MB NEWS-गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे*

* गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे* परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी) तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची निवड करण्यात आली असून सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गंगणे व प्रमुख मार्गदर्शक युवानेते शरद राडकर यांनी अभिनंदन केले आहे. गाढे पिंपळगाव येथील सेलू, सफदाराबाद व गाढे पिंपळगाव या तीन गावची मिळून सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षापूर्वी सोसायटीच्या निवडणूका झाल्या असून निवडणुकीत ठरल्या प्रमाणे श्री.आरसुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब आरसुळे यांचा शरद राडकर, चेअरमन पांडुरंग गंगणे, शितलदास आरसुळे यांनी सत्कार केला. या नियुक्ती बदल सोसायटीचे मार्गदर्शक युवानेते शरद राडकर, चेअरमन पांडूरंग गंगणे, संचालक प्रशांत थोंटे, गणेश फुटके, जालिंदर राडकर, शितलदास आरसुळे, सुंदर नवले यांच्यासह सर्व संचालक, सभासदांनी...