यांच्या त्या आई होत.

MB NEWS:परळी तालुक्यात बालविवाह :150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल

इमेज
  परळी तालुक्यात बालविवाह :150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         तालुक्यातील नंदागौळ येथे बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईन बीड यांच्याकडून ग्रामसेवकास देण्यात आली.हा बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यापुर्वीच हा विवाह पार पडला. याप्रकरणी ग्रामसेवकाने संबंधित नवरा नवरी,नातेवाईक, मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा,पुरोहित,फोटोग्राफर,आचारी व वर्‍हाडी अशा तब्बल 150 ते 200 जणांविरुद्ध फिर्याद दिली असुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, चोपनवाडी ता.अंबाजोगाई येथील १६ वर्षिय मुलगी व नंदागौळ येथील २४ वर्षिय मुलगा असा विवाह ठरला होता. आज दिनांक 13/03/2023 रोजी  हा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईन बीड यांच्याकडून ग्रामसेवकास देण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक ज्ञानेश्वर शामराव मुकाडे हे नंदागौळ येथे गेले परंतु त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हा विवाह पार पडला होता. या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे फोन आल्या बरोबर नंदागौळ येथे गेलो.

MB NEWS:नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

इमेज
  परळीत १ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा ४३वा.सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा! नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-         ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४३ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा येत्या १ मे रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.          गेल्या ४२ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा  सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे १०.३५ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ५०१ रु.नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.या सामुदायिक उपनयन संस्कार

सेवा निवृत्ती समारंभात सारेच गहिवरले

इमेज
  ज्ञानबोधिनी शाळेच्या उभारणीत दगडगुंडेबाईंचे मोलाचे योगदान ; सेवा निवृत्ती समारंभात सारेच गहिवरले परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.12 - येथील निवृत्त प्राथमिक शिक्षिका कुंदा दगडगुंडे यांच्या निवृत्ती समारंभाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते.दगडगुंडे बाईंनी ज्ञानदानाचे काम तर केलेच पण ही शाळा उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे गौरौद्गार संस्थचे सचिव तथा ज्ञानबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांनी काढले.तर शाळेतील सेवा काळात सर्वांनी सहकार्य केल्याने मी कार्यकाळ पूर्ण केला असे दगडगुंडे बाई बोलतांना म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सेवा काळ संपल्याने प्राथमिक शिक्षिका कुंदा दगडगुंडे यांचा ज्ञानबोधिनी प्राथमिक शाळेत संस्थेच्या वतीने हृद्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेकडून मुंडे यांनी दगडगुंडे बाईंना प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा, तर मोती मॅडम व कराड मॅडम यांनी साडी चोळी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी लक्ष्मण मुंडे बोलतांना म्हणाले की ज्ञानबोधिनी शाळा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.या मध्ये आपल्या दगडगुंडे बाईंचे

MB NEWS:छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के

इमेज
  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के परळी प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे असल्याचे प्रतिपादन फुले आंबेडकरी अभ्यासक प्रशांत मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी येथील  लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि १२ मार्च रोजी आयोजित साप्ताहिक बैठकीत केले. उदघाटक ए.तू. कराड हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड हे होते. या प्रसंगी प्रा. डॉ सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय नाट्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमत समाचार चे प्रतिनिधी सय्यद अफसर, पत्रकार नितीन ढाकणे, संभाजी ब्रिगेड चे जिल्यासचिव सेवाकराम जाधव, न. प. चे अग्निशामक दलाचे दिनेश पवार आणि युवा नेते अनंत इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.फुले -आंबेडकरी दृष्टिकोन आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चित्रण या विषयावर प्रशांत मस्के पुढे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे प्रेरणा स्रोत असल्याचे महात्मा फुलेंनी वारंवार सांगितले. छत्रपती श

MB NEWS:खाडे बंधूंची सत्यनिष्ठा: अजूनही आपुलकी आणि विश्वासार्हता जपणारी माणुसकीची माणसं असल्याचे उदाहरण

इमेज
  खाडे बंधूंची सत्यनिष्ठा: अजूनही आपुलकी आणि विश्वासार्हता जपणारी माणुसकीची माणसं असल्याचे उदाहरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        सध्याच्या जमान्यात संपत्तीचा मोह व व्यवहारात जागोजागी बसणारे धोके लक्षात घेता एकमेकांच्या शब्दावरचा विश्वास उडत चाललेला काळ आहे. परंतु अशाही काळात दिलेल्या शब्दाला जागणारी आणि सत्य निष्ठेला अंगीकारणारी माणसे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. अशाच प्रकारचे उदाहरण परळी येथील खाडे बंधूंनी दाखवून दिले आहे.           अजूनही आपुलकी आणि विश्वासार्हता जपणारी माणुसकीची माणसं असल्याचे उदाहरण खाडे बंधूंनी दाखवून दिले आहे. याचे झाले असे की, गेल्या अनेक वर्षापासून सबरस व्यवसाय समूहाचे अग्रवाल बंधू यांची राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सर्वपरिचित अशी जागा आहे. या व्यापार संकुलात अनेक वर्षांपूर्वी खाडे बंधूंना सलूनसाठी ही जागा व्यक्तिगत स्तरावर भाडेतत्त्वावर दिलेली होती. अनेक वर्षाचा काळ खाडे बंधूंचे हे दुकान याच ठिकाणी आहे. वर्षानुवर्षे कब्जात असलेली लक्षावधी रुपयांची जागा सोडताना प्रत्येक कब्जेदाराला मोह हा नक्कीच होतो. मात्र अग्रवाल यांनी विनंती केल्यानंतर कुठलाही मोह उराशी