MB NEWS:गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन पॅनलच्या उमेदवारांनी केली प्रचाराला सुरवात

पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मार्केट कमिटी, जवाहर शिक्षण संस्था पॅनलच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन पॅनलच्या उमेदवारांनी केली प्रचाराला सुरवात परळी वैजनाथ ।दिनांक २२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कृषी उत्पन्न बाजार समिती व जवाहर शिक्षण संस्था निवडणूकीतील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मोठया थाटात झाला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही निवडणूकीतील उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी २८ एप्रिल रोजी तर जवाहर शिक्षण संस्थेच्या ३२ जागांसाठी ६ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीसाठी लोकनेते शेतकरी विकास पॅनल तर जवाहर साठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पंकजाताई मुंडे प्रचार शुभारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत तथापि, उद्यापासून त्या मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार करणार आ...