MB NEWS-महाराजांची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील -धनंजय मुंडे

पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे धनंजय मुंडे यांनी घेेतलं अंत्यदर्शन महाराजांची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील -धनंजय मुंडे बीड येथील संत जनीजनार्धन संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.धुंडीराजशास्त्री पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराजांनी अध्यात्माच्या मार्गाने शिकवलेली मानवतेची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील अशी भावना यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली, यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सय्यद सलीम, नारायण शिंदे, कल्याण आखाडे, दादासाहेब मुंडे, प्रशांत चौरे आदी होते.